ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Gardening Tips for Tulsi Plant in Marathi

तुळशीचं रोप कोमेजलं असेल तर असं करा टवटवीत

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशीचं रोप लावण्याची पद्धत आहे. पूर्वी घरं मोठी असल्यामुळे अंगणात तुळशी वृंदावन असायचं मात्र आता जागे अभावी छोट्या कुंडीत तुळस लावली जाते. जरी तुमचं घर लहान असलं तरी तुम्ही खिडकीत अथवा बाल्कनीत तुळशीचं रोप लावू शकता. दररोज सकाळी देवपूजा आणि तुळशीची पूजा केल्यावरच भारतात अनेक महिलांचा दिवस सुरू होतो.  तुळस ही आरोग्यदायी आणि धार्मिक वनस्पती आहे. त्यामुळे तुळशीची भारतात पूजा केली जाते. औषधोपचारांसाठी तुळस मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे घरी टवटवीत आणि हिरवंगार बहरलेलं तुळशीचं रोप असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण होतं काय बऱ्याचदा छोट्या कुंडीत पाणी कमी जास्त झाल्यामुळे अथवा मातीतील पोषणमुल्यं संपल्यामुळे कधी कधी तुळशीचं रोप सुकतं अथवा कोमेजतं. तुळशीचं रोप सतत टवटवीत राहावं असं वाटत असेल तर मग या टिप्स फॉलो करायला विसरू नका. यासोबतच जाणून घ्या तुळशीचे फायदे आणि माहिती (Tulsi Benefits In Marathi), टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi), झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि सोप्या टिप्स (Plants To Grow From Cuttings In Marathi)

तुळशीच्या रोपाची वाढ करण्यासाठी टिप्स 

तुळशीचं रोप हे नाजूक असतं. ज्यामुळे त्याची जास्त काळजीपूर्वक देखभाल करावी लागते. तुळशीचं रोप कायम टवटवीत दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

  • प्रत्येक रोपाला विशिष्ट प्रमाणात पाण्याची गरज असते. तुळशीला पाणी कमी लागतं. जर तुम्ही भरपूर पाणी तुळशीच्या रोपाला घातलं तर मातीत जास्त पाणी साचल्यामुळे तुळशीची मुळं सडू लागतात. यासाठी तुळशीला कुंडीतील माती भिजेल 
  • इतपतच पाणी घाला.
  • कुंडीतील माती वरच्या वर उकरून मोकळी करा. बऱ्याचदा माती घट्ट झाल्यामुळे मुळांना पुरेसा ऑस्किजन मिळत नाही. ज्यामुळे झाड सुकण्याची शक्यता वाढते.
  • दररोज तुळशीची पाने तोडू नका. काही लोकांना चहा, काढा करण्यासाठी दररोज तुळशीची पाने लागतात. पण रोप लहान असेल तर असं सतत पाने खुडल्यामुळे झाड सुकू शकते.
  • तुळशीची पूजा करणं धार्मिक विधीत मान्य असलं तरी दररोज तुळशीजवळ दिवा अथवा अगरबत्ती लावण्याने तुळशीची पाने कोमेजतात. हवं तर थोडं दूर दिवा आणि अगरबत्ती लावा. मात्र कुंडीत या वस्तू ठेवू नका.
  • तुळशीचं रोप वरचेवर ट्रिम करायला हवं. ज्यामुळे नवीन पालवी फुटते आणि शाखा विस्तारल्यामुळे झाड जास्त हिरवंगार आणि टवटवीत दिसतं. नवीन मंजिरी वाढल्यावर त्या काढून टाकव्यात. ज्यामुळे त्या जागी नवीन पालवी फुटते. 
  • तुळशीला कीड लागली तर तुळस सुकण्याची शक्यता असते. यासाठी वरचेवर तुळशीवर कडूलिंबाचे पाणी अथवा तेल स्प्रे करावे. एक लीटर पाण्यात दहा थेंब तेल टाकून ते पाणी सर्व झाडांवर स्प्रे केल्यास झाडांना कीड लागत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT