ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
10 मिनिट्समध्ये कसे व्हाल बाहेर जाण्यासाठी तयार, मेकअप ट्रिक्स

10 मिनिट्समध्ये कसे व्हाल बाहेर जाण्यासाठी तयार, मेकअप ट्रिक्स

मेकअप करणे  तसे तर प्रत्येक मुलीला आणि महिलेला आवडते. फारच कमी महिला असतील ज्यांना मेकअप करणे आवडत नसेल. पण मेकअप करायला तुम्हाला खूप वेळ लागतो म्हणून करायला कंटाळा येतो का तुम्हाला? ऑफिसला जायचे असेल अथवा कोणत्याही पार्टीला, कॉलेजला जायचे असेल अथवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात किमान थोडासा मेकअप केल्यानंतर आपला लुक नक्कीच बदलतो. बऱ्याचदा मेकअप आणि हेअरस्टाईल यामुळेच तयार व्हायला वेळ लागतो. तर काही जणी केवळ आळसामुळे मेकअप करत नाहीत. पण अशा व्यक्तींसाठी झटपट मेकअप करायच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही या ट्रिक्स वापर केलात तर तुम्हाला तयार होण्यासाठी केवळ 10 मिनिट्स लागतील. हवं तर तुम्ही घड्याळामध्ये बघून मेकअपची तयारी करायला सुरूवात करा. 

वाईप्स ठेवा बेडजवळ

कधी कधी उठून बाहेर जाऊन तोंड धुवायचा कंटाळा येतो. पण चेहरा स्वच्छदेखील करायचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बेडजवळ वाईप्स ठेवा. वाईप्सच्या मदतीने चेहरा अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ होऊ शकतो. तसंच तुमच्या चेहऱ्यावर असणारी घाण पटकन निघून जाण्यासही मदत मिळते. तसंच पाण्याने चेहरा धुण्यासाठीचा वेळ वाचतो. त्यामुळे पुढे मेकअपसाठी वेळ वाढू शकतो.

तेलकट त्वचेसाठी हे आहेत बेस्ट वाईप्स (Best Wipes For Oily Skin In Marathi)

ड्राय शँपू

बाहेर जाताना मेकअपसह हेअरस्टाईलही अत्यंत गरजेची असते. असाच केसांचा गुच्छा करून तर आपण जाऊ शकत नाही. बऱ्याचदा घाईघाईत आपण केस धुतलेले नसतात आणि त्यामुळे केसही अगदी चिकट झालेले असतात. त्यामुळे जर फोटो काढायचे असतील अथवा हेअरस्टाईल करायची असेल तर केस व्यवस्थित दिसत नाही. मग अशावेळी तुम्ही ड्राय शँपूचा वापर करू शकता. ड्राय शँपूचा वापर केल्याने केसातील तेल दिसून  येत  नाही. पण लक्षात ठेवा की, ड्राय शँपूचा वापर कमीत कमी करावा.  कारण ड्राय शँपू केसांवर अतिशय वाईट परिणाम करतो. तसंच याचा नियमित वापर करू नका. 

ADVERTISEMENT

दोन मिनिट्समध्ये बनवा हेअरस्टाईल

Shutterstock

केसांची काळजी घेण्यासाठी तेल अत्यंत आवश्यक असते.पण तेल लावल्यानंतर अचानक जर बाहेर जायचा प्लॅन तयार झाला तर मग काय करायचं असाही प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही हायस्लीक बन बांधू शकता. ही हेअरस्टाईल तुम्ही भारतीय असो वा वेस्टर्न असो कोणत्याही कपड्यांवर व्यवस्थित कॅरी करू शकता.  तसंच ही हेअरस्टाईल करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. 

हेअरस्टाईल करताना हेअर स्टायलिंग स्प्रे वापरताय, मग वाचाच

ADVERTISEMENT

मेकअपची पद्धत

तुम्ही अगदी बेसिक मेकअप करूनही तयार होऊ शकता. चेहऱ्याला प्राईमर लाऊन त्यावर कॉम्पॅक्ट लावा. त्यानंतर चेहऱ्यावर हलकेसे हायलायटर तुमच्या कपड्यांच्या रंगाचा अंदाज घेऊन लावा.  त्यानंतर काजळ, मस्कारा,  आयलायनर तुमच्या आवडीनुसार लावा आणि मग सर्वात शेवटी लिपस्टिकने तुमचा लुक पूर्ण  करा.  हे सर्व करण्यासाठी साधारण पाच मिनिट्स  लागतात. 

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

गुलाबजल आणि पेट्रोलियम जेली

मुलींनी आपल्या बॅगमध्ये नेहमी गुलाबपाण्याचा एक लहान स्प्रे ठेवावा आणि पेट्रोलियम जेलीदेखील. या दोन्ही गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा कायम ताजातवाना ठेऊ शकता.  कोणत्याही खास कार्यक्रमात जाण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर गुलाबपाण्याचा स्प्रे नक्की फायदेशीर ठरतो. त्यानंतर चेहरा पुसून तुम्ही पेट्रोलियम जेली लावा. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT

 

29 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT