ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
gift-ideas-for-makar-sankranti

पहिल्या मकरसंक्रांतीला काय गिफ्ट द्याल, तुमच्यासाठी खास आयडियाज

लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत (Makar Sankranti) ही प्रत्येकासाठी खास असते. अगदी हलव्याचे दागिने घालून नवरी सजते आणि तिला ओवाळून खास गिफ्ट दिले जातात. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर नव्या नवरीच्या आयुष्यात कोणतेही रूसवे फुगवे राहू नयेत आणि तिला सासर हेच आपलं घर वाटावं या भावनेने हा सोहळा केला जातो. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. पण अशा कार्यक्रमाला पहिल्या मकर संक्रांतीसाठी नक्की काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. साडी आणि ब्लाऊज या तर अगदी कॉमन गोष्टी आहेत. पण याशिवाय उपयोगी अशा कोणत्या गोष्टी देता येतील याचाही विचार केला जातो. तुम्हाला या लेखातून आम्ही काही गिफ्ट आयडियाज (Gift ideas for makar sankranti) देणार आहोत. 

तुळशीचे रोपटे अथवा कोणतेही छानसे रोपटे

घरात सकारात्मकता राहिली की आपोआप एकमेकांबरोबरील हेवेदावे राहात नाहीत. त्यामुळे घरात तुम्ही आठवण म्हणून तुळशीचे रोपटे अथवा कोणत्याही फुलझाडांचे रोपटे गिफ्ट म्हणून द्यावे. तसंच यामुळे वृक्ष संवर्धनाचा संदेशही मिळतो. आपल्या घरात तुम्ही सुंदरसे तुळशीचे रोपटे लाऊ शकता. याशिवाय तुळशीचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत. पहिल्या मकरसंक्रांतीला गिफ्ट म्हणूनच नाही तर तुम्ही हळदीकुंकवाचे वाण म्हणूनही याचा वापर नक्कीच करू शकता. 

फ्रिज बॅग्ज

कोणत्याही महिलेसाठी फ्रिजमध्ये पदार्थ ठेवणे हा एक मोठा टास्क असतो. विशेषतः भाजी. काही भाज्या एकमेकांसोबत ठेवल्यास, खराब होतात. अशा वेळी सध्या फ्रिज बॅग्ज (Fridge Bags) हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. प्लास्टिक पिशव्यांमध्ये भाज्या अथवा फळं भरून ठेवण्यापेक्षा अशा फ्रिज बॅग्ज भाजी आणि फळं अधिक काळ टिकण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच तुमची भाजी आणि फळं लवकर खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. 

पोलकी कलेक्शन 

अगदी तुमच्या जवळची व्यक्ती असेल आणि तुम्हाला दागिने अथवा काहीतरी खास द्यायचे असेल तर सध्या पोलकी कलेक्शन (Polki Collection) ट्रेंडमध्ये आहे. दस्सानी ब्रदर्स यांनी काही खास कलेक्शन नव्या वर्षाच्या सुरूवातीला आणले आहे. तुम्हीही तुमच्या निवडीने आणि ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचे आहे तिच्या आवडीनुसार नवे नवे डिझाईन देऊ शकता. यामध्ये ब्रेसलेट, कानातले, अंगठी, गळ्यातले असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही महिलेला कितीही दागिने दिले तरी कमीच. त्यामुळे हादेखील एक चांगला पर्याय आहे. 

ADVERTISEMENT

खाण्याचे आवडीचे पदार्थ

मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमांना आपण तिळगूळ आणि खुसखुशीत गुळाची पोळी तर हक्काने घेऊन जातो. त्याव्यतिरिक्त तुम्ही ज्या व्यक्तीसाठी खास मकरसंक्रांतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तिच्यासाठी तिच्या आवडीचे खास पदार्थ करून घेऊन जा. तिला नक्कीच आपल्या माहेरच्यांच्या प्रेमासह या पदार्थांची चव चाखून कायम लक्षात राहील. मकरसंक्रांतीसाठी अनेक पदार्थ करण्यात येतात. त्यापैकी तिच्या आवडीचा पदार्थ नक्कीच तिला आनंद देईल. 

ब्युटी हँपर

STUDIOWEST Beauty Hamper – Rs.  2,860 

पहिल्या मकरसंक्रांतीसाठी जर तुम्हाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही ब्युटी हँपरही देऊ शकता. जिची पहिली मकरसंक्रांत आहे तिला जर सौंदर्यप्रसाधने आवडत असतील तर त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही MyGlamm Products, POPxo Beauty Products अथवा Westside चे कस्टमाईज गिफ्ट हँपर (Studiowest Beauty Hamper) देऊ शकता. ज्यामध्ये लिपस्टिक, लिप ग्लॉस, आयशॅडो पॅलेट्स, आयलायनर या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Jan 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT