आजकालच्या डिजिटल युगात शुभेच्छा संदेश पाठवून एकमेकांची ख्याली खुशाली कळवता येते. यासाठीच मित्रमंडळी, नातेवाईकांना सकाळ, दुपार, संध्याकाळी आणि रात्री शुभविचार आणि शुभेच्छा संदेश पाठवले जातात. आज आपण पाहणार आहोत दिवसाचा उत्साह अधिक वाढवणारे काही शुभ दुपार मेसेज (good afternoon messages in marathi). जे तुम्ही तुमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्ससअॅपवरून तुमच्या आवडीच्या लोकांना पाठवू शकता. हे मजेस इतरांना प्रेरणा देणारे तर आहेतच पण यातून तुम्ही इतरांचा दिवस अधिक सुंदर करू शकता. यासाठीच वाचा हे गुड आफ्टरनून मेसेज मराठीतून (good afternoon marathi sms)
गुड आफ्टरनून मेसेज मराठीतून (Good Afternoon Messages In Marathi)
Good Afternoon Messages In Marathi
प्रियजनांची आपुलकीने विचारपूस करण्यासाठी त्यांना पाठवा हे गुड आफ्टरनून मेसेज
1. नातं तेच टिकतं, ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त
तक्रार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो… शुभ दुपार
2. गरज आणि प्रेम यात भरपूर अंतर असतं. काहींचे आयुष्य मात्र या दोन गोष्टींचा ताळमेळ बसवण्यातच निघून जातं.. शुभ दुपार
3. काळजी घेत जा स्वतःची कारण
तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील
पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही… शुभ दुपार
4. नेहमी आनंदात राहा
कारण तुला बघून
मीपण आनंदी होतो… शुभ दुपार
5. रखरखत्या उन्हात तू म्हणजे डेरेजार वृक्षाची छाया
कोसळत्या धारांमधून माझ्यावर असलेली आभाळाची माया… शुभ दुपार
6. जर तुम्हाला खरंच काहीतरी काम
करायचं असेल तर अनेक मार्ग सापडतील
पण काहीच करायचं नसेल
तर एकसुद्धा कारण पुरं पडेल… शुभ दुपार
7. चांगल्या माणसांवर कधीच अन्याय करू नका
कारण काच एकदा तुटली की तिचं हत्यार व्हायला वेळ नाही लागत… शुभ दुपार
8. सुगंध हा फक्त फुलापुरता नसतो,
तर तो एखाद्याच्या शब्दांनाही असतो… शुभ दुपार
9. आयुष्य केवळ जगून समजते
नुसतं वाचून, ऐकून आणि बघून ते कसं समजेल, त्यामुळे आयुष्यात अनुभव घ्या आणि मोठे व्हा…शुभ दुपार
10. सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी… शुभ दुपार
यासोबतच तुमची सकाळ बनवा अधिक सुंदर ‘शुभ सकाळ’ संदेशांनी (Good Morning Messages In Marathi)
शुभ दुपार शुभेच्छा मराठीतून (Good Afternoon Wishes In Marathi)
Good Afternoon Wishes In Marathi
जर एखाद्याला सकाळी शुभेच्छा द्यायला विसरला असाल तर तर पाठवा त्यांना या शुभ दुपार शुभेच्छा
1. तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल
तर कर्म एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही… शुभ दुपार
2. आजच्या दिवसांचा आनंद घ्या आणि मनासारखं जगा… शुभ दुपार
3. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा… माझ्या आयुष्यातील सुंदर व्यक्तीसाठी
4. सगळेच प्रश्न सुटत नाहीत. कारण काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात… शुभ दुपार
5. पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण पैशांची चोरी होऊ शकते मात्र ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही… शुभ दुपार
6. चांगल्या काळात हातत धरणं म्हणजे मैत्री नाही तर वाईट काळात हात न सोडणं म्हणजे मैत्री…. शुभ दुपार
7. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल तर तुमचं काम झालंच म्हणून समजा… शुभ दुपार
8. नेहमी अशीच हसत राहा कधी तुझ्यासाठी कधी माझ्यासाठी…. शुभ दुपार
9. काही विचार असे मनात येतात की ह्रदयाची स्पंदने वाढवून जातात… शुभ दुपार
10. या जगात अशी फक्त एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला यशाच्या शिखरापर घेऊन जाऊ शकते. आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात… शुभ दुपार
शुभ रात्री संदेश मराठीतून, प्रियजनांना द्या शुभेच्छा (Good Night Messages In Marathi)
शुभ दुपार सुविचार मराठीतून (Good Afternoon Thoughts In Marathi)
Good Afternoon Thoughts In Marathi
दिवसभरात तुमच्या मनात येणारे चांगले विचार पाठवा या शुभ दुपार शुभेच्छांच्या माध्यमातून
1. खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा
उपयोगी आहे तेच शिका, देशहिताचे आहे तेच करा… शुभ दुपार
2. लोक मागून बोलतच राहणार, सतत टीका करणार, पण तुम्ही तुमच्या कतृर्त्वाने तुमची जागा सिद्ध करा… शुभ दुपार
3. आठवण फक्त त्यांचीच काढली जाते जी व्यक्ती तुमच्या सतत ह्रदयात राहते… शुभ दुपार
4. माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणूसकी विसरू लागतो… शुभ दुपार
5. न मिळालेल्यया गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे आयुष्य होय… शुभ दुपार
6. काळजी ह्रदयात असते, शब्दांत नाही आणि राग शब्दात असतो ह्रदयात नाही.. शुभ दुपार
7. गरजेपुरती नाती टिकवायची सवय नाही माझी, एकदा नातं जोडलं की शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची सवय आहे… शुभ दुपार
8. जीवनात माझ्या आनंद आहे कारण तुम्ही सोबत आहात… शुभ दुपार
9. ना हार पाहिजे ना जीत पाहिजे… माझा परिवार आणि चांगल्या व्यक्तींची प्रेमाची साथ पाहिजे… शुभ दुपार
10. काही माणसं साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारांमध्ये तेज असते, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असते, आणि ह्रदयात स्नेहाचा धरा असतो.. माझ्या आयुष्यातील अशा व्यक्तीला दुपारच्या शुभेच्छा
सूर्यास्त कोट्सने करा तुमची संध्याकाळ रमणीय (Sunset Quotes In Marathi)
प्रिय व्यक्तीसाठी गुड आफ्टरनून मेसेज (Good Afternoon Marathi SMS For Lovers)
Good Afternoon Marathi SMS For Lovers
प्रिय व्यक्तीची दुपार खास करण्यासाठी त्यांना पाठवा हे गुड आफ्टरनून मेसेज
1. काही लोक म्हणतात की मैत्री म्हणजे प्रे
काही लोक म्हणतात मैत्री म्हणजे जीवन
मला वाटतं मैत्री ही केवळ मैत्री आहे
जिच्यापुढे प्रेम आणि जीवन दोन्ही फिकं पडेल… शुभ दुपार
2. सध्या ऊन खूप वाढलं आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी थंडगार आईस्क्रिम पाठवला आहे… शुभ दुपार
3. सूर्य कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणून तर संध्याकाळ त्याच्यासाठी इतकी नटून थटून तयार असते.. शुभ दुपार
4. आपल्या आयु्ष्यात येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, उत्साहाचा, आरोग्याचा, सुखाचा, समाधानाचा जावो हिच प्रार्थना… शुभ दुपार
5. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे आज मी आहे ही वृत्ती असेल माणसं आपोआप जोडली जातात… शुभ दुपार
6. आपलं जगणं जेवणातल्या मीठासारखं असावं… ते कधीच दिसत नाही पण त्याची कमी लगेच जाणवते… शुभ दुपार
7. वय आणि जीवन यांच्यात फक्त एकच फरक आहे,
जे मित्रांविना सरते ते वय आणि मित्रांसोबत सरते ते जीवन… शुभ दुपार
8. मोबाईल मध्ये आलेला मेसेज छोटासा असतो पण पाठवणारा तुमची मनापासून आठवण काढत असतो… शुभ दुपार
9. तुझी आठवण आणि माझा मेसेज
येणार नाही अस कधीच होणार नाही… शुभ दुपार
10. नेहमी तेच क्षण आठवतात ज्या क्षणांमध्ये आपलं काहीतरी हरवलेलं असतं… शुभ दुपार
गुड आफ्टरनून कोट्स (Good Afternoon Quotes In Marathi)
Good Afternoon Quotes In Marathi
एखाद्याला दुपारी विश करण्यासाठी बेस्ट आहेत हे गुड आफ्टरनून कोट्स
1. एखादी उदास दुपार तुम्ही उत्तम प्रकारे घालवू शकलात तर तुम्ही जगायचे कसं ते शिकलात – लिंग यूटांग
2. दुपार म्हणजे फक्त दिवसाचा मध्य नाही तर ही अशी एक वेळ आहे जिथे तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण करायची असतात आणि पुढे जायचे असते – शशिकांत शिंदे
3. दुपारच्या सुर्यासारखे प्रखर व्हा आणि त्याच्या प्रमाणे जीवनात आलेल्या प्रत्येकाला प्रोत्साहित करा. कारण पृथ्वीवर तुम्हाला मिळालेलं हे एक असं जीवन आहे जे तुम्हाला जमेल त्या मार्गाने जगत जायचं आहे – डेलना रोझ
4. भर दुपारी डोंगरावर एखाद्या कुत्र्यासोबत बसणं म्हणजे परत एडेनमध्ये जाण्यासारखं आहे, जिथे काहीही करणं कंटाळवाणं नसतं. कारण तिथे असते शांतता. – मिलान कुंदेरा
5. यशाची शिडी चढताना ती ज्या भिंतीवर टेकली आहे तिच्याकडे बघत वर जा… शुभ दुपार आणि शुभ दिवस- स्वाती खरे
6. विशिष्ठ परिस्थितीत दिवसाचे काही तास एका महत्त्वाच्या सोहळ्यासाठी द्यायला हवेत तो म्हणजे दुपारचा चहा – हेन्नी जेम्स
7. उन्हाळी दुपार आणि दुपारचा उन्हाळा हे दोन शब्द माझ्यासाठी इंग्रजी भाषेतील सर्वात दोन सुंदर शुब्द आहेत – हेन्नी जेम्स
8. गुड, बेटर , बेस्ट… जास्त घेऊ नका रेस्ट. जोपर्यंत तुमच्या गुडचे बेटरमध्ये आणि बेटरचे बेस्टमध्ये रूपांतर होत नाही… गुड आफ्टरनून – सेंट जेरोम
9. जर एखादी व्यक्ती भर दुपारी शांत बसली असेल तर ती तेव्हा नक्कीच एखाद्या रम्य स्वप्नात अडकली असेल – डॉडी स्मिथ
10. रणरणत्या सोनेरी दुपारची समाप्ती शांत जांभळ्या ढगांच्या सावलीत होते – डेरिअर अरसंद
You Might Also Like