ADVERTISEMENT
home / पालकत्व
Harmful Chemicals In Baby Diapers

डिस्पोझेबल डायपर्समधील घातक रसायनांमुळे होऊ शकतो बाळाच्या वाढीवर परिणाम 

हल्ली पालक बाळाचा जन्म झाल्यापासूनच त्याला डिस्पोझेबल डायपर घालू लागतात. बाहेर जाताना सोय म्हणून किंवा रात्री बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून डायपर वापरणे ठीक आहे पण बाळाला सतत डायपरमध्ये ठेवणे योग्य नव्हे. एक ते दोन वर्षांपर्यंत बाळाला डायपर घालतात. बाळाला डायपर घालणे अधिक सोयीचे असते आणि ते घातल्यानंतर बाळाला सांभाळणे सोपे जाते पण या डायपरच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे. बाळ जितके मऊ सुती कपड्यांमध्ये आरामशीर असते तितके ते या डिस्पोझेबल डायपरमध्ये कम्फर्टेबल नसते. तसेच डायपर बनवताना अनेक प्रकारची रसायने वापरली जातात आणि जेव्हा बाळ त्या रसायनांच्या संपर्कात येते तेव्हा त्याचा बाळाच्या नाजूक त्वचेवरही परिणाम होतो. 

डायपरमध्ये आढळली हानिकारक रसायने 

Harmful Chemicals In Baby Diapers
Harmful Chemicals In Baby Diapers

एका चाचणीत असे दिसून आले की हल्ली बहुतेक पालक डिस्पोजेबल डायपर खरेदी करण्यास प्राधान्य देतात, परंतु त्यामध्ये रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फ्रान्समधील ANSES नावाच्या एका एजन्सीने डिस्पोजेबल डायपरच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या ब्रँडची चाचणी केली तेव्हा त्यांना संपूर्ण युरोपमध्ये विकल्या जाणार्‍या अनेक ब्रँडच्या डायपरमध्ये “अत्यंत गंभीर आणि धोकादायक” रसायने आढळली. बहुतेक रसायने हॉर्मोन्सच्या कार्यात व्यत्यय आणतात, याचा अर्थ ते बाळासाठी सुरक्षित नाहीत. याआधी भारतातही या डायपरची चाचणी घेण्यात आली होती. दिल्लीस्थित एका संस्थेने अनेक ब्रँडेड डिस्पोजेबल डायपर्सची चाचणी केली तेव्हा असे आढळून आले की त्यामध्ये phthalates आढळतात, ज्यामुळे बाळाच्या आरोग्यावर गंभीर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. या चाचणीत प्रयोगशाळेत 19 ब्रँडच्या 20 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान, डायपरमध्ये phthalates 2.36 ppm (भाग प्रति दशलक्ष) पासून 302.25 ppm पर्यंत आढळले जी निश्चितच चिंतेची बाब आहे. लहान मुलांसाठी असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये या रसायनाचा वापर प्रतिबंधित आहे. असे असूनही डायपरमध्ये phthalates चे एवढे जास्त प्रमाण असणे धोकादायक आहे.

रसायनांचा होतो बाळांच्या आरोग्यावर वाईट परिणाम 

Harmful Chemicals In Baby Diapers
Harmful Chemicals In Baby Diapers

डायपर बनवताना त्यात अनेक रसायने वापरली जातात. यापैकी, phthalates हे मुख्य आहेत. हे असे एक रसायन आहे जे ओलावा मिळाल्यानंतर डायपरमधून बाहेर पडते आणि नंतर बाळाच्या त्वचेच्या संपर्कात येते. जेव्हा ते त्वचेच्या सतत संपर्कात असते तेव्हा या रसायनामुळे कर्करोग, मूत्रपिंडाच्या समस्या,  हॉर्मोनल इम्बॅलन्स, रेप्रोटॉक्सिक इफेक्ट (प्रजननक्षमतेवर परिणाम), न्यूरो डेव्हलपमेंट समस्या, मेटाबॉलिक विकार, मधुमेह आणि ऑटिझम यासारख्या समस्या होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हे स्पष्ट केले आहे की लहान मुलांवर रसायनांचा फार लवकर परिणाम होतो म्हणूनच लहान मुलांचा हानिकारक रसायनांशी कमीत कमी संपर्क येईल असा प्रयत्न करायला हवा. 

सतत डायपर वापरल्याने होणारे इतर त्रास 

डायपरमध्ये वापरण्यात येणारी रसायनांचा बाळाला त्रास होतोच. पण याशिवाय बाळांना सतत डायपर घातल्यास त्यांना पुढील त्रास त्रास देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ, डायपरमुळे बाळाला ऍलर्जी होऊ शकते.  डायपर रॅशेस बहुतेक वेळा ओला लंगोट (डायपर) बराच वेळ तसाच राहिल्याने किंवा डायपर उशिरा बदलल्याने , त्वचा संवेदनशील असल्याने आणि बाळाच्या नाजूक त्वचेवर घर्षण झाल्याने होऊ शकतात.डायपर बनवण्यासाठी काही डायपर कंपन्या अनेकदा सिंथेटिक फायबर, रंग किंवा इतर कठोर रासायनिक उत्पादने वापरतात. ज्यामुळे बाळाच्या संवेदनशील त्वचेला ऍलर्जी होऊ शकते. डायपरच्या अतिवापरामुळे लहान मुलांना  डायपर रॅशेस येतात. डायपर अशा सामग्रीचे बनलेले असते ज्यात तुमच्या बाळाचे मूत्र शोषले जाते. हे बाळाच्या डायपरमधील हवेच्या सहज प्रवाहात अडथळा आणू शकते, ज्यामुळे डायपरमध्ये जीवाणू आणि इतर जंतूंची वाढ होते व त्यामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच ज्या बाळांना सतत डायपरमध्ये राहण्याची सवय असते त्यांना पुढे जाऊन ‘potty train’ करणे खूप अवघड जाते. 

ADVERTISEMENT

म्हणूनच बाळांना सतत डायपर घालू नये. 

Photo Credit – istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

27 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT