बऱ्याचदा आपल्याला दुकानात अथवा अगदी ऑनलाईनही एखादी लिपस्टिकची शेड (Lipstick Shade) आवडते. पण ती लिपस्टिक जेव्हा आपण ओठांना लावतो आणि त्याची शेड अर्थात त्याचा रंग आपल्या स्किनटोनशी अथवा आपल्या ओठांशी जुळत नाही हे लक्षात येतं तेव्हा नक्कीच हिरमोड होतो. मग अशावेळी आपण ती लिपस्टिक तशीच ठेवतो आणि त्याचा वापर केला जात नाही. पैसे फुकट गेल्याचाही नक्कीच आपल्याला त्रास होतो. पण जर तुमच्याकडून चुकीची शेड निवडली गेली असेल तर तुम्ही त्याचा नक्की वेगळ्या प्रकारे वापर करू शकता. तुम्ही या चुकीच्या शेडचा वापर कशा पद्धतीने करावा याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून दिली आहे. तुम्हीही आता तुमची अशी चुकीची लिपस्टिक शेड योग्य करून वापरू शकता.
लेअर ग्लॉसचा करा वापर (Matte Lipstick)
तुम्ही एखादी मॅट लिपस्टिकची खरेदी केली असेल. पण ही लिपस्टिक इतकी मॅट असेल की लावल्यानंतर लगेच ओठ सुकत असतील तर तुम्ही लिपस्टिक लावल्यानंतर त्वरीत एक लेअर ग्लॉस लावा. जर तुमच्याकडे लिप ग्लॉस नसेल तर तुम्ही लिपस्टिकवर ब्रशने पेट्रोलियम जेली लावा. यामुळे तुमचे ओठ अधिक मऊ, मुलायम आणि चमकदार दिसतील. तसंच तुमचे ओठ सुकणार नाहीत.
सणासाठी करिना कपूरप्रमाणे दिसायचं असेल तर वापरा अशी लाल लिपस्टिक
ग्लॉसी लिपस्टिक असल्यास (Glossy lipstick)
तुम्ही घेतेलल्या लिपस्टिकचा शेड जास्तच ग्लॉसी असेल तर तुम्ही ग्लॉसी लिपस्टिक ओठाला लावल्यानंतर त्यावर लिप लायनर लावा. असे केल्याने मॅट लुक क्रिएट होतो. तसंच लिपस्टिक जास्त काळ टिकून राहते. ग्लॉसी लिपस्टिक तुम्ही नुसती लावली तर कदाचित जास्त काळ टिकत नाही. पण जर तुम्ही असं करून पाहिलं तर तुम्हाला नक्की त्याचा चांगला अनुभव येईल.
गुलाबी लिपस्टिक करायची असेल खरेदी तर हे शेड्स आहेत बजेटमध्ये
अत्यंत लाईट शेड असेल तर (Dull or light lipstick shade)
तुम्ही बाजारात गेल्यानंतर एखादी शेड तुम्हाला हाताला लावल्यानंतर त्याचा शेड आवडतो. पण जेव्हा तुम्ही घरी येता आणि ती लिपस्टिक वापरता आणि ओठांना लावल्यावर कळतं की, ही शेड अत्यंत लाईट आहे आणि दिसतच नाहीये, तेव्हा तुम्ही लिपस्टिक लावण्याच्या आधी अथवा नंतर लिप लायनरचा वापर करा. यामुळे शेड अधिक गडद दिसण्यास मदत मिळते.
गडद शेड असल्यास (Dark Lipstick Shade)
कधी कधी कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन अथवा काहीतरी नवीन ट्राय करायचे म्हणून एखादी गडद शेड आपण उचलून आणतो. पण ती लावल्यानंतर आपल्याला ही शेड चांगली वाटत नाही असं वाटतं. मग असं असेल तेव्हा ही लिपस्टिक लावा आणि त्यावर टिश्यू पेपर ओठांच्या मध्ये ठेऊन वर प्रेस करा. यामुळे अधिक प्रमाणात लागलेली लिपस्टिक निघून जाते. असं केल्याने ओठांवर केवळ मूळ लिपस्टिकचा हलकासा रंग राहतो आणि ओठ सुंदर दिसतात. गडद लिपस्टिक तुम्ही ब्रशने लाऊ शकता. यामुळे तुम्ही ओठांना एक हलकासा पातळ लेअर देऊ शकता. तसंच यावर कोणती तरी तुम्ही लाईट शेड लिपस्टिक लावा आणि मिक्स करा. दोन शेड्स ब्लेंड केल्यानंतर लिपस्टिकचा चांगला इफेक्ट तुम्हाला मिळतो. उदाहरणार्थ गडद ब्राऊनवर तुम्ही लाईट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली तर या दोन्ही शेड्स मिळून एक खूपच स्टायलिश आणि युनिक शेड तयार होते. गडद रंगाची लिपस्टिक लाईट करण्यासाठी तुम्ही गुलाबी आणि पिच या दोन्ही शेड्सचा वापर करू शकता. यामुळे गडद लिपस्टिकचा रंग बदलतो आणि ती अधिक चांगली दिसते.
स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी
कन्सीलरसह करा ब्लेंड (Blend with concealer)
तुम्हाला जर एखादी गडद लिपस्टिकची शेड चुकीची वाटत असेल तर तुम्ही ती लिपस्टिक शेड लाईट करण्यसाठी कन्सिलरचा वापर करू शकता. कन्सीलरसह ब्लेंड करून तुम्ही लिपस्टिकची शेड बदलू शकता. ही शेड अधिक चांगली दिसते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक