ADVERTISEMENT
home / आरोग्य
तुमचे इनरवेअर्स ‘एक्सपायर्ड’ झाले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा

तुमचे इनरवेअर्स ‘एक्सपायर्ड’ झाले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा

इनरवेअर्स आणि एक्सपायर्ड  हा काय प्रश्न आहे असे तुम्हाला वाटत असेल पण माझ्यासाठी माझे इनरवेअर्स हा जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यासारख्या कित्येकींसाठी तो असेल. पण तुम्ही घालत असलेले इनरवेअर्स कितीही चांगले असले आणि तुम्हाला कितीही कम्फर्टेबल असले तरी तुम्हाला ते एक्सपायर्ड झालेत की नाहीत हे कळून घेणे गरजेचे असते आणि ते एक्सपायर्ड झाले आहेत हे कळाल्यानंतर टाकून देणे गरजेचे असते. कित्येक जणींना एखादी इनरवेअर वर्षानुवरर्षे घालण्याची सवय असते. तुमच्याही कपाटात आहेत का असे इनरवेअर? जे एक्सपायर्ड झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात मदत करणार आहोत.

असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज, वाचा सोप्या टीप्स

कसे ओळखाल एक्सपायर्ड इनरवेअर्स ?

सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमचे कपाट उघडा. तुमच्या इनरवेअर्स बाहेर काढा. शक्य असेल तर प्रत्येक ब्रा आणि पँटी घालून  बघण्याची वेळ आली आहे.

ADVERTISEMENT

घट्ट आणि टोचणाऱ्या ब्रा

प्रत्येक ब्रँडनुसार ब्रा ची फिटींग वेगळी असली तरी देखील त्याच्या फिटींगमध्ये कालांतराने बदल होत जातात. कॉटन मटेरिअलच्या ब्रा या श्रींक होतात आणि त्या तुम्हाला घट्ट बसू लागतात. विशेषत: ब्रेस्टकडील भाग, ब्राचे पट्टे अधिक टोचू लागतात. तर  सिंथेटीक मटेरीअलच्या ब्रा असतील तर त्या मागून वर येतात. त्यामुळे तुम्हाला त्या सततत ओढाव्या लागतात. जर या ब्रा वायर्ड असतील तर सांगालयाच नको. त्या ब्रेस्टच्या खाली टोचत राहतात. तर तुमच्या अशा ब्रा एक्सपायर्ड झालेल्या आहेत.

old bra2

सैल आणि न बसणाऱ्या पँटी

ADVERTISEMENT

पँटीच्या बाबतीतही तसेच आहे. जर पँटी खूप जुन्या झाल्या तर त्या  एक तर सैल होतात. नाही तर घट्ट होतात आणि मग त्या जांघांना सतत लागत राहतात. सिंथेटीक पँटी या कालांतराने चुरगळू लागतात. तर होजिअरी मटेरिअलच्या पँटी या कालांतराने सैल होतात. जर अशा पँटी तुमच्या कपाटात असतील तर त्या एक्सपायर्ड झालेल्या आहेत.

old innewear fi %281%29

तुमच्या इनरवेअरचे आयुष्य किती?

 तुम्ही कितीही महागडे इनरवेअर घेतले तरी त्याचे आयुष्य हे ६ महिने ते १ वर्ष इतकेच असते. त्यापेक्षा अधिक काळासाठी इनरवेअर वापरणे चांगलेच नाही. अगदी ब्रा आणि पँटी या दोघांचा विचार केला तर सगळ्यात आधी तुम्हाला वापरातून बंद करायच्या असतात त्या पँटी… कारण त्यांचा व्हजायनाच्या अगदी जवळ असतात. महिलांनी आरोग्याची काळजी घेताना व्हजायनाची काळजी घेणे देखील गरजेचे असते. त्यामुळे पँटी या ६ महिन्यांनी बदलायलाच हव्यात असा आम्ही तुम्हाला सल्ला देऊ.  महिलांसाठी स्तनाचे आयुष्यही तितकेच महत्वाचे असते. जर तुमची ब्रा अगदीच चांगली असेल तर ब्रा या जास्तीत जास्त १ वर्ष वापरण्याचा सल्ला देऊ.

ADVERTISEMENT

 असे निवडा परफेक्ट इनरवेअर

जास्ती वेळ इनरवेअर टिकवण्यासाठी

वर आम्ही तुम्हाला एक्सपायर्ड झालेल्या इनरवेअर टाकण्याचा सल्ला देत आहोत  आणि आता जास्ती काळ इनरवेअर टिकवण्याचा दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला विरोधाभास वाटेल. पण सहा महिने हा छोटा कालावधी नाही. त्या कालावधीत तुम्ही तुमच्या इनरवेअर्सची काळजी घेणे गरजेचे असते.

५ मिनिटात मिळेत तुमच्या स्तनांना आकर्षक आकार

ADVERTISEMENT

इनरवेअर्स धुताना

  • कपड्याच्या साबणाने इनरवेअर धुणे टाळा. त्याऐवजी तुम्ही अंगाचा साबण लावून ते धुवा.
  • इनरवेअरला ब्रश लावू नका. कारण त्यामुळे त्यांचा आकार बदलतो.
  • अनेकांना कपडे धोपटण्याची सवय असते. इतर कपड्यांसोबत ते इनरवेअरदेखील धोपटतात. त्यामुळे ब्राचे हुक तुटू शकतात आणि फिटींगबाबत तर काही सांगायलाच नको. त्यामुळे हलक्या हाताने ब्रा आणि पँटी धुवा
  • शॉर्टकर्ट म्हणून तुमचे इनरवेअर वॉशिंगमशीमध्ये धुवू नका.

अशी लावा जुन्या इनरवेअर्सची विल्हेवाट

old bra

अनेक जणींना इनरवेअर्स फेकायचे कसे ते कळत नाही. तर तुम्ही जुने इनरवेअर्स असेच न फेकता त्यांचे कात्रीने बारीक बारीक तुकडे करा. त्यात तार असेल तर ती वेगळी काढा. आणि बारीक केलेले तुकडे एका कागदी किंवा कापडी पिशवीत भरुन फेकून द्या. म्हणजे त्या रस्त्यावर इथे तिथे पडणार नाही.(

ADVERTISEMENT

(फोटो सौजन्य- Instagram)

25 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT