गोड पदार्थांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी साखर अथवा गुळाचा वापर केला जातो. साखर शरीरासाठी अपायकारक असल्यामुळे आजकाल गुळ (Jaggery Information In Marathi) बऱ्याच खाद्यपदार्थांत आवर्जून वापरला जातो. कारण गुळामुळे पदार्थ जितका गोड होतो त्यापेक्षा अधिक आरोग्यदायी होतो. सेंद्रीय पद्धतीने तयार केलेला शरीरासाठी अधिक फायदेशीर असतो. गुळ आणि साखर हे दोन्ही पदार्थ ऊसापासून तयार केले जातात मात्र तरिही या दोन्ही पदार्थांचे शरीरावर होणारे परिणाम हे वेगवेगळे असतात. हा एक निसर्गाचा खूप मोठा चमत्कारच आहे. गुळाचा वापर स्वयंपाकात विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण गुळ उष्ण असल्यामुळे त्यामुळे शरीराला पुरेशी उष्णता मिळते. गुळात व्हिटॅमिन्स, लोह, ग्लुकोज, चुना, फॉफ्सरस, पोटॅशियम पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे गुळ शरीरासाठी पौष्टिक पदार्थ समजला जातो. त्यामुळे अनेक घरात आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा गुळाचा चहा पिण्यात येतो.
आरोग्यसाठी गुळाचे फायदे (Jaggery Benefits In Marathi For Health)
गुळाचे फायदे – Jaggery Benefits In Marathi For Health
अशक्तपणा कमी होतो
गुळामध्ये लोह आणि फॉलेट असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. जर तुमच्या शरीरात अशक्तपणा अथवा अॅनिमियामुळे लाल रक्त पेशी कमी झाल्या असतील तर गुळ खाण्याचा चांगला फायदा (Gul Benefits In Marathi) होऊ शकतो. नियमित गुळ सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.
शरीराला पुरेशी उष्णता मिळते
थंडीचे प्रमाण वाढल्यास शरीराला सुरक्षित राहण्यासाठी उष्णतेची गरज असते. अशा वातावरणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असे आजार होतात. मात्र गुळातील अॅंटिऑक्सिडंटमुळे (Gul Benefits In Marathi ) तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. गूळ खाण्याचे फायदे असल्याने थंडीत गुळ घातलेले लाडू अथवा पेज केली जाते.
पचन मदत होते
गुळ हा एक पाचक पदार्थ आहे. त्यामुळे गूळ खाण्याचे फायदे अनेक आहेत. यासाठी जेवणानंतर अनेक ठिकाणी गुळ खाण्याची पद्धत (Jaggery Information In Marathi) आहे. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत सुरू राहते आणि तुम्हाला अपचनाचा त्रास कमी होतो.
वाचा – आमचूर पावडरचे फायदे (Benefits Of Mango Powder In Marathi)
गुळाचे फायदे – Benefits Of Jaggery In Marathi
वजन कमी होण्यास मदत होते
गोडपदार्थांचे अती सेवन केल्यामुळे वजन वाढते हे तर तुम्हाला माहीतच असेल मात्र गुळाचा याबाबत अगदी उलट परिणाम होतो. गुळ नियमित खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते (Gul Benefits In Marathi ). यासाठी आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करा.
इंन्स्टंट उर्जा मिळते
पूर्वी बाहेरून घरी आल्यावर अथवा घरी पाहुणे आल्यावर गूळ (Benefits Of Jaggery In Marathi) आणि पाणी देण्याची पद्धत होती. कारण थकून भागून घरी आलेल्या व्यक्तीला गुळ आणि पाणी पिण्यामुळे त्वरीत फ्रेश वाटत असे. यासाठीच थकवा अथवा अशक्तपणा जाणवत असेल तर पटकन गुळाचा एखादा छोटासा खडा आणि पाणी घ्यावे त्यामुळे तुम्हाला इंन्स्टंट शक्ती मिळू शकते.
सांधेदुखी कमी होते
जर तुम्हाला सतत सांधेदुखीचा त्रास होत असेल तर दुध आणि गुळ खाल्यास चांगला फायदा (Benefits Of Jaggery In Marathi) होऊ शकतो. या मिश्रणात थोडेसे आले मिसळले तर अतिशय उत्तम परिणाम मिळेल. कारण हे तिनही पदार्थ तुमची हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत.
महिलांना मासिक पाळीत आराम मिळतो
मासिक पाळी आणि त्या काळात होणाऱ्या वेदना याचा अनुभव प्रत्येत स्त्रीला घ्यावाच लागतो. मासिक पाळीत येणारे क्रॅंम्प कमी करण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन नियमित केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
हे ही वाचा –
जाणून घ्या Water Birth Delivery बद्दल
असतील असे त्रास, तर अजिबात खाऊ नये लसूण!
तुमच्याही पिरेड्सच्या तारखा नेहमी चुकतात..जाणून घ्या कारणं आणि घरगुती इलाज