ADVERTISEMENT
home / Diet
Health Benefits Of Soaked Walnut in Marathi

दररोज खा दोन भिजवलेले अक्रोड, जाणून घ्या फायदे

पौष्टीक आणि संतुलित आहार निरोगी जीवनशैलीसाठी महत्त्वाचा आहे. आहार परिपूर्ण करण्यासाठी त्यात सुकामेव्याचा समावेश असायला हवा. दररोज मूठभर सुकामेवा खाण्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळू शकते. सुकामेव्यातही अक्रोड असायलाच हवेत. कारण अक्रोडचे अनेक फायदे शरीरावर होत असतात.  मेंदू तल्लख राहण्यासाठी, शरीराची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये कॅल्शिअम, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, पोटॅशिअम, लोह, फॉलिक अॅसिड, तांबे, फॉस्फरस, सेलेनिअम, झिंक भरपूर प्रमाणात असतं. मात्र अक्रोड खाण्याचा सोपा मार्ग म्हणजे ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी चावून खाणे. कारण यामुळे त्यातील पोषक मुल्ये शरीराला चांगल्या पद्धतीने मिळतात. कोणताही पदार्थ शिजवण्यापूर्वी अथवा खाण्यापूर्वी धुणे आणि भिजत ठेवणे ही आहारशास्त्रातील एक जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. ज्यामुळे प्राचीन काळापासून अक्रोड भिजवून मग खाल्ले अथवा दूधात भिजवून मग स्वयंपाकात वापरले जातात. तसंच वाचा या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे – Health Benefits Of Soaked Walnut in Marathi

जर तुम्ही दररोज दोन भिजवलेले अक्रोड खाल्ले तर तुमच्या आरोग्याचं अधिक रक्षण होऊ शकतं. शिवाय भिजवलेले अक्रोड चावण्यास सोपे आणि पचायला हलके असतात.  यासाठी जाणून घ्या याचे फायदे

  • मधुमेहींनी जर दररोज भिजवलेले अक्रोड खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भिजवलेले अक्रोड फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत होते.
  • वजन कमी करण्यासाठी अक्रोड नेहमी भिजवून मगच खावेत. कारण त्यामुळे त्यातील प्रोटीन्सचे प्रमाण वाढते आणि कॅलरिज कमी होतात.
  • भिजवलेल्या अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होते. 
  • भिजवलेल्या अक्रोडमध्ये अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते ज्यामुळे तुमची हाडे मजबूत आणि लवचिक होतात.
  • हॉर्मोन्सचे कार्य संतुलित राहण्यासाठी याचा नक्कीच चांगला फायदा होतो, यासाठी महिलांनी नियमित भिजवलेले अक्रोड खावे.
  • व्यायामा आधी आणि नंतर भिजवलेले अक्रोड खाण्यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते.

आम्ही अक्रोड भिजवून खाण्याचा सूचवलेला सल्ला तुम्हाला कसा वाटला आणि त्याचे तुम्हाला काय चांगले फायदे मिळाले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT