ADVERTISEMENT
home / Fitness
आंबट चिंच कशी ठरते फायदेशीर, जाणून घ्या (Tamarind Benefits)

आंबट चिंच कशी ठरते फायदेशीर, जाणून घ्या (Tamarind Benefits)

आपल्याकडे चिंचेचा उपयोग अगदी पूर्वपरंपरागत करण्यात येत आहे. याचा आंबटगोड स्वाद कोणत्याही पदार्थाला अधिक रूचकर बनवतो. याचा उपयोग चटणी स्वरूपात अथवा पाणी पुरीमध्ये आंबटपणा आणण्यासाठी, आमटीमध्ये अथवा अनेक खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण याशिवाय चिंच अनेक आजारांपासूनही आपलं रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरते याची तुम्हाला माहिती आहे का? यामुळेच चिंचेचा उपयोग हा नियमितपणे आजतागायत करण्यात येतो. चिंचेमध्ये नक्की कोणकोणते गुण आहेत आणि कशा प्रकारे याचा फायदा होतो (Tamarind Benefits) हे आपण या लेखातून पाहणार आहोत.

चिंचेचे औषधीय गुण (Medical benefits)

चिंचेचे औषधीय गुण (Medical benefits)

Freepik.com

ADVERTISEMENT

चिंच हे खरं तर आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा वापर पोटातील दुखणे, अपचन, बद्धकोष्ठ, पोटात जंत होणे यावर करता येतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्या शरीरावरील जखम भरणे, मलेरिया, ताप, सूज आणि डोळ्यांच्या आजारावरही हे लागू होते. चिंचेतील औषधीय गुण हे यातील आढळणारे फायटोकेमिकल्समुळे असतात. तसंच चिंचेच्या झाडामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिऑक्सिडंट, अँटिमलेरियल आणि अँटिअस्थेमॅटिक असे प्रभावी गुण आहेत. इतकंच नाही तर चिंचेमध्ये लिव्हर, हृदय आणि पोटाचे संरक्षण करण्याचे गुणही आढळतात. चिंचेचे अनेक फायदे शरीर निरोगी ठेवण्यासाठी होतात. पण याचे अति प्रमाणही चांगले नाही. चिंच हे नैसर्गिक औषध आहे. 

चिंचेतील पोषक तत्व (Tamarind nutritional value)

चिंचेतील पोषक तत्व (Tamarind nutritional value)

Freepik.com

ADVERTISEMENT

चिंचेतील औषधीय गुण तर आपण जाणून घेतले पण चिंचेमध्ये असे कोणते पोषक तत्व आहेत जे  शरीराला चांगले पोषण मिळवून देतात हे जाणून घेणेही गरजेचे आहे. चिंचेमध्ये पाणी, प्रोटीन, लिपीड (फॅट), कार्बोहायड्रेट,  साखर, लोह,  कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटॅशियम, जिंक, विटामिन सी, थियामिन, विटामिन बी, नियासिन या सगळ्या पोषक तत्वाचा समावेश असतो. चिंचेमधील हो पोषक तत्व आपल्या शरीराला उत्तम पोषण मिळवून देतात. म्हणूनच अनेक पदार्थांमध्ये याचा उपयोग केला जातो. 

चिंचेचे फायदे (Benefits of tamarind)

चिंचेचे केवळ खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरण्यापुरता फायदा नाही. शरीरासाठीही याचा फायदा होतो. मात्र याचा फायदा करून घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चिंच ही शरीरासाठी उपयुक्त असते. पण त्याचा गैरवापर अथवा अति वापर नक्कीच करू नका. याचे कोणकोणते फायदे होतात ते पाहूया.  

वजन कमी करण्यासाठी (Weight loss)

वजन कमी करण्यासाठी (Weight loss)

ADVERTISEMENT

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी चिंचेच्या  बियांचा उपयोग होऊ शकतो. एका शोधानुसार चिंचेच्या  बियांमध्ये ट्रिप्सिन इन्हिबिटर गुण अर्थात प्रोटीन वाढविण्यासाठी आणि नियंत्रित करण्याचे गुण आढळतात. शोधानुसार चिंचेच्या बियांमध्ये आढळणारे हे खास गुण मेटाबॉलिक सिंड्रोम (साखर, हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हाय ट्रायग्लिसराईड्स आणि जाडेपणासंबंधी समस्या) दूर करण्याची क्षमता राखतात. तसंच यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. चिंचेच्या  बियांशिवाय चिंचेचा कोळ अर्थात चिंचेचा अर्कही वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित शोधानुसार चिंचेच्या अर्कामध्ये अँटिओबेसिटी गुण असतो.  त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. 

पचनक्रियेसाठी चिंचेचा फायदा (Pachan Kriya)

विशेषज्ज्ञांनुसार चिंचेमध्ये असे काही पोषक तत्व असतात जे पचनशक्तीसाठी उपयुक्त ठरतात. अर्थात डायजेस्टिव्ह ज्युस बनविण्यासाठी  याचा उपयोग होतो.  यामुळे पचनक्रिया उत्तम होते आणि पहिल्यापेक्षा योग्य पद्धतीने पोटातील पचनक्रिया काम करते. तसंच चिंचेमध्ये औषधीय गुण असतात जे पाचनसंबंधी समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरतात असे म्हटले जाते. त्यामुळेच चिंचेची चटणी अथवा काही पदार्थांमध्ये चिंचेचा सर्रास वापर करण्यात येतो. जेणेकरून कोणताही गॅस निर्माण करणारा पदार्थ असेल तर तो चिंचेने व्यवस्थित पचू शकेल. 

हृदयासाठी उपयुक्त (Heart)

हृदयासाठी चिंच खाण्याचा नक्कीच फायदा होतो. कोरोनरी हार्ट डिसीझ अर्थात हृदयासंबंधी आजारासाठी फ्री रॅडिकल्सना जबाबदार ठरवण्यात येते. तर चिंचेमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुण हे फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून हृदयाचे रक्षण करतात.  एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधानुसार, चिंचेच्या अर्काचे सेवन आर्टरी वॉल्समधील फॅट आणि प्लांक जमण्याच्या  क्रियामध्ये बाधा आणू शकते.  ज्यामुळे एथरोस्केलरोसिससंबंधित हृदय रोगाचा धोका अधिक वाढतो.  तसंच या शोधामध्ये सांगण्यात आले आहे की, हायपोकोलेस्टेरोलेममिकच्या प्रभावामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी  मदत होते. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे चिंचेचा असा फायदा करून घेता  येतो. 

ADVERTISEMENT

मधुमेहावर गुणकारी (Diabetes)

मधुमेहावर गुणकारी (Diabetes)

Shutterstock

चिंचेच्या बियांच्या अर्कामध्ये जास्त प्रमाणात पॉलीफेनॉल आणि फ्लवोनॉईड आढळते.   यामुळे चिंचेच्या बियांमधील अर्कामध्ये अँटिडायबिटीक गुण आढळतात. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणणे सोपे होते.  यामुळे साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.  त्यामुळे तुम्ही मधुमेह असणाऱ्या रूग्णांना चिंचेच्या कोळाचे पाणी अथवा चिंचेची चटणी असे पदार्थ नक्कीच देऊ शकता. 

हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण आणण्यासाठी (Heartbeat control)

चिंचेमध्ये असणारे औषधीय गुण हे हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त ठरते. विशेषत्ज्ञांनुसार चिंचेमध्ये कॅल्शिमयचे प्रमाण आढळते. वास्तविक कॅल्शिमय हे हृदयाच्या ठोक्याची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे चिंचेचा उपयोग करून बिघडलेले हृदयाच्या ठोक्याची प्रक्रिया तुम्ही काही प्रमाणात सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता. पण याबाबत अधिक शोधाची आवश्यकता आहे.

ADVERTISEMENT

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Immunity boost)

आजारांशी दोन हात करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. जर तुम्ही चिंच चावून खाल्ली किंवा त्याचा आहारात तुम्ही समावेश केला तर तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात चिंंचेचा समावेश करायला हवा.

कावीळीवर उत्तम उपाय (Jaundice)

चिंचेत हेप्टप्रोटेक्टिव्ह अर्थात लिव्हरची सुरक्षा करणारे गुण आढळतात. त्यामुळे चिंचेचा लिव्हरसाठी चांगला उपयोग होतो. एका शोधामध्ये सिद्ध झाल्यानुसार, चिंचेच्या पानांमध्येही हेप्टोप्रोटेक्टिव्ह गुण असतात. ब्रेस्ट मिल्क वाढविण्यासाठीही उपयोगी ठरतात चिंचेची पाने जे हानिकारक तत्वांपासून लिव्हरची सुरक्षा करतात. या पानांपासून बनविलेल्या काढ्याने कावीळ आणि हेपेटायटिस रोग बरे होतात. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. मात्र याचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

सूज आल्यास गुणकारी (Swollen)

सूज आल्यास गुणकारी (Swollen)

Shutterstock

ADVERTISEMENT

जुनी सूज ही अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते.  यापासून वाचण्यासाठी चिंचेचा पारपंरिक पद्धतीने उपयोग करण्यात येऊ शकतो. चिंचेचे कोळ,  पाने, बिया, साल आणि मुळांच्या अर्कापासून सूज कमी करण्यासाठी आणि त्रास कमी करण्यासाठी तुम्ही औषध तयार करू शकता. वैज्ञानिक शोधानुसार,  चिंचेमध्ये असणाऱ्या अल्कालोईड्स, फ्लेवोनॉईड्स, टॅनिन, फिनॉल, सॅपोनिन आणि स्टेरॉईडसारख्या यौगिक अँटिइन्फ्लेमेटरी प्रभावाने सूज आल्यास त्यावर गुणकारी ठरते. यामुळे त्रासही कमी होतो. 

मलेरियावरही उपायकारक (Malleria)

मलेरियावरही उपायकारक (Malleria)

Shutterstock

मलेरियापासून वाचण्यासाठीही तुम्ही चिंचेचा फायदा करून  घेऊ शकता. वास्तविक एका शोधानुसार, यामध्ये अँटिमलेरियल प्रभाव असतो. त्यामुळे प्लाज्मोडियम फॉल्सीपेरम नावाच्या पॅरासाईटविरुद्ध याचा उपयोग होतो.  त्यामुळे जेव्हा मलेरियाची साथ असेल तेव्हा याचा प्रभाव चांगला दिसून येतो. त्यावेळी  जेवणात चिंचेचा वापर वाढवावा. 

ADVERTISEMENT

उच्च रक्तदाबावर फायदेशीर (High blood pressure)

रक्तदाब नियंत्रणात राखण्यासाठी कोलेस्ट्रॉल प्रोफाईल योग्य असणे  गरजेचे आहे. त्यासाठी चिंचेचा उपयोग होतो.  चिंचेमध्ये असणारे पोषक तत्व हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. कोलेस्ट्रॉल वाढले तर उच्च रक्तदाबाचा त्रास आणि धोका वाढतो. त्यामुळे चिंचेची मदत घ्यावी. चिंचेचे सेवन हे डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तर एका शोधानुसार, साधारण रोज वीस ग्रॅम चिंचेचे सेवन केल्याने रक्तदाब, जाडेपणा, कंबरेवरील चरबी आणि सीरम लिपीड यामध्ये  जास्त फरक जाणवलेला नाही. त्यामुळे यावर सध्या शोध चालू आहे.  

पोटदुखीवर उत्तम (Stomach pain)

पोटदुखीवर उत्तम (Stomach pain)

Shutterstock

चिंचेच्या सेवनामुळे लेक्सिटिव्ह प्रभाव जाणवतो. ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते. तसंच हे पोटदुखीपासून सुटका मिळवून देते. विशेषतः चिंचेचा अर्क हा बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवून देतो. चिंच  ही जगभरात आपल्या लॅक्सेटिव्ह गुणांसाठी प्रसिद्ध आहे. याच्या सेवनाने मलत्याग करायला सोपे जाते. त्यामुळे चिंच खाण्याने पोटाला आराम मिळतो.  

ADVERTISEMENT

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी (Skin exfoliate)

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी (Skin exfoliate)

Shutterstock

चिंच खाण्याने त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी आणि त्वचा उजळ करण्यासाठीही फायदा होतो. विशेतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार चिंचेच्या आतील भागामध्ये अल्फा हायड्रॉक्सिल अॅसिड आढळते जे डेड स्किन सेल्सना त्वचेच्या बाहेर काढण्यास उपयोगी ठरते. त्यामुळे त्वचा एक्सफोलिएट होऊन अधिक उजळलेली दिसून येते. याशिवाय चिंचेच्या अर्कामध्ये टार्टरिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड, सायट्रिक अॅसिड, मॅलिक अॅसिड,  पॅक्टिन आमि इन्व्हर्टेड शुगर असते जी त्वचेवर मॉईस्चराईजरचा प्रभाव दर्शवते. तसंच त्वचा अधिक चांगली राखण्यास मदत करते. यासह चिंचेचा उपयोग अनेक सौंदर्य प्रसाधानांमध्येही करण्यात येतो. पण संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी मात्र याचा वापर काळजीपूर्वक करावा. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या. 

सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी (Sunburn)

चिंचेमध्ये असणारे गुण हे सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरतात. चिंचेमध्ये जायलोग्लुकन नावाचे पॉलीसॅकराईड आढळते. ज्याचा वापर सनस्क्रिन लोशन बनविण्यासाठी करण्यात येतो. एका वैज्ञानिक शोधानुसार चिंचेमध्ये असणारे जायलोग्लुकन, त्वचेची रक्षा करण्यासाठी याचा फायदा होतो. याचा वापर त्वचेची  युव्हीबी आणि युव्हीएच्या किरणांपासून वाचविण्यासाठी होतो. कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून वाचविण्यासाठीही याचा उपयोग होतो.  

ADVERTISEMENT

नैसर्गिक अँटिएजिंग म्हणून वापर (Natural anti aging)

कडक उन्हामुळे त्वचेला खूपच त्रास होतो. सूर्यापासून निघणारे अल्ट्रावॉयले किरण त्वचेला वयाआधीच म्हातारे करतात. त्वचेवर सुरकुत्या आणण्याचे काम करतात. हे किरण फ्री रॅडिकल्सना वाढविण्याचे काम करतात जे डीएनए, प्रोटीन आणि फॅटी अॅसिडला नुकसान पोहचवतात आणि आरोग्यही बिघडवतात. पण चिंचेच्या अर्काने वा सालीमध्ये असे अनेक नैसर्गिक गुण आहेत जे फ्री रॅडिकल्सशी लढा देण्यास आणि त्वचेला तणावापासून वाचविण्यास मदत करतात. तसंच चिंचेचे औषधीय गुण एजिंगच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात. 

अँटिबॅक्टेरियल (Anti bacterial)

चिंचेच्या बियांच्या सालांच्या अर्कामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट आणि अँटिएजिंग गुण सूर्यापासून निघणाऱ्या अल्ट्रावायलेट किरणांचा प्रभाव रोखण्याठी मदत करते. यामधील अँटिबॅक्टेरियल गुणांंमुळे त्रास होत नाही आणि शरीर निरोगी राखण्यास मदत मिळते.

अॅक्ने आणि पिगमेंटेशनवर फायदेशीर (For acne and pigmentation)

अॅक्ने आणि पिगमेंटेशनवर फायदेशीर (For acne and pigmentation)

Shutterstock

ADVERTISEMENT

अॅक्ने अर्थात मुरूमं आणि  पिगमेंटेशन अर्थात चेहऱ्यावर आलेल्या डागावरही चिंचेचा फायदा करून घेता येतो. वास्तविक एका शोधानुसार चिंचेच्या बियांमध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिथारोसिनेज गुण आढळतात. तसंच त्वचेवरील मुरूमं ही बॅक्टेरियल प्रभावामुळे होात आणि चिंचेमध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असल्याने याचा उपयोग करून घेता येतो. यातून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही चिंंचेचा उपयोग केलेले क्रिम वापरू शकता. 

कसे ठेवावे सुरक्षित (How to store)

कसे ठेवावे सुरक्षित (How to store)

Shutterstock

ADVERTISEMENT

चिंचेचा उपयोग आपण नेहमी करतो. चिंच कशी राखून ठेवावी याचीही माहिती आपल्या सर्वांना माहीत असायला हवी. 

  • साामन्य  तापमानावर चिंच सुरक्षित ठेवता येते. तसंच कोणत्याही काळोख्या ठिकाणी जिथे उजेड येणार नाही अशा ठिकाणी चिंच ठेवल्यास, जास्त दिवस टिकते 
  • चिंचेच्या उपयोगासाठी याचा घट्ट रस काढून हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेऊ शकता. यामुळे चिंच जास्त  काळ टिकते 
  • चिचेंचा कोळ तुम्ही उन्हात सुकवा आणि मग हवाबंद डब्यात घालून ठेवा
  • चिंचेवर बुरशी लागणार नाही याची काळजी घ्या. यासाठी तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले मिक्स करून ठेऊ नका 
  • चिंचेचा पल्प खरेदी करताना तो स्वच्छ आहे की नाही अथवा त्याचा पॅक व्यवस्थित आहे की नाही हे पाहून घ्या

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. चिंच रोज खाऊ शकतो का?

विश्व आरोग्य संस्था अर्थात WHO ने चिंच सुरक्षित मानली असून यामध्ये विष नसल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे याचे संतुलित प्रमाणात रोज सेवन करता येऊ शकते आणि त्याशिवाय आरोग्यासाठीही तुम्हाला चिंच उपयुक्त ठरते. पण तुम्ही असंतुलित प्रमाणात चिंच खाल्ली तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.

2. चिंचेमुळे झोपेत काही फरक पडतो का?

काही व्यक्तींचे म्हणणे आहे की, चिंचेमध्ये असणारे मॅग्नेशियम झोपेसाठी उपयुक्त ठरते. वास्तविक चिंचेमुळे झोप येण्यासही मदत मिळते.

3. चिंचेचे पाणी पिण्याचे फायदे नक्की काय आहेत?

चिंचेच्या पाण्याने अर्थात जलीय अर्काने अँटिओबेसिटी गुणांनी युक्त असल्याने यामुळे जाडेपणा कमी होण्यास मदत मिळते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT