ADVERTISEMENT
home / आरोग्य
गरोदर महिलांनी का खायला हवेत अक्रोड, जाणून घ्या फायदे

गरोदर महिलांनी का खायला हवेत अक्रोड, जाणून घ्या फायदे

गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीसाठी एक खास काळ असतो. या काळात तिच्या शरीर आणि मनात अनेक बदल होत असतात. गरोदरपण हा एक सुंदर टप्पा असला तरी नाजूक आणि जोखमीचाही असतो. सहाजिकच या काळात काय खावं आणि खाऊ नये असे प्रश्न महिलांसमोर निर्माण होतात. यासाठी जाणून घ्या गरोदरपणात काय खावे | Pregnancy Diet Chart In Marathi या काळात महिला जे काही खातात त्याचा थेट परिणाम गर्भावर होत असतो. यासाठीच जास्तीत जास्त पोषक डाएट गरोदर महिलांना देण्यात येतो. या काळात गरोदर स्त्रीने सर्व प्रकारचे पोषक घटक मिळणारे पदार्थ खाल्ले तर बाळाची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होतो. गरोदर स्त्रीच्या आहारात यासाठीच विविध प्रकारच्या भाज्या, फळं आणि सुकामेवा असायला हवा. कारण यातून तिला आणि बाळाला लोह, प्रोटिन्स, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स असे पोषक घटक सहज मिळत असतात. सुकामेव्यात अनेक पोष्टिक घटक असतात. मात्र गरोदर स्त्रीला सर्व प्रकारचा सुकामेवा खाण्याचा सल्ला दिला जात नाही. काजू अथवा अति उष्णता निर्माण करणारा सुकामेवा या काळात गरोदर स्त्रीने मुळीच खाऊ नये. मात्र अक्रोड असा एक सुकामेवा आहे जो गरोदर स्त्रीने खायलाच हवा. जाणून घ्या गरोदरपणी अक्रोड खाण्याचे फायदे (Health Benefits of Walnuts During Pregnancy) यासोबकच वाचा अक्रोडचे आरोग्य आणि सौंदर्यावर होणारे फायदे (Benefits Of Walnut In Marathi)

गरोदर महिलांसाठी अक्रोडचे फायदे

अक्रोड (Walnuts)  गरोदरपणाच्या काळात खाण्याचे अनेक चांगले फायदे आहेत. यासाठी गरोदरपणाच्या नऊ महिन्यांमध्ये स्त्रीला अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र अक्रोडदेखील अति प्रमाणात खाऊ नयेत. कारण कोणतीही गोष्ट अति प्रमाणात खाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या प्रेगनन्सीमध्ये महिलांनी प्रमाणात अक्रोड का खावे. 

  • गरोदरपणात गर्भाचे पोषण ही प्रत्येक स्त्रीची प्राथमिकता असते. यासाठीच या काळात अक्रोड खाण्याने तुमचे आणि बाळाचे योग्य पोषण होते
  • अक्रोडमध्ये मेलाटोनिन असल्यामुळे या काळात गरोदर महिला ताणतणावापासून दूर राहतात आणि त्यांना शांत झोप लागते.
  • अक्रोडमधील बी कॉम्पेक्स, व्हिटॅमिन, कॉपर अशा विविध पोषक घटकांमुळे बाळाच्या शरीरातील पेशींचा योग्य विकास होण्यास मदत होते.
  • अक्रोडमधील ओमेगा थ्री फॅटी अॅसिडमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • अक्रोडमध्ये मॅगनिज भरपूर असते ज्यामुळे बाळाच्या मेंदू आणि हाडांचा विकास योग्य पद्धतीने होतो.
  • यातील अॅंटि ऑक्सिडंट रोग प्रतिकार शक्ती मजबूत करतं ज्यामुळे बाळ आणि बाळाची आई आजारपणापासून दूर राहते. 

यासोबतच जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
19 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT