ADVERTISEMENT
home / केस
hibiscus-flower-uses-for-long-hair-ajicha-batwa-upay-in-marathi

कमरेपर्यंत लांबलचक केस हवे असतील तर वापरा आजीच्या बटव्यातील नुस्खा

साहित्य 

मुलींना आणि महिलांना काळे, घनदाट आणि मोठ्या केसांची आवड ही असतेच. वय कोणतेही असो आपले केस लांबलचक आणि घनदाट असावेत असं नक्कीच महिलांना वाटत असतं. पण आजकालच्या जीवनशैलीत केसांची काळजी (hair care) घेणं तितकंस शक्य होत नाही. केसांची काळजी योग्य पद्धतीने घेतली जात नाही, त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही आणि केस लवकर खराब होतात. सर्वात जास्त त्रास होतो जेव्हा केसांची वाढ होत नाही आणि केसगळती होताना दिसते. त्यामुळे अनेक महिला या बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण याचा योग्य परिणाम होतोच असं नाही. पण कमरेपर्यंत लांबलचक केस हवे असतील तर तुम्ही आजीच्या बटव्यातील नुस्ख्याचा वापर करू शकता. यासाठी जास्वंदीच्या फुलाचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे केसांना खूपच फायदा मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्वंदाचे फूल (Hibiscus Flower) हे कोणत्याही हंगामात मिळू शकते. केसगळती रोखण्यासाठी याचा खूपच फायदा मिळतो. तसंच केस पांढरे होत असतील तर या समस्येवरही जास्वंदाच्या तेलाचा फायदा होतो. इतकंच नाही तर केस डॅमेज होत असल्यास, त्यापासून वाचविण्यासाठी आणि केसांचा वॉल्युम वाढविण्यासाठीही याचा फायदा होतो. जास्वंद फुलाची माहिती तर सर्वांना आहेच, जास्वंदीचा वापर केसांसाठी (Hibiscus use for long hair) कसा करून घ्यावा हे आपण पाहूया. अत्यंत सोप्या पद्धतीने जास्वंदीचा वापर करून घ्या. 

साहित्य

Hibiscus Flower
 • 1 जास्वंदीचे फूल पानांसह 
 • 1 मोठा चमचा मेथी दाणे
 • 1 मोठा चमचा नारळाचे तेल
 • 1 मूठभर कडूलिंबाची पानं
 • 1 कप दही 

बनविण्याची आणि वापरण्याची पद्धत 

 • ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या केसांना घरगुती ट्रीटमेंट (Home Treatment For Hair) द्यायची असेल त्याच्या आदल्या रात्री तुम्ही जास्वंदाचे फूल हे नारळाच्या तेल भिजवून ठेवा. जास्वंदीच्या फुलाने तुम्हाला घरीच केस चमकदार करता येतात
 • जास्वंदाचे फूल नारळाच्या तेलात घालण्यापूर्वी नारळ तेलात मेथीचे दाणे आणि कडिलिंबाची पाने घाला आणि हे तेल गरम करून घ्या. नंतर थंड होण्यासाठी झाकून ठेवा 
 • दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी हे सर्व साहित्य घ्या आणि एकत्र करून त्याची पेस्ट करा आणि त्यात दही मिक्स करा 
 • आता ही पेस्ट तुम्ही केसांना अगदी मुळापासून लावा आणि साधारण 30-45 मिनिट्स तसंच ठेवा 
 • त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने हे केस स्वच्छ धुवा आणि नैसर्गिकरित्या सुकू द्या 
 • ही ट्रीटमेंट झाल्यवर तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांना शँपू लावा आणि केस धुवा. त्याच दिवशी शँपू लावल्यास, तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाही
 • आठवड्यातून तुम्ही हा घरगुती हेअर पॅक केसांना नक्की लावा आणि याचा परिणाम पाहा 

विशेष सूचना – या ट्रिटमेंटमुळे तुम्हाला त्वरीत परिणाम दिसणार नाही. मात्र तुम्ही नियमित आठवड्यातून एकदा हा प्रयोग करत राहिलात तर तुमच्या केसांना नक्कीच फायदा मिळेल आणि केसांची लांबीही वाढेल हे लक्षात घ्या. तसंच तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तूंची अलर्जी असल्यास, तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट करून पाहा. अलर्जी असल्यास याचा वापर अजिबात करू नका. 

01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT