ADVERTISEMENT
home / xSEO
hingache fayde in marathi

हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi

आपल्या भारतीय पाककृतींमध्ये, खास करून मराठी पदार्थांमध्ये हिंगाशिवाय स्वयंपाक होत नाही. जवळजवळ प्रत्येक फोडणीत हिंग घातलाच जातो. जरी पदार्थाला फोडणीची आवश्यकता नसेल तर जवळजवळ प्रत्येक तिखटामिठाच्या पदार्थात हिंग आवर्जून घातला जातो. केवळ चवीसाठीच नव्हे तर हिंगात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे आपण गेली शेकडो वर्षे स्वयंपाकात हिंगाचा वापर करत आहोत. हिंगाचे उपयोग बरेच आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीने हिंगाचे फायदे (Hingache Fayde In Marathi) खूप आहेत. आपल्या आज्या-पणज्या तर पोटदुखी, कानदुखी यांसारख्या किरकोळ दुखण्यांवर हिंगाचा औषधासारखा वापर करत आल्या आहेत. असे म्हणतात की हिंग मूळचा रोमचं आहे. पण जरी हिंग मुळात युरोपातील असलं तरीही हजारो वर्षांपासून आपण भारतीय लोक दररोज जेवणात हिंगाचा वापर करत आलो आहोत. खरंतर हिंग हे खड्याच्या स्वरूपात येतं आणि त्याची पावडर करणे कठीण असते. खलबत्यात कुटूनच हिंगाची पूड केली जाऊ शकते. आपण जे रोज वापरतो ते पावडर स्वरूपातील हिंग बऱ्याच वेळेला अस्सल नसतं. अस्सल हिंग हे खडा हिंगच असतं आणि या हिंगाची चव व वास सुद्धा खूप स्ट्रॉंग असतो. 

हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान  | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi
हिंग खाण्याचे फायदे

आजकाल आपल्याला जे पावडर हिंग मिळतं, त्यात बऱ्याचदा भेसळ असते. त्यात केवळ तीस टक्के अस्सल हिंग आणि इतर सत्तर टक्के तांदळाचे पीठ मिसळलेले असते. आपल्या भारतात जे हिंग तयार होतं ते काश्मीरमधून येतं. हिंग ठेवताना ते एअर टाईट डबीत किंवा मसाल्याच्या डब्यात बंद करून ठेवलं पाहिजे. कारण हिंगाचा तीव्र गंध इतर पदार्थांना लागू शकतो. आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने हिंग खाण्याचे फायदे अनेक आहेत. म्हणूनच रोज जेवणात योग्य प्रमाणात हिंग वापरणे फायदेशीर आहे. परंतु हिंगाचा अतिवापर करणेही योग्य नाही. अति प्रमाणात हिंग खाण्याचे शरीराला नुकसान होऊ शकते. 

अधिक वाचा – जेवणात स्वाद वाढवण्यासह काळीमिरी चे फायदे

हिंग कशापासून तयार करतात? । Hing Kashapasun Bante?

हिंग हा झाडापासून मिळतो. फेरुला फेटिडा (Asafoetida) या झाडाच्या मूळांच्या रसापासून हिंग तयार केला जातो. हिंग मसाला म्हणून, हिंग त्याच्या तीव्र, तिखट वासासाठी ओळखला जातो. हिंगाचा वास उग्र असतो कारण त्यात सल्फरच्या संयुगांचे प्रमाण जास्त असते. गंमत म्हणजे भारतात हिंगाचे उत्पादन होत नसले तरी त्याचा सर्वाधिक वापर आपल्याच देशात होतो. जगातील हिंगाच्या एकूण उत्पादनापैकी तब्बल चाळीस टक्के वापर भारतात होतो. पठाणी किंवा अफगाणी हिंगाला बाजारात जास्त मागणी असते. पण हिंगाचे उत्पादन इतके सोपे नाही. म्हणूनच हिंग इतका महाग असतो. हिंगाचे झाड फेरुला फेटिडा हे मुळा किंवा गाजरासारखे रूट व्हेजिटेबल प्रकारातील झाड असते. हे झाड थंड व कोरड्या वातावरणातच चांगले वाढू शकते जिथे बर्फाचे पाणी वितळून जमिनीत झिरपते.

ADVERTISEMENT
हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान  | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi
हिंग खाण्याचे फायदे

हिंगाच्या झाडाच्या जवळपास 130 प्रजाती असतात. यातल्या काही आपल्या देशात लडाख, काश्मीर, हिमाचल या प्रदेशात उगवतात. परंतु फेरुला फेटिडा ही वनस्पती भारतात आढळत नाही जिच्यापासून प्रामुख्याने हिंग तयार केला जातो. एका हिंगाच्या रोपापासून साधारणपणे अर्धा किलो हिंग मिळतो. आणि हा हिंग मिळायला सुद्धा चक्क चार वर्षे वाट बघावी लागते. म्हणूनच हिंगाची किंमत जास्त असते. हिंगाचे लाल व सफेद असे दोन प्रकार असतात. सफेद हिंग हा पाण्यात विरघळतो तर लाल किंवा गडद हिंग तेलात विरघळतो. 

हिंग खाण्याचे फायदे । Benefits Of Hing In Marathi 

आपल्या आयुर्वेदात व चरक संहितेतही हिंगाचा उल्लेख सापडतो. म्हणजेच इसवी सन पूर्व काळापासून आपल्याकडे स्वयंपाकात व औषधांमध्ये हिंगाचा वापर केला जातो. जाणून घ्या हिंगाचे फायदे. 

हिंग खाण्याचे फायदे | Hing Khanyache Fayde Marathi

हिंगामुळे वात व कफ कमी होतो आणि पित्त वाढते. हिंगाने भूक वाढते व तोंडाला चव नसेल तर हिंगाचे पाणी प्यायल्यास तोंडाला चव येते असा अनेकांचा अनुभव आहे. हिंग पाचक आहे त्यामुळे हिंग खाल्ल्यास अन्नपचन सुलभ होते. पोटात गॅस झाला असेल तर हिंग खाल्ल्यास किंवा हिंग पोटाला चोळल्यास त्याने गॅसेस कमी होतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये, हिंगाचा उपयोग पचन आणि वायूला मदत करण्यासाठी तसेच ब्राँकायटिस आणि किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी केला जातो. मध्ययुगात, काही लोक संसर्ग आणि रोगापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात वाळलेला डिंक घालत असत. 

पोटाच्या विकारांवर गुणकारी आहे हिंग

हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान  | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi
हिंग खाण्याचे फायदे

एका अभ्यासात असे आढळले की मध्यम ते गंभीर अपचन असलेल्या प्रौढांनी दिवसातून दोनदा हिंग असलेली 250-mg कॅप्सूल घेतल्यावर त्यांचा ब्लोटिंग, अपचन आणि पोटासंबंधी विकारांचा त्रास कमी झाला व जीवनाच्या एकूण गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली. हिंग शरीरातील पाचक एन्झाईम्सची क्रिया वाढवून पचनास चालना देतो. हिंग खाल्ल्यास तुमच्या यकृतात तयार झालेले पित्त योग्य प्रमाणात पचनासाठी आतड्यांत सोडले जाते जे चरबी पचवण्यासाठी आवश्यक आहे. हिंगाचा वापर पोटात होणार गॅस टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वारंवार केला जातो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) हा एक पोटाचा चिवट विकार आहे. हा विकार असल्यास ओटीपोटात दुखणे किंवा अस्वस्थता, सूज येणे आणि गॅस, तसेच बद्धकोष्ठता, अतिसार हे त्रास होतात. हिंग अन्नपचन सुधारत असल्याने IBS शी संबंधित लक्षणे कमी करण्यासही मदत करतो असे मानले जाते. पोटात खूप दुखत असेल तर हिंग व गुळाची गोळी करून ती कोमट पाण्याबरोबर घेतल्यास पोटदुखी कमी होते. गॅस झाला असेल तर हिंग व पाण्याची पेस्ट करून ती नाभीभोवती चोळल्यास पोटातील दुखणे कमी होते. हे पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहेत.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – पोटाचे विकार आणि पोट फुगणे उपाय जाणून घ्या

श्वसनासंबंधी च्या समस्यांवर फायदेशीर आहे हिंग

हिंगामधील औषधी घटकांचा श्वसनाच्या विकारांवरही फायदा होतो. हिंगामध्ये असलेले दाहविरोधी, अँटीव्हायरल आणि प्रतिजैविक घटकांमुळे त्याचा वापर दमा, ब्राँकायटिस, कोरडा खोकला, डांग्या खोकला आणि सर्दी यांसारख्या श्वसन समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. तसेच हिंग हा रेस्पिरेटरी स्टिम्युलण्ट असल्यामुळे जर कंजेशन होऊन छातीत दुखत असेल तर हिंगामुळे त्यावर आराम मिळतो आणि कफ बाहेर काढण्यासाठीही हिंग खूप उपयुक्त आहे. जर मोठ्यांना किंवा लहान मुलांनाही सर्दीमुळे छातीत कफ साठला असेल तर हिंग पाण्यात बारीक करून पेस्ट बनवा व ती छातीवर लावा. खोकला झाला असताना सारखी ढास लागत असेल तर दीड चमचा हिंग पावडर, दीड चमचा सुंठ पावडर आणि दोन चमचे मध एकत्र करून मिश्रण तयार करा व हे चाटण घ्या. त्यावर पाणी पिऊ नका. डांग्या खोकला, ब्राँकायटिस आणि दमा यापासून आराम मिळण्यासाठी दिवसातून किमान तीन वेळा हे चाटण घ्या. सारखा कोरडा खोकला येत असेल तर हा चांगला घरगुती उपाय आहे.

अधिक वाचा –सर्दी खोकला वर घरगुती उपाय

मासिक पाळीत मिळेल वेदनेपासून सुटका करण्यास गुणकारी आहे हिंग

हिंगामुळे मासिक पाळीच्या त्रासापासून थोडा आराम मिळत असल्याने महिलांनी हिंगाचे सेवन केले पाहिजे. मासिक पाळीच्या वेदना, अनियमित मासिक पाळी आणि मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे हे त्रास होत असतील तर त्यावर हिंग फायदेशीर आहे. हिंगामुळे आपल्या शरीरात प्रोजेस्टेरॉन आवश्यक तेवढे स्रवले जाते. तसेच हिंग रक्तसंचार वाढवतो आणि मासिक पाळीच्या इतर समस्यांपासून देखील आराम देतो. तुम्हाला मासिक पाळीच्या वेळेला त्रास होत असल्यास  एक कप ताकामध्ये चिमूटभर हिंग, दीड चमचा मेथी पावडर आणि चवीनुसार मीठ मिसळा. मासिक पाळीतील वेदना आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी दर महिन्याला दोनदा किंवा तीनदा हे प्या.

ADVERTISEMENT

डोकेदुखीवर फायदेशीर असते हिंग चे सेवन

हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान  | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi
हिंग खाण्याचे फायदे |

जर तुम्हाला सर्दी किंवा मायग्रेनमुळे नेहेमी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हिंगामुळे नक्कीच तुम्हाला बरे वाटू शकते. हिंगात दाहविरोधी घटक असल्यामुळे तो डोक्यातील रक्तवाहिन्यांची सूज कमी करण्यास मदत करू शकतो. यामुळे डोकेदुखी कमी होते. डोके दुखत असेल तर  दीड कप पाण्यात थोडासा हिंग घाला व हे पाणी सुमारे 15 मिनिटे उकळून घ्या आणि दिवसभर थोडे थोडे प्या. यामुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. परंतु वारंवार डोकेदुखी होणे चांगले नाही. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिंग, सुंठ,  कापूर आणि दोन चमचे कंकोळ हे प्रत्येकी एक चमचा घ्या व पुरेसे दूध किंवा गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. तुमचे स्ट्रेसने किंवा मायग्रेनमुळे डोके दुखत असेल तर ही पेस्ट कपाळावर लावा.तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तसेच उन्हाळ्यात सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हा घरगुती उपाय करून बघा.

अधिक वाचा – त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय

दातदुखी – हिंग खाण्याचे फायदे

हिंगामध्ये दाहविरोधी, प्रतिजैविक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे हिंग दातदुखी आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत करू शकतो. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल आणि दातांमध्ये कॅव्हिटी झाली असेल तर त्यासाठी उपचारांमध्ये हिंग फायदेशीर आहे. दात दुखत असेल तर त्या दातावर थोड्या प्रमाणात हिंग लावा तुमची दातदुखी नक्कीच कमी होईल. दात चांगले ठेवण्यासाठी एक कप पाण्यात थोडा हिंग आणि काही लवंगा उकळा. जेव्हा द्रावण कोमट असेल तेव्हा त्याने चूळ भरा. हा दात दुखीवर घरगुती उपाय आहे.

कान दुखत असल्यास वापरा हिंग

हिंगातील दाहविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म कानात इन्फेक्शन झाल्याने जर कान दुखत असेल तर त्यापासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. एका छोट्या कढईत खोबरेल तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिंगाचा छोटा तुकडा टाकून वितळू द्या. कोमट झाल्यावर हे मिश्रण इअर ड्रॉप्सप्रमाणे वापरू शकता. 

ADVERTISEMENT

बाळांसाठीही गुणकारी आहे हिंग

हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान  | Hing Khanyache Fayde, Nuksan Marathi
हिंग खाण्याचे फायदे

बाळांना पोटदुखीचा त्रास होणे सामान्य आहे.लहान मुलांमध्ये पोटशूळ वेदना कमी करण्यासाठी हिंग उपयुक्त आहे. पोटदुखीवर उपचार करण्यासाठी हिंग वापरण्यापूर्वी, तुमच्या मुलाला गॅस किंवा इतर काही समस्या आहेत याची खात्री करा. जर तुमच्या बाळाचे पोट घट्ट आणि फुगलेले वाटत असेल तर त्याला गॅसचा त्रास असू शकतो. कोमट पाणी आणि हिंगाची पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट नाभीच्या आजूबाजूच्या भागावर लावा आणि लक्षात ठेवा की पेस्ट नाभीच्या आत जाणार नाही. हा उपाय केल्यास बाळाला होणार त्रास लवकर कमी होण्यास मदत होते.

कॅन्सरपासून करतो रक्षण हिंग

हिंग हा अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. हिंगात असणारी संयुगे तुमच्या पेशींना फ्री रॅडिकल्स नावाच्या अस्थिर रेणूंमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. . हिंगामध्ये टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारखी फिनोलिक संयुगे जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे, जे त्यांच्या शक्तिशाली अँटिऑक्सिडंट प्रभावांसाठी ओळखले जातात. हे अँटिऑक्सिडंट्स दाह,जळजळ, हृदयरोग, कर्करोग आणि टाइप 2 मधुमेह यांच्यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करू शकतात. 

अधिक वाचा – जाणून घ्या रक्ताचा कर्करोग, लक्षणे 

किडा चावल्यास करा हिंग चूर्णाचा वापर 

किडा किंवा मधमाशी चावल्यास तेथे त्वचेची जळजळ किंवा दाह होतो. तेथील त्वचा सुजते व खास सुटते. कीटकांच्या चाव्यावर  हिंग खूप फायदेशीर आहे. हे वेदना आणि जळजळ कमी करते आणि विषारी प्रभाव कमी करण्यास मदत करते. हिंगात पाणी घालून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. कोरडे होऊ द्या आणि नंतर ही पेस्ट पाण्याने धुवा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – डास चावल्यावर आलेल्या दादी घालविण्यासाठी सोपे घरगुती उपाय

अति प्रमाणात हिंग खाण्याचे नुकसान | Hing Khanyache Nuksan Marathi

हिंग हा योग्य प्रमाणात आरोग्यासाठी चांगला आणि अनेक छोट्या तक्रारींवरचा घरगुती उपाय आहे. पण अति प्रमाणात सेवन केल्यास हिंग खाण्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात? 

  • हिंगाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या ओठांना सूज येऊ शकते. 
  • अति प्प्रमाणात हिंग खाल्ल्याने गॅस किंवा डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पोटात जळजळ होऊ शकते. 
  • काही लोकांमध्ये हिंगाचे सेवन केल्याने त्वचेवर पुरळ उठू शकते. चिंता करण्यासारखं काही नाही, हे त्वचेवरची पुरळ घरगुती उपाय करून बरे होते.
  • हिंगाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास डोकेदुखी बरी होते. परंतु त्याचा अतिवापर केल्यास डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते.
  • उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबावर देखील हिंगाचा परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अति प्रमाणात हिंग खाणे टाळावे.
  • गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी हिंगाचे सेवन टाळावे. त्यामुळे रक्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 
  • हिंगाच्या मोठ्या डोसमुळे गॅस, अतिसार, चिंता, डोकेदुखी आणि तोंडाला सूज येऊ शकते. 

FAQ’s – हिंग खाण्याचे फायदे आणि नुकसान

प्र. हिंग वापरण्याचे प्रमाण काय असावे ? 

साधारणपणे, पिवळा. डायल्युट केलेला हिंग पावडर स्वरूपात एक किंवा दोन चिमूटभर वापरावा. विरळ पावडर कमी प्रमाणात वापरली जाते. त्यापेक्षा जास्त वापरल्यास हिंगाची उग्र चव पदार्थाला लागू शकते वकालांतराने त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. 

ADVERTISEMENT

प्र. हिंगाला पर्याय काय?

पदार्थात घालण्यासाठी जर तुमच्याकडे हिंग पावडर नसेल तर तुम्ही  1/4 चमचे कांदा पावडर व 1/4 चमचे लसूण पावडर हे मिश्रण फोडणीत घालू शकता. पण याची चव हिंगापेक्षा कमी तीव्र असते. 

प्र. हिंगात ग्लूटेन असते का?

हिंग जर भेसळमिश्रित असेल तर त्यात ग्लुटेन असते. तुम्ही ग्लूटेन फ्री डाएटवर असाल तर खडा हिंग खरेदी करून मग घरी खलबत्त्यात त्याची पावडर करा.

ADVERTISEMENT

हिंग हा आरोग्यदायी आहे. हिंग खाण्याचे फायदे भरपूर असले तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात असायला हवे कारण अति प्रमाणात सेवन केल्यास हिंगाचे दुष्परिणाम देखील होतात. हिंग वापरल्यास पदार्थ चवदार व अधिक पौष्टिक बनतात. म्हणून रोज कमी प्रमाणात हिंगाचा वापर करणेच उचित आहे. 

फोटो क्रेडिट- depositphotos

हेही वाचा –
आले खाण्याचे फायदे आरोग्यासाठी आणि केसांसाठी 

31 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT