ADVERTISEMENT
home / आरोग्य
Headache Home Remedies In Marathi

त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय (Dokedukhi Var Gharguti Upay)

 

डोकेदुखी अथवा अर्ध डोकेदुखी या कॉमन समस्या आहेत, ज्या कोणालाही होऊ शकतात. पण बऱ्याचदा डोकंच दुखतंय ना असं म्हणून दुर्लक्ष करण्यात येते. काही जण असेही आहेत जे डोकेदुखीपासून लवकर सुटका व्हावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोकेदुखी निवारणाचे औषध घेतात. जे अजिबात योग्य नाही. यामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे डोकेदुखी कारणे नक्की काय आहेत आणि डोकेदुखीवर घरगुती उपाय करता येतो की नाही याची संपूर्ण आणि योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आम्ही या लेखातून तुम्हाला डोकेदुखी घरगुती उपाय (Headache Home Remedies In Marathi) सांगणार असून  याचा परिणाम त्वरीत होतो आणि तुम्हाला त्वरीत आराम मिळण्यासाठीही याचा उपयोग होतो. पण त्यानंतरही तुम्हाला आराम वाटला नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्याकडे दुर्लक्ष करून नका. अन्यथा त्याचे परिणाम वाईट होण्याची शक्यता असते. त्यापूर्वी डोकेदुखीची नक्की काय कारणे आहेत ते जाणून घेऊया.

डोकेदुखी कारणे (Headache Causes In Marathi)

Headache Causes In Marathi

डोकेदुखी घरगुती उपाय

 

डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. डोकेदुखी कारणे काय असू शकतील हे आपण आधी जाणून घेऊया. हे समस्या साधारण वाटत असली तरीही याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला धोकादायक नक्कीच ठरू शकते. त्यामुळे कारण कळल्यावर त्वरीत त्यावर उपचार करावा.  

ADVERTISEMENT
 • तणाव
 • दात अथवा हिरड्यांची समस्या
 • संक्रमण
 • मांसपेशी खेचल्या गेल्याने होते डोकेदुखी 
 • डाएट (चहा अथवा कॉफी पिऊन राहणे, जास्त वेळ काहीही न खाता उपाशी राहणे)
 • डोळ्यांचे दुखणे 
 • हार्मोनल बदल
 • काही गोळ्यांचा परिणाम
 • कानदुखी, नाकातून पाणी येणे अथवा घसाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास डोकेदुखी होते 
 • मान अथवा डोक्याला लागल्यास
 • उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास 
 • चुकीच्या पद्धतीने झोपणे अथवा उठणे आणि बसणे 
 • दारूचे अतिसेवन 
 • हवामानातील बदल अथवा अत्याधिक गरम होणे 
 • अति आवाज सहन न झाल्याने 
 • डिहायड्रेशन 
 • ब्रेन ट्यूमर

डोकेदुखीसाठी यापैकी कोणतेही कारण असू शकते. पण यापैकी नक्की कोणते कारण आहे डॉक्टरांकडून समजून घेणेही आवश्यक आहे. साधारण गोष्ट असेल तर तुम्हाला पटकन घरगुती उपाय करता येतात. डोकेदुखीवर घरगुती उपाय काय आहेत ते जाणून घेऊया. 

वाचा – जाणून घ्या न्यूमोनिया लक्षणे व उपचार

डोकेदुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Headache In Marathi)

Home Remedies For Headache In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

 

डोकेदुखीवर घरगुती उपाय आहेत आपण या उपायांचा कसा वापर करून घ्याचा आणि त्याचे काय फायदे आहेत ते या लेखातून पाहूया. याचा कसा तुमच्या शरीरावर त्वरीत परिणाम होतो ते जाणून घेऊ. 

वाचा – काविळीची लक्षणे कोणती ?

थंड पाण्याचा मसाज (Cold Massage)

Cold massage

Dokedukhi Var Gharguti Upay

ADVERTISEMENT

 

साहित्य 

 • बर्फाचे काही तुकडे अथवा थंड पाणी 
 • आईस बॅग

वापरण्याची पद्धत 

 • कोणत्याही व्यक्तीला जर उन्हाळ्याच्या दिवसात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर बर्फाचे तुकडे आईस बॅगमध्ये भरा आणि आपल्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर साधारण 10 – 15 मिनिट्स ठेऊन शेक द्या
 • तुमच्याजवळ आईस बॅग नसेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे एखाद्या कॉटनच्या कपड्यात बांधा आणि डोकं दुखत असेल त्या ठिकाणी थोडा थोडा वेळ ठेवा

कसे ठरते फायदेशीर 

हा डोकेदुखीवरील घरगुती उपाय आहे. बऱ्याच वेळापासून डोकेदुखी असल्यास, एक स्वतःची काळजी घेण्यासाठी याचा वापर केला जातो. हा मायग्रेनसाठीही घरगुती उपाय म्हणून उपयुक्त आहे. एनसीबीआयच्या एका अभ्यासानुसार, यामुळे डोकेदुखीवर इलाज होऊ शकतो. पण यावर अजूनही अभ्यास चालू आहे. मात्र तुम्ही घरच्या घरी हा उपाय करून पाहू शकता.

ADVERTISEMENT

वाचा – जाणून घ्या अनियमित मासिक पाळी असण्याची काही कारणे

आले (Ginger)

Ginger

Headache Home Remedies In Marathi

 

साहित्य 

ADVERTISEMENT
 • आल्याचे चार लहान तुकडे 
 • दोन कप पाणी 

वापरण्याची पद्धत 

 • एका भांड्यात पाणी उकळून घ्या 
 • आल्याचे तुकडे उकळत्या पाण्यात टाका 
 • त्यानंतर हे पाणी उकळत असेल त्यावर झाकण ठेवा 
 • नंतर हे पाणी गाळून प्या 
 • एका दिवसात एक अथवा दोन कप हे पाणी तुम्ही पिऊ शकता
 • तुम्हाला हवं तर आल्याच्या पावडरचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता 

कसे ठरते फायदेशीर 

डोकेदुखीवर घरगुती उपाय हा विषय निघाला की, आलं हा एक उत्तम उपाय ठरतो. आल्यामध्ये एक आयुर्वेदिक औषध असते जे डोकं उतरण्यास फायदेशीर ठरते. इतकंच नाही जर आल्याची पावडर तुम्ही तीन ते चार दिवस सतत चार तासांनी थोडी थोडी सेवन केली तर तुम्हाला असणारा मायग्रेनचा त्रासही कमी होतो हे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. अर्धे डोकेदुखीवरही याचा उपयोग करण्यात येतो. 

तुळस (Tulsi)

Tulsi

ADVERTISEMENT

डोकेदुखी घरगुती उपाय

 

साहित्य

 • एक अथवा दोन थेंब तुळशीचे तेल
 • एक अथवा दोन चमचे अन्य तेल जे तुम्हाला आवडेल

वापरण्याची पद्धत 

 • तुळशीचे तेल अन्य तेलासह मिक्स करा 
 • आता हे तेलाचे मिश्रण कपाळापासून मानेपर्यंत लावा आणि हलक्या हाताने मालिश करा 
 • काही तासांसाठी तसंच ठेवा 
 • यामुळे काही वेळातच तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल
 • अधिक डोकं दुखत असेल तर दर एक तासाने तुम्ही हे तेल लाऊ शकता 
 • याशिवाय तुळशीचा चहादेखील तुम्हाला उपयोगी ठरतो

कसे ठरते फायदेशीर 

ADVERTISEMENT

तुळशीचे एसेन्शियल ऑईल डोकेदुखीपासून काही वेळातच तुम्हाला सुटका मिळवून  देते. तसंच तुळशीमध्ये तणावापासून मुक्त करण्याचे गुण असल्याने डोकेदुखीलपासून सुटका मिळते. हलक्या फुलक्या डोकेदुखीपासून सुटका होण्यासाठी तुळशीच्या तेलाचा अथवा चहाचा उपयोग केला जातो. 

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती?

पुदीना तेल अर्थात मिंट ऑईल (Mint Oil)

Mint oil

Home Remedies For Headache In Marathi

ADVERTISEMENT

 

साहित्य 

 • एक अथवा  दोन थेंब पुदीन्याचे तेल
 • एक चमचा ऑलिव्ह ऑईल अथवा नाराळाचे तेल 

वापरण्याची पद्धत 

 • दोन्ही तेल मिक्स करून घ्या आणि हलक्या हाताने डोक्यला मसाज करा 
 • दुखत असताना थोड्या थोड्या अंतराने या मिश्रणाने डोक्याला मालिश करत राहा

कसे ठरते फायदेशीर 

डोकेदुखी घरगुती उपाय करताना पुदीन्याचे तेल प्रभावी उपाय ठरते. हे तेल डोक्याला केवळ थंडावा देत नाहीतर डोकेदुखीपासून सुटका मिळवून देते. तणावाने डोके दुखत असेल तर त्यावर हा उत्तम उपाय आहे. अगदी 6 वर्षांच्या मुलापासून ते मोठ्यापर्यंत याचा उपयोग करता येतो. त्याशिवाय पुदिन्यामध्ये असणारे मेन्थॉल हे मायग्रेनच्या त्रासापासून सुटका मिळवून देते. 

ADVERTISEMENT

वाचा – मुंग्या येणे लक्षणं आणि घरगुती उपाय

विटामिन (Vitamin)

 

कसे ठरते फायदेशीर 

कितीतरी वेळा डोकेदुखी ही शरीरातील विटामिन्सच्या कमतरतेमुळेही होते. हे त्याचे  कारण ठरू शकते. यावर तुम्ही रायबोफ्लेविन, बी विटामिन नामक विटामिनचे सेवन केल्यास, चांगले फायदेशीर ठरते. रायबोफ्लेविन हे नैसर्गिक स्वरूपात दूध, अंडे, नट्स आणि हिरव्या भाज्यांमध्ये आढळते. त्यामुळे याचे अधिक प्रमाणात सेवन करावे आणि डोकेदुखीपासून सुटका मिळवावी. 

वाचा – Andi Khanyache Fayde In Marathi

ADVERTISEMENT

रोझमेरी ऑईल (Rosemary Oil)

 

साहित्य 

दोन ते तीन थेंब रोझमेरी ऑईल अर्थात गुलाबाचे तेल 

वापरण्याची पद्धत 

डोकेदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही तेल आपल्या बोटांवर घ्या आणि या तेलाचा सुगंध नाकाने घ्या 
मधून मधून असं करत राहा 

ADVERTISEMENT

कसे ठरते फायदेशीर 

रोझमेरी तेलामुळे मांसपेशींना आराम मिळतो आणि डोकेदुखीपासून सुटका मिळते. डोकेदुखी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. हलक्या हाताने केलेला मसाज फायदेशीर ठरतो आणि तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर त्यावरही याचा उपयोग होतो. 

लवंग (Clove)

Clove

Dokedukhi Var Gharguti Upay

ADVERTISEMENT

 

साहित्य 

 • आवश्यकतेनुसार लवंग 
 • लवंगेचे तेल
 • बदाम अथवा नारळाचे तेल

वापरण्याची पद्धत 

डोकेदुखील घरगुती उपाय करायचा असेल तर लवंग एका रुमालात बांधा आणि डोकं दुखत असताना त्याचा थोड्या थोड्या अंतराने वास घेत राहा 
याशिवाय तुम्ही एक अथवा दोन चमचा लवंग तेल हे बदाम अथवा नारळाच्या तेलात मिक्स करून डोक्याला लावा 
जास्त दुखत असल्यास, काही तासांच्या अंतराने हे मिश्रण तुम्ही सतत कपाळाला लावा आणि मालिश करा

कसे ठरते फायदेशीर 

ADVERTISEMENT

लवंगेचे तेल हे डोकेदुखीवर उपायकारक आहे. यामुळे थोड्यावेळाने डोकेदुखीपासून सुटका मिळते. काही जण दुधामध्ये मीठ आणि लवंग चिरडून घालून मिक्स करून पितात. पण हे आवडत  नसेल तर तेलाचा उपयोग करून डोकेदुखीसाठी तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. 

लव्हेंडर ऑईल (Lavender Oil)

Lavender Oil

डोकेदुखीवर घरगुती उपाय

 

साहित्य

ADVERTISEMENT

एक अथवा दोन चमचे लव्हेंडर एसेन्शियल ऑईल 

वापरण्याची  पद्धत 

 • हे तेल तुम्ही कपडा अथवा रूमालाला लावा आणि त्याचा काही अंतराने वास घेत राहा
 • हे तेल कपाळ, मान आणि पाठीला लाऊन मालिशही करू शकता
 • रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे तेल लावल्यास, तुम्हाला झोप चांगली लागते 

कसे ठरते फायदेशीर 

लव्हेंडर एसेन्शियल ऑईलचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक डोकेदुखी कमी करणे आहे. मायग्रेनच्या रुग्णांसाठी या तेलाचा वापर करण्यात येतो. तसंच याचा वापर केल्याने सुधारणाही दिसून आल्याचा अभ्यास आहे. 

ADVERTISEMENT

कॉफी (Coffee)

Coffee

Home Remedies For Headache In Marathi

 

साहित्य 

कॉफी

ADVERTISEMENT

कसे ठरते फायदेशीर 

काही प्रमाणात जर कॉफीचे सेवन केले तर डोकेदुखी कमी होते. वास्तविक कॉफीमध्ये असणारे एनाल्जेसिक कॅफेन हे डोकेदुखीपासून सुटका मिळवून देण्यास कॉफी मदत करते. दिवसभरात तुम्ही साधारण 400 मिली कॅफेन शरीरामध्ये घेऊ शकता. पण याचा अति वापर टाळा.

ग्रीन टी (Green Tea)

Green tea

Home Remedies For Headache In Marathi

ADVERTISEMENT

 

साहित्य 

 • एक ग्रीन टी बॅग 
 • एक कप गरम पाणी 

वापरण्याची पद्धत 

 • ग्रीन टी बॅग एक कप गरम पाण्यात डीप करून घ्या
 • स्वादासाठी यात हवे तर लिंबाचा रस आणि मधही मिक्स करून घेऊ शकता 
 • रोज एक अथवा दोन कप ग्रीन टी तुम्ही पिऊ शकता 

कसे ठरते फायदेशीर 

ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत आणि त्यापैकी एक डोकेदुखी कमी करणे हादेखील आहे. योग्य प्रमाणातील ग्रीन टी तुम्हाला उपयुक्त ठरते. मात्र याचेही अतिसेवन करणे टाळावे. केवळ डोकेदुखीसाठी तुम्ही हे एक ते दोन कप पिऊ शकता.  

ADVERTISEMENT

कॅमोमाईल (Chamomile)

Camomile

डोकेदुखी घरगुती उपाय

 

साहित्य

 • दोन ते तीन थेंब कॅमोमाईल एसेन्शियल ऑईल
 • दोन ते तीन चमचे पाणी 

वापरण्याची  पद्धत 

ADVERTISEMENT
 • डोकेदुखीवर उपाय करण्यासाठी पाण्यात कॅमोमाईल एसेन्शियल ऑईल मिक्स करा 
 • याचा वास घेत राहा 
 • हवं तर तुम्ही या डिफ्युजरसारखा वापर करू शकता 
 • त्याशिवाय तुम्ही डोकेदुखी दरम्यान कॅमोमाईलचा उपयोग करून घेऊ शकता

कसे ठरते फायदेशीर 

डोकेदुखी दरम्यान तुम्ही कॅमोमाईल एसेन्शियल ऑईल अथवा कॅमोमाईलचा चहादेखील पिऊ शकता. यामुळे औषधासारखा उपयोग होतो. साधारण अर्धा तासामध्ये तुमची डोकेदुखी थांबविण्यासाठी याची मदत मिळते. तसंच उलटी, मळमळ यावरही याचा उपयोग होतो. अँटिडिप्रेसेंट म्हणून कॅमोमाईल काम करते. 

चंदन (Chandan)

Chandan

डोकेदुखी घरगुती उपाय

ADVERTISEMENT

 

साहित्य 

 • आवश्यकतेनुसार चंदन पावडर 
 • पाणी 
 • चंदन तेल 

वापरण्याची पद्धत 

 • आवश्यकतेनुसार चंदन पावडरमध्ये पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या 
 • ही पेस्ट डोक्यावर लावा आणि सुकू द्या 
 • तुम्हाला पेस्ट लावायची नसेल तर चंदन तेल घ्या आणि कपाळाला लाऊन मालिश करा 
 • चंदन तेलाचा तुम्ही वासही घेऊ शकता 
 • याशिवाय गरम पाण्यात चंदन तेलाचे काही थेंब घालून तुम्ही त्याची वाफही घेऊ शकता

कसे ठरते फायदेशीर

चंदन डोकेदुखीवर चांगला घरगुती उपाय आहे. चंदनाचा वास हा मनमोहक असून याचा थंडावा डोकेदुखी पटकन कमी करतो. तसंच याच्या वासानेच डोकेदुखी कमी होते. औषध म्हणून अनेक वर्षांपासून याचा उपयोग करून घेता येत आहे. 

ADVERTISEMENT

डोकेदुखीसाठी अन्य सोपे उपाय (Easy Treatment For Headache In Marathi)

डोकेदुखीसाठी अन्य  काही उपयादेखील आहेत. काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी डोके दुखते. मात्र गरोदर असताना डोके दुखत असेल तर यापैकी कोणतेही उपाय न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्य सोपे उपाय खालीलप्रमाणे – 

 • डोकेदुखीवरील औषधे आणि गोळ्या 
 • मसाज थेरपी
 • खाण्यापिण्याच्या वेळेत बदल 
 • तणाव व्यवस्थापनाची गरज आणि उपाय 
 • दातदुखीमुळे अथवा अन्य शारीरिक दुखीमुळे डोके दुखत असल्यास त्याचा वेळेवर उपाय करावा

कशी घ्याल काळजी (Headache Prevention Tips In Marathi)

डोकेदुखीवर घरगुती उपाय तर आहेतच पण डोकेदुखी होऊच नये यासाठी तुम्ही आधीपासूनच काही काळजी घेऊ शकता. ती नक्की काय आहे ते जाणून घेऊया. 

 • थंड अथवा गरम पाण्याने आंघोळ करा 
 • आठवड्यातून एकदा तरी मान आणि डोक्याला हलक्या हाताने मालिश करा 
 • धुम्रपान अथवा दारूचे सेवन करणे टाळा 
 • डोक्यावर पाण्याच्या कपड्याची घडी घाला 
 • रात्री झोपताना अंधारातच झोपाल याची पूर्ण काळजी घ्या. प्रकाशात झोपू नका आणि शांत आराम करा
 • झोप पूर्ण होऊ द्या. किमान 8 तास झोप घेणे आवश्यक आहे
 • एकाच पोझिशनमध्ये झोपू नका. वेगवेगळी कूस बदलून झोपण्याची सवय लाऊन घ्या 
 • शक्यतो झोपताना उशी घेऊ नका आणि घेतलीच तरी काही महिन्यांनी बदलत राहा
 • डोळ्यांची समस्या असेल आणि चष्मा लावत असाल तर तो नियमित लावा अन्यथा डोके दुखते
 • व्यायाम करा आणि शरीराला सुदृढ ठेवा म्हणजे डोके दुखणार नाही 
 • दिवसातून किमान 15 मिनिट्स ध्यानधारणा करा 
 • टीव्ही, मोबाईल, कम्प्यूटर अथवा लॅपटॉपवर तासनतास काम करत असाल तर मध्ये मध्ये डोळ्याना आराम मिळू द्या.  सतत त्याकडे पाहत बसू नका

ही काळजी घेतल्याने सहसा डोकं दुखत नाही. त्यामुळे डोकेदुखीची समस्या सुरू होण्यापूर्वीच तुम्ही या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. डोकेदुखीवर स्वतःहून औषध घेणे कितपत हानिकारक आहे ?

डोकेदुखी अति प्रमाणात होत असेल तर कोणतेही औषध डॉक्टरांना न विचारता घेणे अत्यंत चुकीचे  आहे. यामुळे शरीरवर अन्य परिणमही होतात.  त्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषध घेणे योग्य.

2. डोकेदुखी घरगुती उपाय यशस्वी होतो का ?

साधी डोकेदुखी असेल तर वर दिल्यापैकी कोणताही घरगुती उपाय हा उपयोगी ठरतो.  मात्र तुम्हाला या उपायांपैकी कोणत्याही गोष्टी अलर्जी नाही ना याची खात्री करून घ्या.

3. डोकेदुखीवरील घरगुती उपायांनी फरक पडतो का ?

हो. डोकेदुखील घरगुती उपायांनी काही प्रमाणात फरक पडतो. काही उपायांचा त्वरीत परिणाम होतो तर काही उपायांचा काही तासांनंतर परिणाम होतो.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
17 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT