ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
तुमच्या छंदातूनही मिळवू शकता पैसा जाणून घ्या कसा (Hobbies That Make Money In Marathi)

तुमच्या छंदातूनही मिळवू शकता पैसा जाणून घ्या कसा (Hobbies That Make Money In Marathi)

सध्या काळात स्वत:च्या पायावर उभे राहणे आणि स्वत:चा खर्च स्वत: करु शकणे फारच महत्वाचे झाले आहे. आता यासाठी शिक्षण हे फार महत्वाचे आहे. योग्य शिक्षणामुळे तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतात. पण काहींना इंजिनीअर, डॉक्टर , पत्रकार किंवा शिक्षक या क्षेत्रात करीअर करायचे असतेच असे नाही. त्यांना त्यांचा छंदही जोपासायचा असतो. पण करीअर आणि भविष्य या सगळ्यामध्ये आपले छंद मात्र मागे पडत जातात. ते इतके मागे पडतात की, आपल्याला काय आवडते याचाही आपल्याला विसर पडतो. अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल की, छंद हे फक्त जोपासण्यासाठी असतात. त्यातून तुम्हाला पैसा मिळेल, चांगले लाईफस्टाईल मिळेल याची खात्री अजिबात देता येत नाही. पण आता या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. आता अनेकांनी त्यांच्या छंदातूनच पैसे कमवायला सुरुवात केली आहे. आता तुमचा छंद तुम्ही तुमच्या करीअरमध्ये कसा बदलू शकता यासाठीच आम्ही तुम्हाला काही घरगुती व्यवसाय आयडिया देणार आहोत. मग करुया सुरुवात.

ब्लॉगिंग (Writing/Blogging)

लिहायला करा सुरुवात

shutterstock

जर तुम्हला लिहिण्याची आवड असेल तर तुम्ही तुमची ही कलाही जोपासू शकता. सोशल मीडियावर आजही असा वर्ग आहे ज्याला ऑनलाईन नवनवे विषय वाचायला फार आवडतात. जर तुम्ही कथा लिहित असाल तर या कथ किंवा लेख तुम्हाला फोटो सकट इंटरनेटवर टाकता येतात आणि ब्लॉग तयार करा. तुमच्या अनुभवांचे कथन ज्यावेळी तुम्ही सोशल मीडियातून करता तेव्हा एकाचवेळी तुमच्यासोबत अनेक जण जोडले जातात.तुम्ही करत असलेल्या कामासोबत तुमचा हा छंद जोपासू शकता. तुम्हाला यासाठी वेगळे  काही पैसे खर्च करण्याचीही काही गरज नाही

ADVERTISEMENT

असा कमवू शकता पैसा:

इंटरनेटवर तुमच्या लेखाला जितके पेज व्ह्यूज मिळतील. त्यावर तुमच्या पैशांची कमाई अवलंबून असते. आता अगदी पहिल्याच लेखात तुम्हाला खूप पैसे मिळतील असे होणार नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि काही काळ वाटही पाहावी लागेल. जर तुम्ही एखाद्या वेबसाईटसाठी लिहू शकत असाल तर त्यापासूनही सुरुवात करा. तुम्हाला त्यातून अगदी लवकर पैसे मिळू शकतील.

वाचा – जाणून घ्या स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू कराल

मेकअप (Make up)

बना मेकअप आर्टिस्ट

ADVERTISEMENT

shutterstock

जर तुम्हाला उत्तम मेकअप करता येत असेल तर तुमच्याकडे पैसे कमावण्यासाठी उत्तम असा छंद आहे. लग्न समारंभ, पार्टी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही अगदी आरामात मेकअप आर्टिस्ट म्हणून जाऊ शकता. मेकअप आर्टिस्ट होणे हे कमीपणाचे नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला फार निपूण असावे लागते. त्यामुळे तुम्हाला हा छंद असेल तर तुम्ही त्याचा योग्य उपयोग करा. जर तुम्ही एखादा मेकअप क्लास केला असेल तर फारच चांगले पण जर तुम्हाला ते करायची इच्छा असेल तरी देखील तुम्ही या छंदातून पैसा कमावण्यासाठी मेकअप शिकू शकता. 

असा कमवू शकता पैसा:

तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर तुम्हाला माहीत असेल तर सोशल मीडियावर तुम्हाला अनेक मेकअप व्हिडिओ दिसतील. अनेकांना हे मेकअप व्हिडिओ आवडतात. जर तुम्हाला प्रत्यक्ष मेकअप करायला जाणे शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ करु शकता आणि सोशल मीडियावर शेअर करु शकता. जर तुम्ही मेकअपसंदर्भातील टुटोरिअल व्हिडिओ केले तरी चालू शकेल. तुम्हाला व्ह्यूजनंतर यातून पैसे मिळू शकतात. जर समाधानकारक पैसे मिळाले नाही तर तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळे नक्कीच करता येईल.

ADVERTISEMENT

कुकींग अॅण्ड बेकिंग (Cooking /Baking)

कुकींग आणि बेकिंगमधून कमवा पैसा

shutterstock

तुमच्या हाताला चांगली चव असेल आणि तुम्हाला लोकांना खाऊ घालणे आवडत असेल तर तुमच्यासाठी कुकींग आणि बेकिंग हे एक परफेक्ट करीअर आहे. कारण तुम्हाला यामुळे खूप पैसा कमावता येऊ शकतो.तुमच्या हातची चवच तुम्हाला यामुळे चांगली प्रसिद्धी देऊ शकते. तुमच्या रोजच्या कामातून थोडा ब्रेक घेऊन तुम्ही काहीतरी वेगळे स्वत:च्या आवडीचे करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला तुमचा कुकींगचा छंद जोपासायला हरकत नाही.

असा कमवू शकता पैसा:

ADVERTISEMENT

तुम्हाला जर लोकांपर्यंत तुमच्या पदार्थांची चव पोहोचवायची असेल तर तुम्ही डबे सुरु करु शकता.पण याची सुरुवात लगेच करु नका. आधी तुम्ही काही जणांना काही दिवस तुमचे जेवण खाऊ घाला. तुमची चव एकदा लोकांना आवडली की, तुम्ही या गोष्टीसाठी तयार आहात. तुम्ही डब्यापासून नंतर हॉटेलपर्यंत  असा प्रवासही करु शकता. जर तुम्हाला रेसिपी व्हिडिओ करण्यामध्ये रस असेल तर तुम्ही असे व्हिडिओ करुनही पैसे मिळवू शकता. जर तुम्हाला बेकिंगची आवड असेल तर छान केक, कुकीज बनवा ते विका. किंवा व्हिडिओ करा.

 

सोशल मीडिया सांभाळणे (Social Media Person)

सोशल मीडिया सांभाळा

shutterstock

ADVERTISEMENT

हल्ली सगळेच सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साहजिकच त्यांना सगळ्या सोशल मीडियावरुन अॅक्टिव्ह राहावे लागते. अनेकांना हे सांभाळणे जमत नाही. जर तुम्ही तुमचा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. तुम्ही त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट अगदी घरबसल्या सांभाळू शकता. तुम्हाला सोशल मीडियाशी निगडीत सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग या गोष्टी करता येतील. 

असा कमवू शकता पैसा:

सोशल मीडिया सांभाळणे हे हल्ली करीअर झाले आहे. सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्यासाठी काही खास माणसं ठेवली जातात. जर तुम्ही सोशल मीडियाचा एखादा ऑनलाईन कोर्स केला तर तुम्हाला याचे अधिक ज्ञान मिळेल आणि तुम्ही तुमची टिम बनवून हे काम करु शकता. 

#CoronaOutbreak : मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home)

ADVERTISEMENT

फोटोग्राफी (Photography)

फोटोग्राफीपासूनही मिळवू शकता पैसे

shutterstock

अनेकांना फोटोग्राफीचाही छंद असतो. जर तुम्ही तुमच्या फोटोग्राफीपासून पैसे कमावत नसाल तर तुम्ही या माध्यमातून पैसे कमवायला काहीच हरकत नाही. हल्ली लोक प्री वेडींगपासून लग्नापर्यंत किंवा छोट्या छोट्या पार्टीलाही प्रोफेशनल फोटोग्राफरची मदत घेतात अशावेळी तुम्हाला तुमच्या फोटोग्राफीचा छंद करीअरमध्ये बदलण्यास काहीच हरकत नाही. आता यासाठी तुम्हाला खर्च हा करावा लागेल. कारण कॅमेरा, लाईट्स यांचा खर्च हा फारच असतो. त्यामुळे तुम्ही अगदी पटकन याची सुरुवात सगळं सोडून करु नका. सुरुवातीला तुम्ही पार्टटाईम असे काम करा. कोणा दुसऱ्याच्या हाताखाली काम करुन शिकता आले तर शिकून घ्या. पूर्ण तयारी झाल्यानंतर मग तुम्ही या कामाला लागा. कारण तरचं तुम्हाला तुमचा छंद हा करीअरमध्ये  बदलण्यासाठी तुम्ही तयार आहात की नाही हे कळू शकेल. 

असा कमवू शकता पैसा:

ADVERTISEMENT

तुम्ही एखाद्या फोटोग्राफी ग्रुपला जॉईन होऊन त्यांच्यासोबत काही असायमेंट करायला सुरु करा. तुमच्याकडे प्रीवेडींग आणि इतर काही फोटोंच्या वेगळ्या कल्पना असतील तर त्या इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर टाकायला सुरुवात करा. या दरम्यान एडीटिंग शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त नफा यामधून मिळू शकेल. 

फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer)

फिटनेस ट्रेनरही आहे चांगला पर्याय

shutterstock

जर तुम्हाला फिटनेसची आवड असेल तुम्हाला घरी राहून कोणते सोपे आणि योग्य व्यायाम करता येतील याची योग्य माहिती असेल तर तुमच्या या छंदाचे रुपांतर तुम्हाला करीअरमध्ये अगदी हमखास करता येईल. तुम्हाला यासाठी सातत्य महत्वाचे आहे. शिवाय तुम्ही लोकांना फिटनेसचे धडे देताना तुम्ही स्वत:ही फिट राहाणे फारच गरजेचे आहे. त्यामुळे आधी तुम्ही छान फिट व्हा. तुम्हाला न्युट्रीशनचा एखादा कोर्स करता येतो का ते पाहा. म्हणजे तुम्हाला तुमच्या करीअरची सुरुवात करा. 

ADVERTISEMENT

असा कमवू शकता पैसा:

सध्याचा ट्रेंड हा फिटनेसचा आहे. जर तुम्हाला पार्टटाईम फिटनेस ट्रेनर होण्यास स्वारस्य असेल तर फार चांगली गोष्ट तर तुम्ही त्यापासून सुरुवात करु शकता. तुमच्याकडे बराच वेळ असेल तर तुम्ही तुमचे काही क्लाएंट बनवून त्यांना फिटनेसचा सल्ला घरबसल्या देऊ शकता. त्यांच्याकडून काही व्यायामप्रकार करुन घेऊ शकता. तुम्हाला पुढे तुमची स्वत:ची टिमही तयार करता येऊ शकते. यामाध्यमातूनही तुम्हाला पैसा कमावता येऊ शकतो. 

शिवणकाम (Tailoring)

फॅशनचा पर्यायही आहे चांगला

shutterstock

ADVERTISEMENT

शिवणकामाची तुम्हाला आवड असेल. तुम्हाला वेगवेगळ्या स्टाईल्सचे कपडे शिवायला आवडत असतील तर फॅशनचे दार तुमच्यासाठी कायमच उघडे आहे. तुम्हाला फॅशनचा चांगला सेन्स असेल तर तुम्ही हा छंद करीअर म्हणून निवडायला काहीच हरकत नाही. यासाठी तुम्हाला तुमचा फॅशन सेन्स नेहमीच अपडेट ठेवावा लागेल. शिवाय फॅशनच्या नव्या टेक्निक्सही शिकाव्या लागतील. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शिवणकामाचा उपयोग अशा पद्धतीने करता येतील.

असा कमवू शकता पैसा: 

जर तु्हाला एखादे बुटीक सुरु करणे शक्य असेल तर घरच्या घरी आधी या गोष्टी करा. जुन्या कपड्यांपासून किंवा साड्यांपासून जर तुम्हाला काही नवे क्रिएट करता येत असतील तर तसे काही पॅटनर्न आधी तयार करा. तुम्हाला तुमच्या तयार केलेल्या कपड्यांना शोकेस करायचे असेल तर फेसबुक आणि इन्स्टाग्राम उत्तम माध्यम आहे. तुम्ही त्या माध्यमातूनही तुमच्या डिझाईन्स  तयार करु शकता. फॅशन ही अशी इंडस्ट्री आहे जर तुम्ही क्रिएटीव्ह आणि रिझनेबल कपडे विकणारे असाल तर लोकं तुमच्याकडे अगदी हमखास येतात.

शॉपिंग गाईड (Shopping Guide)

शॉपिंग गाईड

ADVERTISEMENT

shutterstock

 

कपडे कुठून घ्यायचे असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. जर तुम्हाला मार्केटच उत्तम ज्ञान असेल तर तुमच्यासाठी शॉपिंग गाईड होणे हा चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्हाला तुमची आहे ती नोकरी सोडण्याचीही काही गरज नाही. तुकारण तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही शॉपिंग गाईड होऊ शकता. यासाठी तुम्ही पैसेही आकारु शकता. लग्न किंवा एखाद्या पार्टीसाठी थीम कपडे  अनेकांना घ्यायचे असतात. काहींना फिरण्याचा वेळ नसतो. अशावेळी तुमची मदत त्यांच्या कामी येऊ शकते. 

असा कमवू शकता पैसा:

आता तुम्हाला शॉपिंग गाईड व्हायचं आहे तर त्याची सुरुवात तुम्हाला डिझायनरसोबत टायअप करुन किंवा एखाद्या इव्हेंट कंपनीशी संपर्क ठेवून क्लाएंट मिळवावे लागतील. असे क्लाएंट मिळाल्यानंतर तुम्ही काही वेबसाईटशी टायअप करुन त्यांचे कपडेही विकू शकता. आता हे काम तुम्हाला पटकन प्रसिद्धी आणि फायदा मिळवून देईल असे होणार नाही. तुम्हाला वेगवेगळ्या शक्कल यासाठी लावाव्या लागतील.

ADVERTISEMENT

 

 

गार्डनिंग (Gardening)

गार्डनिंगची आवडही करीअरचा असू शकतो पर्याय

shutterstock

ADVERTISEMENT

 

बाल्कनी गार्डन किंवा झाडं लावणे हा अनेकांचा छंद आहे. शहराकडे राहिलेल्या माणसांना जागा घेऊन शेती करायला फार आवडते. अनेकांनी सेकंड होम म्हणून जागा किंवा फार्म हाऊस घेतले आहेत. पण दर शनिवार-रविवार  त्यांना या ठिकाणी जाता येतेच असे नाही. अशावेळी तुम्ही त्याची जागा गार्डनिंगसाठी म्हणजेच मेन्टनंस साठी घेऊ शकता. गार्डनिंगची आवड असेल आणि तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीनचे गार्डनिंग शिकून घ्याचे असतील तर ते शिकून घ्या आणि या कामाचा श्रीगणेशा करा.

असा कमवू शकता पैसा:

आता तुम्हाला गार्डनिंगची काम मिळवायची असेल तर तुम्हाला आधी तुमच्या गार्डनिंगच्या आवडीबद्दल आणि तुमच्या बागेबद्दल लोकांना सांगता आले पाहिजे. तुम्ही बाल्कनी गार्डन केले असेल. झाडं लावली असतील तर त्याचे फोटो, तुम्ही घरी तयार केलेले खत या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरुन पोस्ट करा. तुम्ही हळुहळू लोकांशी संपर्क वाढवून काम मिळवू शकता. हा छंद तुम्हाला आनंद आणि पैसा दोन्ही नक्कीच देऊ शकेल.

 

ADVERTISEMENT

 

डान्सिंग (Dancing)

डान्स क्लासने कमवा पैसा

shutterstock

 

नृत्य कलाही अनेकांकडे असते. पण अनेकदा चांगले नाचूनही हा छंद बाजूला ठेवून काम करावे लागते. जर तुम्हाला कधी असेल वाटले की, तुम्ही या छंदापासून करीअर करु शकता. पैसे कमावू शकता. हल्ली फिटनेस आणि डान्स यांचे समीकरण झाले आहे. अनेकांना डान्स करुन फिट राहायचे असते. त्यामुळे तुम्हाला जर डान्सचे वेगवेगळे प्रकार खूप छान येत  असतील तर मग तुम्ही मस्त डान्स अॅकडमी सुरु करा किंवा तुमचे डान्स व्हिडिओ पोस्ट करा

ADVERTISEMENT

असा कमवू शकता पैसा:

तुम्हाला या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला काही तरी वेगळे करावे लागेल. तुम्ही किती उत्तम नाचता हे लोकांना दाखवून देण्यासाठी तुम्ही मस्त व्हिडिओ करा. तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही जागेचा उपयोग करुन वीकेंडला डान्स अॅकडमी सुरु करा. नाचण्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि इतरांनाही खूश कराल. आता तुम्हाला यातून पैसा कमवायचा असेल तर तुम्ही थोडे वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवे.

 

 

ADVERTISEMENT

आर्ट्स अँड क्राफ्ट (Art and Crafts)

हस्तकला आणि चित्रकला

shutterstock

लोकांना अधिकाधिक गुंतवून ठेवण्यासाठी काहीतरी छंद असावा लागतो. जर तुमची चित्रकला किंवा हस्तकला चांगली असेल तुम्हाला घर डेकोर करण्यापासून ते अगदी सजावटीच्या छोट्या छोट्या वस्तू घरी बनवता येत असतील तर मग तुम्ही तुमचा हा छंद पैसै कमावण्यासाठी वापरु शकता. तुम्ही क्लासेस घेऊ शकता.या वस्तू अगदी आरामात विकू शकता.  पण तुम्हाला कायम वेगळेपणा शिकत राहणे गरजेचे असते. तुम्ही या कालावधीत स्वत:च  वेगळे क्लास करुन स्वत:ला अपडेट करु शकता. 

असा कमवू शकता पैसा:

ADVERTISEMENT

आता सोशल मीडिया हे एकमेव माध्यम आहे जे तुम्हाला तुमच्या कला सादर करण्याची संधी देते. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही बनवलेल्या वस्तूंचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करा. ते तुम्ही कसे करता ते दाखवा आणि त्यानंतर तुम्ही त्याचे क्लासेस घ्यायली सुरु करा. असे करताना तुम्हाला यातून नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. तुम्ही यातून चांगला पैसा कमावू शकाल. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे तुम्ही तुमचा छंद जपू शकाल.

फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असल्यास जाणून घ्या टीप्स (English Speaking Course In Marathi)

ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing)

ग्राफिक डिझायनिंग

shutterstock

ADVERTISEMENT

खूप जणांनी ग्राफिक डिझायनिंग हा कोर्स नक्कीच केला असेल. हल्ली अनेक जण लग्न पत्रिका किंवा इतर कोणताही कंटेट सोशल मीडियावर शेअर करतात. अशावेळी त्यांना ग्राफिक डिझायनिंगची गरज लागते. जर तुमच्याकडे ग्राफिक डिझायनिंगचे सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम करु शकता.वेबसाईट सजवणे, लोगो तयार करणे ही कामे तुम्ही करु शकता. यामधून तुम्हाला चांगले पैसेही मिळू शकतात.

असा कमवू शकता पैसा:

तुम्हाला याचा अनुभव घेण्यासाठी आधी कोणत्यातरी ग्राफिक डिझायनरकडे कामाची सुरुवात करा. त्यांच्या कामाचे स्वरुप ओळखून मग तुम्ही काम करायला सुरुवात करा. तुमच्या कामांचे प्रदर्शन तुम्ही सोशल मीडियावर करायला विसरु नका. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)

1. तुमच्या छंदाचा उपयोग तुम्हाला पैसै कमावण्यासाठी होऊ शकतो हे कसे ओळखावे?
प्रत्येक छंदातून पैसे कमावण्याची संधी असते. स्वयंपाक या कलेचा उपयोग करुन अनेक गृहिणींनी किंवा पुरुषांनीही पैसे कमावले आहे. मेंदी,रांगोळी, चित्रकला किंवा तुम्हाला वाटणाऱ्या अगदी साफसफाईसारख्या गोष्टीतूनही पैसा कमावता येतो. आता या गोष्टीला व्यापक स्वरुप कसे द्यायचे हे मात्र तुमच्या हातात असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या छंदाचा उपयोग आरामात पैसै कमावण्यासाठी होतो. 

ADVERTISEMENT

2. छंदातून पैसे कमवायला वेळ लागतो का? 
अर्थात अगदी कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्यातून फायदा होत आहे की नाही ते पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. हा काही काळ महिन्यांपासून वर्षांपर्यंतचा असू शकतो. यासाठी तुमच्यातील सहनशक्ती हा महत्वाचा गुण तुमच्यामध्ये असावा लागतो. तो तुमच्यात नसेल तर बिंबवा. पण हाती घेतलेले काम पूर्ण होऊपर्यं हार अजिबात मानू नका. 

3. छंदाचे रुपांतर करीअरमध्ये होऊ शकते का? 
नक्कीच छंदाचे रुपांतर अगदी हमखास तुमच्या करीअरमध्ये करता येऊ शकते. पण तुम्हाला तुमच्यावर विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही द्यायला हवा. छंदाचे करीअरमध्ये रुपांतर करताना अपयश येऊ शकते. पण तरीही हार मानू नका. 

आता तुम्हीही तुमचा छंद जोपासणे सोडून दिले असेल आणि तुम्हाला छंदातून तुम्ही पैसे कमावू शकता असा विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार करु शकता. 

24 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT