डोळे सुंदर दिसावते यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. त्यातही पापण्यांना अधिक महत्त्व असतं. लांबसडक आणि उठावदार पापण्या दिसाव्यात म्हणून बरेचदा मस्काराचा वापर होतो. तर काही जणांना खोट्या पापण्याही लावाव्या लागतात. याचा कदाचित काही जणींना त्रासही होतो. पण सुंदर दिसण्यासाठी हा त्रास सहन केला जातो.तुम्हाला याची जाणीव आहे का जर आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर नैसर्गिकरित्या आपल्या पापण्या नक्कीच दाट करता येतात. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमच्या पापण्या दाट आणि सुंदर नक्कीच करू शकता. त्यासाठी तुम्ही विविध मास्कचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला अगदी सोपे घरगुती उपाय करायचे आहेत. नक्की काय आहेत हे उपाय हे आपण बघणार आहोत.
1. फायदेशीर एरंडेल तेल
Shutterstock
तुम्हाला जर नैसर्गिकरित्या पापण्या दाट करायच्या असतील तर तुम्ही 2 चमचे एरंडेलाचं तेल घेऊन साधारण पाच मिनिट्स मंद आचेवर गरम करा. त्यानंतर गॅस बंद करून तेल गार करत ठेवा. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांवरील रोम विकसित करण्यासाठी मदत करतात. यामुळे पापण्या दाट होण्यास मदत होते. तसंच हा अतिशय सोपा आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांनाही कोणताही त्रास होत नाही.
घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक
2. व्हिटामिन ई कॅप्सूलची कमाल
Shutterstock
तुम्हाला जर पापण्या दाट आणि सुंदर हव्या असतील तर तुम्ही व्हिटामिन ई कॅप्सूलचा वापर करा. त्यासाठी तुम्ही व्हिटामिन ई कॅप्सूल घेऊन सुईने त्याला भोक पाडा आणि त्यातील जेल एका वाटीत काढा. त्यानंतर त्यात कॅस्टर ऑईल मिसळा. हे मिश्रण तुम्ही जर पापण्यांना लावलंत तर तुम्हाला हव्या तशा दाट पापण्या मिळतील.
सुंदर डोळ्यांसाठी अशी घ्या ‘पापण्यांची’ काळजी
3. लाभदायक कोरफड
Shutterstock
कोरफड हे अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये अथवा चेहऱ्याशी निगडीत औषधांमध्ये वापरण्यात येतं. त्याचप्रमाणे तुम्हाला पापण्या सुंदर हव्या असल्यास, याचा उपयोग करून घेता येतो. तुमच्या घरात जर ताजं कोरफड असेल तर तुम्ही कोरफडाचं एक पान घ्या आणि त्यातून जेल बाहेर काढून घ्या. त्यानंतर एका वाटीत ते नीट फेटून घ्या. यामध्ये तुम्ही एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळा. हे मिश्रण तुम्ही नियमित वापरलंत तर तुमच्या पापण्या गळण्यापासून थांबतात. तसंच पापण्यांचे केस दाट होण्यासही मदत मिळते. लक्षात ठेवा हे मिश्रण तुम्ही ब्रशच्या मदतीने पापण्यांवर लावा आणि हे मिश्रण लावण्यापूर्वी तुम्ही पापण्यांचे केस ब्रशने स्वच्छ करून घ्या. विशेष म्हणजे हे मिश्रण तुम्ही एक महिना वापरू शकता. केवळ पापण्यांसाठीच नाही तर तुम्ही तुमच्या आयब्रोज दाट करण्यासाठीही याचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे मास्क रात्रभर भुवयांना लावून ठेवावं लागेल. पापण्यांनाही हे मिश्रण तुम्ही रात्रभर लावून ठेवा. सकाळी तुम्हाला तुमच्या पापण्या अधिक नरम जाणवतील. तुम्ही सतत एक महिना याचा वापर केल्यास, तुम्हाला नक्कीच दाट पापण्या मिळतील. स्वतःलाच आपल्या पापण्यांमधील फरक जाणवेल.
5 दिवसात तुमच्याही पापण्या होतील लांब, करा हे उपाय
4. केमिकलचा वापर टाळा
Shutterstock
तुम्ही कोणतंही मास्क पापण्यांसाठी घरी तयार करताना त्यामध्ये केमिकल वापरलं जाणार नाही याची नीट काळजी घ्या. तसंच तुम्ही जेव्हा दाट पापण्यांसाठी घरगुती मास्क बनवाल तेव्हा तुमच्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीन आणि व्हिटामिन असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं जास्त गरजेचं आहे. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्याने तुमच्या डोळ्यांच्या पापण्या अधिक सुंदर आणि दाट होण्यास मदत मिळते.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.