ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
सतत सुकत असेल तोंड तर करा सोपे घरगुती उपाय

सतत सुकत असेल तोंड तर करा सोपे घरगुती उपाय

तुम्ही नेहमीच मोठ्यांकडून ऐकता की, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण दिवसातून दोन वेळा ब्रश करणे गरजेचे आहे, पाणी भरपूर प्यायला हवे आणि आपल्या आरोग्याला व्यवस्थित राखेल असंच जेवण जेवायला हवे. पण असं असूनही बऱ्याच जणांना सतत तोंड सुकण्याची समस्या असते. तोंड सतत सुकल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि सतत पाणी पित राहावे असे वाटत राहते. पण तोंड सुकण्याची अनेक कारणे असतात. बऱ्याच वेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण यावर काही घरगुती उपाय आहेत का असा प्रश्न असतो. तर हो यावर काही उपाय आहेत. आम्ही तुम्हाला या लेखातून याचे उपाय सांगणार आहोत. पण त्याआधी नक्की तोंड का सुकते ते आपण जाणून घेऊया. 

तोंड सुकणे म्हणजे काय?

तोंड सुकणे म्हणजे काय?

Freepik

आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होणे बंद होते आणि त्यामुळेच तोंड सुकण्याची समस्या सुरू होते. तोंडात तयार होणारी लाळ अॅसिडला संपुष्टात आणते, ज्यामुळे दातांना कीड लागण्याची समस्या निघून जाते. पण जेव्हा लाळ तयार होणे बंद होते तेव्हा तोंडाला दुर्गंधी येणे, चव निघून जाणे, चिकटपणा तोंडात येणे अशा अनेक समस्या सुरू होतात. तोंडात तयार होणारी लाळ ही आपल्याला घास खाण्यासाठीही मदत करते आणि तसं न झाल्यास घास चावण्यास आणि तो गिळण्यासही त्रास होतो. 

ADVERTISEMENT

काय आहे याचे कारण

काय आहे याचे कारण

Freepik

तोंड तेव्हा सुकतं जेव्हा तुमच्या लाळ ग्रंथी तोंड ओले ठेवण्यासाठी लाळ बनवू शकत नाही. पण असं असण्यामागे अनेक कारणे आहेत. 

  • वय वाढण्यामुळेही असं होतं. वय वाढल्यानंतर काही औषधे घेतली जातात आणि त्याचे सेवन केल्यानंतर ग्रंथी हळूहळू काम करू लागतात. त्यामुळे लाळ तयार होणे कमी होते आणि तोंड सुकू लागते
  • पाण्याची कमतरता हेदेखील दुसरे कारण आहे. पाण्याची कमतरता तुमच्या शरीरावर परिणाम करते तसंच ते लाळ बनविण्याऱ्या ग्रंथीवरही परिणाम करते
  • एलर्जी ठीक करणाऱ्या औषधांमुळेही तोंड सुकते. याशिवाय मांसपेशींसाठी वापरण्यात येणारी औषधे, नाकातील ड्रॉप्स आणि औषधे यांच्यामुळेही ही समस्या निर्माण होते

घरगुती उपाय

तोंड सुकण्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय (home remedies) करू शकता. तुम्हाला ही समस्या अधिक असल्याचे जाणवत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधा. 

ADVERTISEMENT

कोरफड (Aloe Vera)

कोरफड (Aloe Vera)

Shutterstock

कोरफड तोंडात लाळ राखण्यास मदत करतके. ज्यामुळे संवेदनशील टिश्यूज आणि टेस्ट बड्स वाढतात. रोज सकाळी पाव कप कोरफडचा ज्युस तुम्ही प्या. तसंच याने तुम्ही चूळ भरली तर तुमच्या तोंडाला दुर्गंधी राहात नाही. इतकंच नाही तर तोंडाला फोड येणे अर्थात तोंड येणे समस्या असेल तर तुम्हाला त्यातूनही सुटका मिळण्यासाठी करफड ज्युसचा उपयोग होतो. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल तुमच्या तोंडाला लावा आणि दहा मिनिट्सनंतर कोमट पाण्याने चूळ भरा. याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतो. 

बडिशेप (Fennel)

बडिशेप (Fennel)

ADVERTISEMENT

Shutterstock

बडिशेप खाण्याने तोंडाची दुर्गंधी निघून जाते आणि यामुळे लाळही तयार होते. तोंड्याच्या सुकेपणाला दूर सारण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा बडिशेप दिवसातून तीन वेळा चावून खा. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी, त्यात एक चमचा बडिशेप आणि एक चमचा साखर घालून उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. यामुळे तोंड सुकणार नाही. बडिशेपेचे सरबत अथवा पाणी हे पोटासाठी लाभदायक ठरते. 

लिंबाचा रस

लिंबाचा रस

Shutterstock

ADVERTISEMENT

लिंबाचा रस लाळ निर्माण करण्यास मदत करते. यामुळे तोंडात लाळ तयार होण्यास फायदा मिळतो. यामध्ये अॅसिडिक आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे श्वासातील दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात. एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या. त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. त्यात थोडेसे मध मिक्स करा. दिवसातून दोन वेळा तुम्ही हे प्या. लिंबाच्या तुकड्यांना काळे मीठ लावा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा ते चाखा. यामुळेही तुम्हाला असणाऱ्या सुक्या तोंडाचा त्रास कमी होईल. 

याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात मिरचीचे सेवन करा. तिखट मिरची खाण्याने तोंडात लाळेचे उत्पादन होते. त्यामुळे तोंड सुकत नाही. तसंच तुम्ही नियमित भरपूर पाणी पित राहा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT