ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
हातांना अति घाम येण्याची असेल समस्या, तर वापरा घरगुती उपाय

हातांना अति घाम येण्याची असेल समस्या, तर वापरा घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात हातांना घाम येणे हे अत्यंत कॉमन आहे. पण जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त घाम येतो आणि जर सतत घाम येण्याची समस्या असेल तर यावर नक्कीच विचार करावा लागतो. घाम येणे म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित राखणे. शरीरासह काही जणांच्या हातांनाही खूप घाम येतो. पण काही जणांना हाताला इतका घाम येतो की, त्यांना नियमित काम करतानाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. मीटिंगमध्ये एखाद्याला मग हात मिळवणेही कठीण जाते. तर काही जणांना सतत घाम आल्याने लाजही वाटते. तुमच्याही हाताला सतत घाम येण्याची समस्या असेल तर तुम्हाला याबाबत माहीत असायला हवे. कारण ही समस्या असून कॉमन गोष्ट नक्कीच नाही. तुम्हाला शरीरासंबंधी कोणती तरी समस्या असल्यामुळे हाताला जास्त घाम येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही घरगुती उपाय वापरून यावर उपचार करू शकता. 

अति घामाचे कारण

हायपरहायड्रोसिसच्या बाबतीत अतिसक्रिय घामाच्या ग्रंथी या घाम येण्यास कारणीभूत ठरतात. अतिस्वेदलता अथवा हायपरहायड्रोसिस अशी अवस्था आहे जी असामान्य रूपात अधिक घाम आणते आणि शरीराचे तापमान अशा अवस्थेत नियंत्रित करणे गरजेचे आहे. हा एक आजार असून यामुळे हातांना आणि हाताच्या तळव्यांना अधिक घाम येतो. अति घाम येत असेल तर कोणते घरगुती उपाय वापरायचे ते आपण या लेखातून पाहूया. 

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा

Shutterstock

ADVERTISEMENT

हातांना आलेला घाम कमी करण्यसाठी बेकिंग सोडा हा चांगला पर्याय आहे. बऱ्याच घरांमध्ये बेकिंग सोड्याचा एक वेगळा डबा अथवा बाटली ठेवलेली असते. बेकिंग सोड्याचा वापर घरगुती उपायांमध्ये तुम्ही करू शकता. दातांची चमक वाढविण्यासाठी अथवा केसांना मजबूत करण्यासाठी वापरला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? बेकिंग सोड्याचा उपयोग हा नैसर्गिक डिओड्रंट म्हणूनही करता येतो. बेकिंग सोडा हा क्षारीय असतो आणि त्यामुळे घाम कमी करण्याचे काम करतो. तसंच घाम लवकर कमी करण्याचे कामही बेकिंग सोडा करतो. एक दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. पेस्ट आपल्या हातावर किमान पाच मिनिट्स रगडून लावा आणि मग हात धुवा. यामुळे तुमच्या हाताचा घाम कमी होण्यास मदत मिळते

अॅप्पल साईड व्हिनेगर

अॅप्पल साईड व्हिनेगर

Freepik

तुम्हाला जर हायपरहायड्रोसिस असेल तर तुम्ही कार्बोनिक अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर करा. तुमच्या शरीराचा पीएच स्तर संतुलित करून तुमच्या हातावरील घाम सुकविण्याचे काम यामुळे सोपे होते. तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगर तुमच्या हातावर लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. तुमच्या दैनंदिन आहारात 2 मोठे चमचे अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. मध आणि पाण्यासह अथवा फळांच्या रसासह याचा स्वाद अधिक चांगला लागतो. तुम्ही सलाडसह याचा उपयोग करून घेऊ शकता. हे शरीरातील पीएच संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरते आणि त्यामुळे हाताला घामही कमी येतो. 

ADVERTISEMENT

सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग ‘हा’ आजार घेईल तुमचा जीव

कच्च्या बटाट्याचा वापर

कच्च्या बटाट्याचा वापर

Shutterstock

तुमच्या हातांना जास्त घाम येत असेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याचा नक्की वापर करा. हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही बटाट्याचे स्लाईस करून तळहातावर रगडा आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही हा प्रयोग रोज आपल्या हातावर करा. काही दिवसातच तुम्हाला हातावर येणाऱ्या घामाची समस्या कमी झाल्याचे अथवा या समस्येतून सुटका मिळाल्याचे दिसून येईल.

ADVERTISEMENT

तुम्हालाही खूप येतो घाम… मग नक्की करुन पाहा हे घरगुती उपाय

टाल्कम पावडरचा वापर

टाल्कम पावडरचा वापर

Shutterstock

हातांना जास्त घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही टाल्कम पावडरचा उपयोग करू शकता. हे तुमच्या हातातील घाम शोषून घेण्यासाठी फायदेशीर ठरते आणि अतिरिक्त घामापासूनही सुटका मिळवून देते. यासाठी तुम्ही हातावर टाल्कम पावडर पसरा आणि काही काळ तसंच राहू द्या. पण लक्षात ठेवा काहीही खाण्यापूर्वी तुम्ही हात व्यवस्थित साबणाने स्वच्छ धुवा. कारण पावडरमध्ये अनेक केमिकल्स मिक्स असतात. यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे याची काळजी नक्की घ्या. 

ADVERTISEMENT

काखेतून येतोय घामाचा दुर्गंध, करा सोपे घरगुती उपाय (How To Get Rid Of Underarms Smell)

अल्कोहोलचा वापर

अल्कोहोलचा वापर

Shutterstock

हातामध्ये अधिक घाम येत असेल आणि तो कमी करायचा असेल तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून अल्कोहोलचा वापरही करू शकता. यासाठी तुम्ही एक कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवा आणि तो हातावर व्यवस्थित रगडा. काही तास तसंच राहू द्या. हातावरील सर्व घाम यामुळे सुकतो. पण याचा जास्त वापर करू नका. कारण हात अधिक कोरडे होऊ शकता. त्यामुळे दिवसातून एकदा काही दिवस याचा उपयोग करू शकता. 

ADVERTISEMENT

हे सर्व घरगुती उपाय तुम्ही हातावरील घाम कमी करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. तसंच तुम्हाला या उपयांनी कोणताही फरक पडत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही गोष्टीची अलर्जी असल्यास याचा वापर करू नये. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT