प्रेगन्सी आणि डिलिव्हरीनंतर प्रत्येक स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. वजन वाढतं, स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात, पोटाचा घेर वाढतो यासोबतच तुमचे केस भरपूर प्रमाणात गळू लागतात. नवमातांचे प्रसूतीनंतर असे केस गळू लागल्यामुळे त्यांना कधी कधी नैराश्यदेखील येऊ शकते. बाळाच्या जन्मानंतर काही महिने तुम्हाला केस गळण्याची समस्या जाणवू शकते. मात्र या समस्येला कसं हाताळावं हे समजलं तर तुम्ही या परिस्थितीतदेखील उत्साही आणि आनंदी राहू शकता. खरंतर प्रसूतीनंतर काही महिने केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे त्यामुळे याबाबत फार विचार मुळीच करू नका. थोडीशी हेअर केअर घेऊन तुम्ही या समस्येला दूर करू शकता. प्रेगन्सीमध्ये तुमच्या शरीरातील Oestrogen हा हॉर्मोन्सची पातळी वाढल्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमचे केस दाट आणि मजबूत होतात. मात्र डिलिव्हरीनंर यात अचानक उलटा परिणाम दिसून येतो. डिलिव्हरीनंतर Oestrogen ची पातळी कमी होते. हॉर्मोन्सच्या पातळीत अचानक झालेल्या या बदलामुळे तुमचे केस गळू लागतात. मात्र हा बदल कायमस्वरूपी मुळीच नसतो. सहा ते आठ महिन्यांनी तुम्ही पुन्हा पूर्ववत होऊ लागता. मात्र हे माहीत नसल्यामुळे अनेक महिला निराश होतात किंवा डिप्रेशनच्या आहारी जातात. ज्यामुळे त्यांच्या केसांच्या वाढीवर कायमस्वरूपी परिणाम दिसू लागतो. डिलिव्हरीनंतर सहा ते आठ महिन्यानंतर जर तुमचे केस गळत असतील तर त्यासाठी तुमची ही नकारात्मक विचारसरणी आणि मानसिक अवस्था कारणीभूत असू शकते.
Shutterstock
केस गळणे थांबवण्यासाठी जीवनशैलीत करा बदल (Lifestyle Changes To Stop Hairfall)
जीवनशैलीत विशेष बदल करून आणि नैसर्गिक उपाययोजना करून तुम्ही तुमचे केस गळणे थांबवू शकता.
- प्रसूतीनंतर आहाराबाबत विषेश काळजी घ्या. संतुलित आणि पोषक आहार घेणं या काळात फार महत्त्वाचं आहे. आहारात लोह, झिंक आणि व्हिटॅमिन्स असतील याची काळजी घ्या. कारण यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने पूर्ववत होण्यास मदत होईल.
- केस धुताना आणि विंचरताना नीट काळजी घ्या. केसांचा व्हॉल्यूम चांगला दिसेल असा शॅंपू आणि कंडिश्नर वापरा. शिवाय केस विंचरताना मोठे दात असलेला कंगवा वापरा. ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळणार नाहीत.
- डिलिव्हरीनंतर काही महिने केसांवर ड्रायर, स्ट्रेटनर, कर्लर अशी उपकरणं वापरू नका. ज्यामुळे कदाचित तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळू शकतात.
- केस घट्ट बांधून ठेवावे लागतील अशी कोणतीच हेअरस्टाईल करू नका. कारण अशा हेअरस्टाईल करताना केस ओढले जाऊन तुटण्याची दाट शक्यता असते.
- ताणतणावापासून शक्य असेल तितकं दूर राहा. ताणतणावाचा थेट परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
- केसांना आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा कोमट तेलाने मसाज करा.
- दिवसभर भरपूर पाणी प्या. ज्यामुळे तुमची त्वचा आणि केस हायड्रेट राहण्यास मदत होते.
- आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या. आळशी, सुकामेवा यांचा समावेश करा ज्यामुळे तुमच्या केसांना पूरेसे ओमेगा 3 फॅटी अॅसिड मिळेल.
- केसांवर उपाय योजना करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Shutterstock
केस गळणे थांबवण्यासाठी नैसर्गिक उपाय (Natural Remedies To Stop Hair Loss)
प्रसूतीनंतर केस गळणे थांबवण्यासाठी तुम्ही घरीच काही नैसर्गिक उपाय करू शकता.
- महिन्यातून किमान एकदा केसांना अंड्याचा पांढरा भाग आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून त्याने मसाज करा. ज्यामुळे तुमचे केस गळणे नक्कीच कमी होईल.
- केसांच्या मुळांवर दही अथवा दह्याचे पाणी लावा आणि दहा ते वीस मिनीटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका.
- केसांना नियमित बदामाचे अथवा आवळ्याचे तेल लावा. यामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतील आणि केस गळणे कमी होईल.
- मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी वाटून त्याचा हेअरपॅक केसांना लावा. सुकल्यावर वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत हसत खेळत करा ‘हे’ व्यायाम