ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Malmal Hot Asel Tar Gharguti Upay

प्रवासात उलटी वर घरगुती उपाय (Malmal Hot Asel Tar Gharguti Upay)

अनेक जणांना प्रवासादरम्यान उलटी होण्याचा त्रास असतो. हा त्रास अत्यंत कॉमन आहे. बऱ्याचदा कोणत्याही वाहनामध्ये बसल्यानंतर मळमळ सुरू होते आणि मग अचानक प्रवास चालू असताना उलटी होते. पण यामुळे तुम्ही वैतागून जाण्याची गरज नाही. तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्ही प्रवासात उलटी वर घरगुती उपाय (Malmal Hot Asel Tar Gharguti Upay) करू शकता. ज्यामुळे तुम्हाला या त्रासाला सामोरं जावे लागणार नाही. तुम्ही हे घरगुती उपाय करून उलटीच्या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता. तसंच प्रवासादरम्यान तुम्हाला हा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण एकदा उलटी झाली की, मग डोकेदुखी होणे आणि सतत तोंडाला कडवटपणा जाणवत राहणे हा त्रासदेखील होतो. त्यामुळे प्रवासात जर तुम्हाला उलटी टाळायची असेल तर तुम्ही हे उपाय करा आणि हमखास उलटीपासून सुटका करून घ्या.

लिंबू आणि गरम पाणी

लिंबू आणि गरम पाणी

तुम्हाला जेव्हा प्रवासाला जायचं असेल तेव्हा तुम्ही तुमच्यासह एका बाटलीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून तुमच्यासह ठेवा. जेव्हा तुम्हाला प्रवास करताना मळमळ होतेय असं वाटेल अथवा आता आपल्याला उलटी होणार आहे असं वाटेल तेव्हा तुम्ही या पाण्याचे सेवन करा. यामुळे सहजपणे उलटी थांबेल. याशिवाय जर तुम्हाला उलटी होत आहे असं वाटत असेल आणि तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही उलटी होतेय असं वाटायला लागल्यावर लिंबाचे एक अथवा दोन थेंब जिभेवर ठेवा. असं केल्याने उलटीचा त्रास  होणार नाही. लिंबामध्ये असणारे अँटिऑक्सिंडट गुण तुम्हाला होणारी मळमळ थांबवायला लाभदायक ठरतात.

तुळशीची पाने

तुळशीची पाने

ADVERTISEMENT

तुळशीची पानेदेखील प्रवासात उलटी रोखण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला घरातून निघता तेव्हा तुमच्या बॅगेत तुळशीच्या  पानांचा एक डबा घेऊन ठेवा. जेव्हा तुम्हाला मळमळ वाटू लागेल अथवा उलटीसारखे वाटू लागेल तेव्हा तुम्ही त्वरीत तुळशीचे पान चावून खा. यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांचा रसही काढून तुमच्यासह ठेऊ शकता. पण रसापेक्षा तुळशीच्या पानांचे चावून सेवन करणे जास्त  सोपे आहे. तसंच प्रवासातही तुळशीची पाने व्यवस्थित सांभाळता येतात. रस सांडण्याची शक्यताही असते. त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही प्रवासात घ्या. 

घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)

आले

आले

प्रवासातील उलटीची समस्या दूर करण्यासाठी बरेचदा आलेपाकही सोबत ठेवला जातो. नुसतं आलं खाणं ज्यांना कठीण असतं ते आलेपाकाचे सेवन नक्कीच करू शकतात. पण आल्याचा वापर केल्यास अधिक चांगले. बस, ट्रेन अथवा कोणत्याही प्रवासाला जाताना जर तुम्हाला उलटीचा त्रास होत असेल तर तुम्ही आल्याचे तुकडे चाऊन खा अथवा आल्याचा तुकडा चोखा. तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही. त्वरीत आराम मिळतो. यासाठी तुम्हाला फक्त इतकीच काळजी घ्यायची आहे की, तुम्ही आल्याचा तुकडा खाण्यापेक्षा तो चोखा. यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळेल.  

ADVERTISEMENT

आलं टिकवून ठेवायचं असेल तर वापरा सोप्या युक्ती

ओवा

ओवा

उलटीच्या त्रासापासून सुटका हवी असल्यास तुम्ही ओव्याचाही वापर करू शकता. ओवा हा उलटीपासून सुटका मिळवून देण्यासाठी उत्तम उपाय आहे. त्यासाठी तुम्ही कापूर, पुदिन्याची पाने आणि ओवा मिक्स करून काही वेळ उन्हात ठेवा आणि मग बाटलीत भरून घ्या. प्रवासादरम्यान ही बाटली आपल्या बॅगेत ठेवा आणि उलटीसारखे वाटू लागले तर याचे थोडेसे सेवन करा. यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळतो. 

टिप – या लेखामध्ये सांगण्यात आलेली माहिती ही तुमच्या वापरासाठी आहे हे नक्की. मात्र तुम्हाला कोणत्याही अलर्जी असतील अथवा तुम्हाला जर याची खातरजमा करून घ्यायची असेल तर तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी नक्की डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यांचा सल्ला घ्या. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT