ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय

झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या | Zural Sathi Gharguti Upay

घरात किती पण स्वच्छता ठेवली तरी बऱ्याचदा स्वयंपाकघरात अथवा बाथरूममध्ये आणि पुस्तकं ठेवलेल्या ठिकाणी झुरळांचा सुळसुळाट होतोच. एकदा एक झुरळ दिसलं की मनाला सतत त्रास होत राहातो. झुरळं अजून झाली तर काय करायचं? आता या झुरळाला कसं मारायचं? असे एक ना अनेक विचार मनात सतत भुणभुण करत राहतात. बऱ्याचदा तर स्वयंपाकघरातील पिठाच्या डब्यांमध्येही ही झुरळं जातात. मग हे सगळं कसं थांबवायचं? घरात झुरळं का होतात? असा प्रश्न निर्माण होतो. कितीही स्प्रे आणि इतर गोष्टींचा वापर केला तरी झुरळं परत येतातच. तसंच जर घरात झुरळ झालं तर एक प्रकारचा उग्रस आणि कुबट वास घरात साचून राहातो. बऱ्याचदा अडगळ असणाऱ्या ठिकाणी झुरळ जास्त होतात. म्हणून घरात स्वच्छतेची काळजी घ्या. त्यासाठी घरच्या घरी सोपे उपाय कसे करायचे अथवा झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत (Home Remedies For Cockroaches In Marathi) ते आपण या लेखातून पाहूया. 

झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय | Cockroach Killer Home Remedies In Marathi

झुरळ घालवण्याचे घरगुती उपाय नक्की काय आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा हे आपण जाणून घेऊया. झुरळ म्हटलं तरी किळस वाटते. त्यामुळे झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय करणे (zural sathi gharguti upay) अत्यंत आवश्यक आहे. एक झुरळ दिसलं तरी घरात नकोसं वाटतं आणि मग मनात तेच राहतं. एकदा झुरळ दिसलं की, घरात अधिकाधिक झुरळं होतील हीच भीती असते. झुरळ मारण्याचे घरगुती उपाय घेऊया जाणून. 

स्वच्छता

झुरळ आपल्या आजूबाजूची जागा अतिशय घाण करतात आणि दूषित करतात. त्यामुळे घरातील अनेक वस्तूंची हानी होते. घरातील पुस्तके, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वायर अशा अनेक गोष्टींना झुरळं हानी पोहचवताना दिसतात. त्यामुळे झुरळं होऊ नयेत यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात अडगळ न ठेवणे आणि घर अधिकाधिक स्वच्छ ठेवणे. कारण झुरळं झाल्यानंतर एक उग्र वास घरात येऊ लागतो. घरात स्वच्छता असेल तर झुरळांचा त्रास होत नाही. स्वच्छ ठिकाणी झुरळं होणं शक्य नाही. बऱ्याचदा घराच्या एका कोपऱ्यात कुठेतरी अडगळ निर्माण होते. पण याकडे  नीट लक्ष द्या. अशी कोणतीही अडगळ घरात निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आणि वेळोवेळी घर स्वच्छ ठेवा. स्वच्छतेकडे झुरळं फारशी फिरकत नाहीत. तसंच बाथरूमच्या जाळ्या नीट लागल्या आहेत की नाही हेदेखील वेळोवेळी तपासून घ्या. कारण या जाळ्यांमधून झुरळं घरात येण्याची शक्यता असते.

तेजपत्ता

तेजपत्ता

तेजपत्ता अर्थात तमालपत्र हा गरम मसाल्यातील एक महत्त्वपूर्ण मसाला आहे. याच्या पानांचा उपयोग सुगंधासाठी करण्यात येतो. तमालपत्रामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीइन्फ्लेमेटरी असे अनेक गुण आहेत. तसंच यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि लोहाचे प्रमाणही अधिक असते. पण झुरळ मारण्याचे घरगुती उपाय शोधत असाल तर त्यामध्ये तुम्हाला याचा वापर करून घ्यायलाच हवा. 

ADVERTISEMENT
  • झुरळ मारण्यासाठी सर्वात आधी तमालपत्र तुम्ही कुटून त्याचा चुरा बनवा आणि हा चुरा तुम्ही स्वयंपाकघर आणि घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये टाका 
  • याच्या सुगंधामुळे घराच्या कानाकोपऱ्यात लपलेली झुरळं निघून जातात
  • याशिवाय दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तमालपत्र जाळून स्वयंपाकघराच्या एका बाजूला ठेवा. याच्या वासामुळेही झुरळं निघून जातात. हा एक उत्तम केमिकलमुक्त घरगुती उपाय आहे

लवंग

लवंग

लवंग खाण्याचे फायदे आपल्याला माहीत आहेत. पण लवंग ही आरोग्यासाठीच उपयोगी ठरते असं नाही तर याचा वास हा झुरळांना त्रासदायक ठरतो. तुम्हाला जर स्वयंपाकघरात अथवा कपाटात झुरळं दिसली असतील तर तुम्ही लवंगेचा वापर करू शकता. लवंग वापरण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. 

  • ज्याठिकाणी झुरळं आहेत तिथे तुम्ही काही लवंग पसरून ठेवा
  • लवंगेच्या वासाने झुरळं गायब होतील. झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून हा अतिशय सोपा उपाय आहे

केरोसिन 

काही घरांमध्ये आजही केरोसिनचा वापर करण्यात येतो. अथवा काही घरांमध्ये लहानशा गॅलनमध्ये केरोसिन ठेवण्यात येते. तुम्ही झुरळ मारण्याचे घरगुती उपाय म्हणून केरोसिनचा वापर करून घेऊ शकता. केरोसिनचा उग्र वास झुरळांना सहन होत नाही आणि त्यामुळे झुरळं पटापट मरतात. 

  • एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि केरोसिन एकत्र मिक्स करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला झुरळ दिसेल तिथे तुम्ही पटकन त्याच्या अंगावर हा स्प्रे मारा. झुरळ काही मिनिटात मरून जाते 
  • मात्र केरोसिन असल्यामुळे स्वयंपाकघरात याचा फवारा टाळा. अन्यथा तुम्हाला याच्या वेगळ्या परिणामाला सामोरे जावे लागू शकते 

बोरिक पावडर आणि साखर 

sugar

वाढत्या झुरळांसाठी बोरीक पावडर हा चांगला पर्याय आहे. किटकांना मारून टाकण्याचे काम बोरीक पाडवर करते. कोणत्याही किटकाच्या पचनतंत्राला नुकसान पोहचविण्याचे काम बोरीक पावडर करत असल्याने बोरीक पावडरने झुरळं मरतात. झुरळ मारण्याचे घरगुती उपाय म्हणून बोरीक पावडर आणि साखरेचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. साखर पाहून झुरळ आकर्षित होतात आणि त्यात बोरीक पावडर मिक्स करून झुरळांना मारू शकतो. 

  • बोरीक पावडर आणि साखर समान मिक्स करा 
  • रात्री हे झुरळ येतात त्या जागी ठेवा. मात्र हे तुम्ही करत असताना हातात ग्लोव्ह्ज घाला अथवा हात लगेच साबणाने धुवा 
  • सकाळी तुम्हाला झुरळं मेलेली दिसून येतील
  • झुरळांचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत तुम्ही हा प्रयोग करत राहा. बोरीक पावडरऐवजी तुम्ही बेकिंग पावडर अथवा बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता 

काळी मिरी 

काळी मिरी

काळी मिरीदेखील झुरळ मारण्याचे घरगुती उपाय म्हणून तुम्ही वापरू शकता. काळ्या मिरीसह तुम्ही कांदा आणि लसणीच्या पेस्टचा वापर केल्यास याचा परिणाम लगेच दिसून येतो. काळ्या मिरीच्या पाण्याचाही उपयोग करू शकता.

ADVERTISEMENT
  • काळी मिरी, कांदे आणि लसूण एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या
  • ही पेस्ट पाण्यात मिसळा आणि ज्याठिकाणी घरात झुरळं झाली आहेत तिथे हे पसरा
  • सकाळी तुम्हाला त्याठिकाणी मेलेली झुरळं दिसून येतील. हा प्रयोग तुम्ही झुरळांचा नायनाट होईपर्यंत करा 

कडुलिंब

कडुलिंब

कडुनिंब हे सर्वात प्रभावशाली आणि गुणकारी असे झाड आहे. यामध्ये किटकांना मारण्याची आणि घरापासून दूर करण्याची क्षमता आहे. कडुलिंबाचे तेल अथवा पावडर हे झुरळ अथवा किटकांना मारण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. तसंच कडुलिंबाची पावडर आणि तेल दोन्ही स्वस्त असून खिशाला परवडण्यासारखा हा उपाय आहे. बाजारात मिळणाऱ्या अन्य औषधांपेक्षा तुम्ही झुरळ मारण्याचे घरगुती उपाय म्हणून याचा वापर करू शकता. कडुलिंबाचे शरीरालाही अनेक फायदे मिळतात.

  • तुम्ही एखाद्या स्प्रे मध्ये कडुलिंबाचे तेल भरून घ्या. त्यात पाणी भरा. 
  • हा स्प्रे तुम्ही झुरळं येत असणाऱ्या ठिकाणी रात्री झोपायच्या आधी मारून ठेवा 
  • सकाळी तुम्हाला झुरळं मेलेली सापडतील
  • तसंच तुम्ही खरकटे खाणे अथवा घाण बेसिन अथवा सिंकजवळ ठेऊ नका. हा भाग नेहमी स्वच्छ ठेवा. जेणेकरून झुरळांना येण्यासाठी कोणतंही कारण राहणार नाही
  • दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी कडुलिंबाची पावडर झुरळं असणाऱ्या ठिकाणी पेरून ठेवा. यानेदेखील झुरळं मरतात

कॉफीचा वास 

coffee

झुरळ कोणत्याही कोपऱ्यात असतील तर कॉफीच्या वासाने मात्र लगेच बाहेर येतात. झुरळ मारण्याचे घरगुती उपाय म्हणून हा एक अत्यंत जालीम उपाय आहे. 

  • एका जारमध्ये पाणी घ्या आणि त्यात कॉफी मिक्स करा 
  • झुरळ येत असणाऱ्या ठिकाणी हा जार नेऊन ठेवा
  • याचा सुगंध येतान झुरळं जारकडे आकर्षित होऊन जारमध्ये जातात आणि मग त्यांना पाण्यातून बाहेर येणं कठीण होतं आणि मरतात

साबणाचे पाणी  

soap water

झुरळाला कोणताही सुगंधी साबण चालत नाही. त्याचा झुरळाच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षणी झुरळ दिसेल. त्यावर साबणाचा स्प्रे लगेच उडवा. झुरळ काही क्षणातच मरेल. साबणामध्ये अल्कधर्म असल्याने झुरळ अजिबातच जिवंत राहात नाही. झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय करताना हा सोपा उपाय आहे. 

पुदीना 

papermint oil

पुदीनादेखील झुरळांकरिता अत्यंत मारक ठरतो. पुदिन्यात असणारे गुणधर्म हे किटकांना मारण्यास फायदेशीर ठरतात. पुदिन्याच्या तेलामध्ये किटकांना मारण्यासाठी लागणारे प्रभावशाली गुणधर्म आढळतात. झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर हा उत्तम उपाय आहे. 

ADVERTISEMENT
  • पुदिन्याची ताजी पाने एका पातळ पिशवीत ठेवा आणि ही पिशवी झुरळं असणाऱ्या ठिकाणी ठेवा. 2-3 दिवसांनी ही पानं बदलत राहा
  • दुसरी पद्धत म्हणजे पाण्यात पुदिन्याची काही पानं उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी झुरळ येत असलेल्या ठिकाणी शिंपडा आणि मग पाहा 

काकडी

काकडी

काकडीच्या वासामुळे झुरळं आकर्षित होतात आणि मग जवळ येऊन मरतात. तुम्ही झुरळं असणाऱ्या ठिकाणी काकडीचे तुकडे पेरून ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेलेली झुरळं सापडतील. 

पाईपमध्ये जाळ्या लावून घेणे

झुरळं ही सहसा घाणीमध्ये राहतात. त्यामुळे स्वयंपाकघरातील बेसिनचा पाईप अथवा बाथरूमचा पाईप कधीही उघडा ठेऊ नका. याठिकाणी पाईपमध्ये अशा जाळ्या लाऊन घ्या जेणेकरून झुरळं घरामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय हवा असेल तर मुळापासूनच हा उपाय करायला हवा. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा घरगुती उपाय अधिक चांगले ठरतात का?
बाजारात झुरळं मारण्यासाठी मिळणाऱ्या औषधांमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात येतो. मात्र तुम्ही घरगुती उपाय करता त्यामुळे घरात लहान मुलांना कोणताही त्रास होत नाही. तसंच तुम्हाला सतत लक्ष ठेवावं लागत नाही. त्यामुळे घरगुती उपाय अधिक वापरणे चांगले. 

2. घरात एक झुरळ झाल्यावर अधिक होण्याची शक्यता असते का?
झुरळांची प्रजनननिर्मिती फारच लवकर होते. त्यामुळे तुम्हाला एकदा जरी झुरळ दिसलं तरीही लगेच त्याचा नायनाट होईल याकडे लक्ष द्या अन्यथा घरात अनेक झुरळांचा सुळसुळाट होण्यापासून तुम्ही वाचवू शकणार नाही. 

ADVERTISEMENT

3. घरगुती उपायांनी झुरळांचा नायनाट होतो का?
हो. घरगुती उपायांनी तुम्ही घरातील झुरळांचा नायनाट नक्कीच करू शकता. तुम्ही योग्यरित्या याचा वापर करा आणि नियमितपणे वापरा. 

02 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT