ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
benefits-of-black-pepper-water-for-health

काळ्या मिरीचे पाणी देते शरीराला उत्तम फायदे, जाणून घ्या

काळी मिरी एक असा मसाला आहे, जो प्रत्येकाच्या घरी आपल्याला सापडणारच. बऱ्याचदा महिला काळ्या मिरीचा वापर पुलाव, बिर्याणी, भाजी यामध्ये त्याचा स्वाद वाढविण्यासाठी करतात. पण काळी मिरी (Black Papper) केवळ तुमच्या जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यावरही याचा चांगला प्रभाव पडत असतो. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटक हे आपल्या त्वचा आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. आपण अनेक रेसिपीमध्ये काळ्या मिरीचा वापर करतोच. पण जर याचा अधिक चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नियमित याचा समावेश करून घ्यायला हवा. तुम्ही नियमित काळ्या मिरीचे पाणी (Black Pepper Water) पिऊ शकता. हे तुमची त्वचा अधिक चांगली बनविण्यास उपयुक्त ठरते. तसंच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासदेखील याची मदत मिळते. काळ्या मिरीचे पाणी नक्की काय काय फायदे मिळवून देते ते पाहूया. 

त्वचा दिसते अधिक तरूण (Younger Skin)

glowing skin

तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने तरूण त्वचा हवी असेल तर तुम्ही काळ्या मिरीचे पाणी नियमित प्यायला हवे. काळ्या मिरीचे पाणी आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम करते. वास्तविक काळ्या मिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे फ्री – रॅडिकल्स डॅमेजच्या प्रभावाला रिव्हर्स करतात. हे फ्री – रॅडिकल्स, तुमच्या त्वचेच्या सेल्सला हानी पोहचवतात, त्यामुळे आपली त्वचा पहिल्यापेक्षा अधिक खराब दिसते. पण जर काळ्या मिरीचे पाणी तुम्ही नियमित प्यायलात तर वाढत्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्या त्वचेवर लवकर दिसत नाहीत आणि त्वचा अधिक तरूण दिसण्यास आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी मदत मिळते.

स्मरणशक्तीसाठी होतो फायदा (Brain Functioning)

काळ्या मिरीचे पाणी आपल्या त्वचेसह आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर ठरते. यामध्ये काही घटक असे आढळतात जे आपल्या मेंदूला डिजनरेट होण्यापासून वाचवतात. त्यामुळे आपला मेंदू अधिक चांगल्या रितीने कार्य करू शकतो आणि स्मरणशक्तीसाठीही याचा फायदा होतो. इतकंच नाही तर ज्या व्यक्तींना पार्किन्सन्स आणि अल्जाईमरसारख्या आजारांची आनुवंशिकता आहे त्यांच्यासाठीही काळ्या मिरीच्या पाण्याचा फायदा मिळतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर नक्की काळ्या मिरीच्या पाण्याचा फायदा करून घ्या. 

हृदयासाठी चांगले (Good for Heart)

for heart

काळ्या मिरीच्या सेवनाचा एक फायदा असाही आहे की, तुमच्या हृदयावर याचा चांगला सकारात्मक प्रभाव पडतो. विशेषतः काळ्या मिरीमधील काही पोषक तत्व आहेत जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदय अधिक चांगल्या तऱ्हेने काम करते आणि तुम्हाला अधिका काळासाठी हृदयासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यास मदत मिळते. त्यामुळे किमान आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा जरी काळ्या मिरीच्या पाण्याचे सेवन केले तरी तुम्हाला याचा फायदा मिळतो. 

ADVERTISEMENT

सूचना – तुम्ही काळ्या मिरीचे पाणी पिण्यास सुरूवात करणार असाल तर त्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा आधी सल्ला नक्की घ्या. याचे तुमच्या शरीरासाठी किती प्रमाण असायला हवे आणि ते पिण्याची पद्धत याची व्यवस्थित माहिती करूनच नंतर याचे सेवन सुरू करा. याचा योग्य प्रमाणात उपयोग करून घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT