ADVERTISEMENT
home / Care
घरी स्वतःच तयार करा तुमच्या केसांसाठी कंडिशनर (Homemade Hair Conditioner In Marathi)

घरी स्वतःच तयार करा तुमच्या केसांसाठी कंडिशनर (Homemade Hair Conditioner In Marathi)

कोरड्या आणि निस्तेज केसांना मऊ आणि चमकदार करण्यासाठी त्यांना नियमित कंडिशनर करणं फार गरजेचं आहे. मात्र बाजारात मिळणाऱ्या बहुसंख्य हेअर कंडिशनरमध्ये यासाठी काही केमिकल्स वापरण्यात येतात. कालांतरांने या केमिकल्सचा तुमच्या केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठीच यावर सोपा उपाय म्हणजे घरच्या घरी आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून हेअर कंडिशनर तयार करणे. आम्ही तुम्हाला होममेड कंडिशनचे असेच काही प्रकार सांगणार आहोत. जे तुमच्या केसांसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

नारळाचे तेल (Coconut Oil)

केसांसाठी सदा सर्वकाळ उपयुक्त अशी गोष्ट म्हणजे नारळाचे तेल. नारळाचे तेल प्रत्येकाच्या घरी असतेच. केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल फारच उपयुक्त आहे. नारळाच्या तेलामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. शिवाय ते एक उत्तम कंडिशनरही आहे. कारण त्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने मऊ, चमकदार होतात. नारळाचे तेल तुमच्या केसांच्या मुळाशी जातं आणि त्यांना पोषण देतं. यासाठीच फार पूर्वीपासून केसांना नारळाचे तेल लावण्याची पद्धत आहे. जे नियमित केसांना नारळाचे तेल लावतात त्यांना  केसांच्या समस्या खूप कमी जाणवतात. 

साहित्य –

  • नारळाचे तेल
  • गरम पाणी
  • टॉवेल

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • नारळाचे तेल एका वाटीत घ्या आणि थोडे कोमट करा
  • कोमट नारळाच्या तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा
  • तेल मुळांना लावण्यासाठी कापूस अथवा कॉटन पॅडचा वापर करा
  • केसांची मुळे आणि स्काल्पवर हे तेल लावल्यावर बोटांनी हळूवार मसाज करा. 
  • गरम पाण्यात एक टॉवेल बूडवा आणि तो घट्ट पिळून तुमच्या केसांवर गुंडाळून ठेवा
  • पंचेचाळीस मिनीटे केसांवर गरम पाण्याच्या टॉवेल तसाच ठेवा
  • ज्यामुळे नारळाचे तेल तुमच्या केसांच्या मुळांमध्ये खोलवर मुरेल
  • त्यानंतर केस कोमट पाण्याने आणि सौम्य अँटी हेअर फॉल शॅम्पूने धुवा.
  • चांगला परिणाम मिळण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा

नारळाचे तेल (Coconut Oil)

Shutterstock

शीया बटर (Shea Butter)

शीया बटर या शीयाच्या झाडापासून मिळणाऱ्या बीया असतात. ज्यांच्यामध्ये मुबलक प्रमाणात फॅटी अॅसिड आणि तेल असते. शिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन सी, अॅंटि ऑक्सिडंट, अॅंटि इनफ्लैमटरी घटकही असतात. शीया बटरमुळे त्वचेला थंडावा आणि ओलावा मिळतो. ज्यामुळे त्वचा मऊ होते. स्काल्पवर शीया बटर लावण्यामुळे स्काल्प निरोगी राहतो आणि  केसांच्या समस्या आपोआप कमी होतात. यासाठी शीया बटर हे एक नैसर्गिक हेअर कंडिशनर म्हणून वापरणे फायद्याचे ठरते. 

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक चमचा शीया बटर
  • दोन चमचे नारळाचे तेल
  • एक चमचा ऑर्गन ऑईल
  • दोन थेंब तुमच्या आवडीचे इसेंशिअल ऑईल (जोजोबा, रोझशिप वगैरे)

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • शीया बटर आणि नारळाचे तेल कोमट करा
  • त्यात आर्गन ऑईल मिसळा आणि मिश्रण एकजीव करा
  • तुमच्या आवडीच्या इसेंशिअल ऑईलचे काही थेंब त्यात टाका
  • मिश्रण केसांच्या मुळांना आणि संपूर्ण स्काल्पवर कापूस अथवा कॉटन पॅडने लावून घ्या
  • तीन मिनीटे हेह मिश्रण केसांवर तसेच राहू द्या
  • साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा आणि केस धुण्यासाठी सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करा

शीया बटर (Shea Butter)

Instagram

ADVERTISEMENT

नारळाचे दूध (Coconut Milk)

नारळाच्या तेलाप्रमाणेच नारळाचे दूधदेखील तुमच्या केसांसाठी एखाद्या कंडिशनरपेक्षा नक्कीच कमी नाही. नारळातील खोबऱ्यापासून हे दूध काढण्यात येते. ज्यामुळे नारळातील पोषक घटक या दूधामध्ये येतात. नारळाचे दूध स्वयंपाकासाठी, त्वचेचं पोषण करण्यासाठी आणि केसांची निगा राखण्याची वापरले जाते. कारण यामध्ये आहे व्हिटॅमिन बी, सी आणि ई मुबलक असते.ज्यामुळे शरीर निरोगी राहते, त्वचा मऊ होते आणि तुमचे चमकदार होतात.


साहित्य –

  • दीड चमचा नारळाचे दूध
  • एक चमचा तुम्ही वापरत असतेला शॅम्पू

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • नारळाचे दूध आणि हेअर शॅम्पू एकत्र करा
  • तुमच्या केसांना स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर करण्यासाठी या मिश्रणाचा वापर करा
  • केस धुतल्यावर केसांमधील पाणी पूर्ण काढून टाका आणि नारळाचे दूध आणि कोरड्या केसांसाठी शॅम्पूचे मिश्रण लावा.
  • त्यानंतर केस कंडिशनरप्रमाणे फक्त थंड पाण्याने धुवून टाका

नारळाचे दूध (Coconut Milk)

ADVERTISEMENT

Instagram

योगर्ट (Yogurt)

घट्ट दही अथवा योगर्टमध्ये केसांना पोषण देणारे अनेक नैसर्गिक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होणे टाळता येऊ शकते. यासाठी केसांना नियमित दही लावणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. योगर्टमध्ये व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमच्या केसांवर याचा चांगला परिणाम होतो. त्वचा आणि केसांसाठी योगर्ट खूपच फायदेशीर असते. नियमित योगर्ट खाण्यासोबत त्याचा असा केसांसाठीदेखील वापर करा ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील.

साहित्य – 

  • एक अंडे
  • दोन चमचे योगर्ट
  • एक चमचा ऑलिव्ह ऑईल

हेअर कंडिशनर तयार करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • एका ब्लेंडरच्या मदतीने योगर्ट, ऑलिव्ह ऑईल आणि अंडे एकत्र करा
  • मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना आणि निस्तेज केसांवर ब्रशच्या मदतीने लावा
  • केस एखाद्या शॉवर कॅप अथवा बॅगने कव्हर करा
  • अर्ध्या तासाने केस धुवून टाका
  • केसांना येणाऱ्या अंड्याचा वास काढण्यासाठी केस शॅम्पू करणे विसरू नका

योगर्ट (Yogurt)

Shutterstock

मध (Honey)

मधामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. कारण मध हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. त्वचेप्रमाणेच याचा वापर तुम्ही तुमच्या केसांवर एखाद्या हेअर कंडिशनरप्रमाणे करू शकता. ज्यामुळे तुमचे केस हायड्रेट आणि चमकदार दिसतील. मधाचा वापर अनेक हेअर प्रॉडक्टमध्ये केला जातो. मात्र घरच्या घरी केसांना कंडिशनर करण्यासाठी तुम्ही मध नक्कीच वापरू शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य – 

  • दोन चमचे मध
  • चार चमचे ऑलिव्ह ऑईल

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • एका भांड्यामध्ये मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करा
  • केसांचे चार सेक्शनमध्ये विभाजन करा आणि केसांना टप्प्याटप्याने हे मिश्रण ब्रशने लावा
  • हा हेअर मास्क अथवा कंडिशनर केसांवर अर्धा तास ठेवा 
  • केस थंड पाण्याने धुवा आणि शॅम्पू करा

मध (Honey)

Shutterstock

ADVERTISEMENT

अंडे (Egg)

अंड्याचा गर हा केसांसाठी अतिशय उपयुक्त असतो कारण त्यामध्ये केसांना हायड्रेट करणारे आणि पोषण देणारे घटक असतात. अंडे नियमित केसांना लावण्यामुळे तुमचे केस मऊ, मुलायम, चमकदार तर होतातच शिवाय केसांची वाढही चांगली होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि केसांच्या वाढीसाठी केसांना प्रोटिन्सची खूप गरज असते. केसांना कंडिशनर करण्यासाठी अंडे वापरण्यामुळे केसांना प्रोटिन्स मिळतात ज्यामुळे केस मजबूत होतात. 

साहित्य –

  • दोन अंडी
  • दोन चमचे ऑलिव्ह ऑईल
  • पाणी

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • एका भांड्यामध्ये अंड्याचा गर आणि ऑलिव्ह ऑईल घ्या
  • दोन्ही घटक व्यवस्थित एकत्र करून एक पेस्ट तयार करा
  • मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात काही थेंब पाणी मिसळा
  • केसांच्या मुळांपासून मध्यापर्यंत हे मिश्रण केसांना लावा आणि सर्वात शेवटी केसांच्या टोकांना लावा.
  • शॉवर कॅप लावून कमीत कमी अर्धा तास हे कंडिशनर केसांवर ठेवा
  • केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा आणि शॅम्पू करा

अंडे (Egg)

ADVERTISEMENT

Shutterstock

कोरफड (Aloe Vera)

कोरफडमुळे केस गळणे खूप प्रमाणात कमी होऊ शकते. कारण यामध्ये  केसांना पोषण देणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. कोरफडामुळे केसांचा कोंडाही कमी करता येऊ शकतो. यासाठी केसांना नियमित कोरफडाने कंडिशनर करणे फायद्याचे ठरेल. कोरफडीचा वापर अनेक त्वचाविकारांवर केला जातो. केस निस्तेज दिसण्यामागे स्काल्पवरील त्वचा विकारही कारणीभूत असू शकतात. यासाठी स्काल्प मजबूत करण्यासाठी कोरफडाचा वापर नैसर्गिक कंडिशनर प्रमाणे अवश्य करा. 

साहित्य –

ADVERTISEMENT
  • कोरफड
  • नारळाचे तेल

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • कोरफडाचा गर काढून घ्या
  • एका ब्लेंडरमध्ये कोरफड आणि नारळाचे तेल एकजीव करा
  • केसांना हेअर ब्रशने हे मिश्रण लावा 
  • अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवून टाका
  • तुम्ही एक ते दोन तास हे मिश्रण तुमच्या केसांवर ठेवू शकता

कोरफड (Aloe Vera)

Shutterstock

केळं (Banana)

धुळ, माती, प्रदूषणामुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. मात्र यावर उपाय करण्यासाठी तुम्ही केळ्याचा वापर करू शकता. कारण केळं हे आपल्या आरोग्यासाठी जितकं पोषक आहे तितकंच ते तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. केळ्यामधील पोषक घटकांमुळे केस गळणे कमी होते आणि केस चमकदार दिसू लागतात. यासाठी केस कंडिशनर केळ्यापासून तयार करा हे होममेड कंडिशनर

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक पिकलेले केळं
  • दोन चमचे ऑलिव्ह ऑईल
  • एक चमचा मध

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • एका भांड्यात केळं कुस्करून घ्या
  • केळ, मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून एक छान मिश्रण तयार करा
  • हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना आणि केसांच्या टोकापर्यंत सर्व ठिकाणी एकसमान लावा
  • अर्ध्या तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाका

केळं (Banana)

Shutterstock

ADVERTISEMENT

अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

केसांवर घरगुती उपचार करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर हमखास केला जातो. कारण व्हिनेगर हे केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये केसांना ओलसर ठेवणारे आणि सरंक्षण देणारे घटक असतात. ज्यामुळे तुमचे निस्तेज केस चमकदार आणि सुंदर दिसू लागतील. यासाठी घरच्या घरी तयार करा यापासून केसांसाठी उत्तम कंडिशनर

साहित्य –

  • दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर
  • एक कप पाणी

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • एक भांडे घ्या त्यात पाणी आणि अॅपल सायडर व्हिनेगर एकत्र करा
  • केसांना शॅम्पू केल्यावर केस कंडिशनर करण्यासाठी तुम्ही हे मिश्रण वापरू शकता
  • केसांवर हे मिश्रण लावा आणि केसांना हळूवार मसाज करा.
  • तुम्ही हे मिश्रण लावल्यावर केस नाही धुतले तरी चालेल पण जर तुम्हाला हवं असेल तर थंड पाण्याने तुम्ही केस पु्न्हा धुवू शकता

अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

Shutterstock

मेयॉनिज (Mayonnaise)

मेयॉनिजचा वापर आपण स्वयंपाकात करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का मेयॉनिज केसांसाठी वापरण्यात येणारं एक लोकप्रिय असा नैसर्गिक उपाय आहे. मेयॉनिज केसांसाठी चांगलं आहे  कारण त्यामध्ये नैसर्गिक तेल, अंडे, चीज अशा गोष्टींचा वापर केलेला असतो. ज्यातून तुमच्या केसांना प्रोटिन्स मिळू शकतात. केसांना चांगली वाढ आणि निरोगी राहण्यासाठी प्रोटिन्सची गरज असते. यासाठी केसांना मेयॉनिज लावणं तुमच्या फायद्याचं ठरेल. 

साहित्य – 

ADVERTISEMENT
  • दोन अंडी
  • दहा चमचे मेयॉनिज
  • एक चमचा ऑलिव्ह ऑईल

हेअर कंडिशनर करण्याची पद्धत –

  • सर्व मिश्रण एकजीव करा आणि एक चांगली पेस्ट तयार करा
  • हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा
  • वीस मिनीटांनी केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा
  • चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून एकदा हा प्रयोग अवश्य करा

 

सुंदर केसांसोबत त्चचेची निगा राखण्यासाठी वापरा हे फेस शीट मास्क, ज्यामुळे त्वचा दिसेल अधिक सुंदर

ADVERTISEMENT

होममेड कंडिशनरविषयी प्रश्न – FAQs

1. केसांना होममेड कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत कोणती ?

केसांना कंडिनशर नेहमी मुळाकडून टोकाकडे लावावे. जर तुम्ही नैसर्गिक कंडिशन लावत असाल तर तुम्ही स्काल्पवर मसाज करू शकता. ज्यामुळे कंडिशनरमधील घटक तुमच्या केसांच्या फॉलिकल्समध्ये खोलवर मुरतील.

2. केसांवर कंडिशनर किती वेळ ठेवावे ?

कंडिशनरमध्ये लिव्ह इन आणि वॉश ऑफ असे दोन प्रकार असतात. वॉश ऑफ कंडिशनर तुम्हाला केस शॅम्पू केल्यावर लावावे लागते तर लिव्ह इन तुम्ही केस धुतल्यानंतर लावता. वॉश ऑफ कंडिशनर नंतर पाच मिनीटांनी केस धुवावे तर लिव्ह इन केसांवर पुन्हा केस धुवूपर्यंत ठेवता येते. 

ADVERTISEMENT

3. हेअर कंडिशनरमुळे केसांना फाटे फुटणे कमी होते का ?

केसांना फाटे फुटतात कारण हेअर क्युटिकल्स तुटतात आणि उघडे पडतात. मात्र कंडिशनरमुळे केसांचे क्युटिकल्सचे संरक्षण होते आणि ते मजबूत होतात. 

13 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT