ADVERTISEMENT
home / Care
केसांसाठी बेस्ट आहेत हे प्रोटिन रिच हेअर मास्क , घरीच करा ट्रिटमेंट

केसांसाठी बेस्ट आहेत हे प्रोटिन रिच हेअर मास्क , घरीच करा ट्रिटमेंट

आजकाल अनेकींना केस गळण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. केस  गळण्याची कारणं अनेक असू शकतात. मात्र केसांना अपुरे पोषण मिळणे हे त्यामागील प्रमुख कारण असतं. यासाठीच केसांना योग्य प्रमाणात प्रोटिनचे पोषण मिळायला हवं. केसांमध्ये प्रोटिनचे प्रमाण कमी झालं की केस कमजोर होतात आणि गळतात. बऱ्याचदा आहारातून पुरेसं प्रोटिन शरीराला मिळालं नाही की त्यामुळेही केस गळू लागतात. अपुऱ्या पोषणामुळे निस्तेज आणि कोरड्या झालेल्या केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळण्याची गरज असते. मात्र यासाठी पार्लरमध्ये करण्यात येणाऱ्या प्रोटिन ट्रिटमेंट खूपच महागड्या असतात. सर्व सामान्यांना त्या परवडतीलच असं नाही. यासाठी आम्ही तुमच्यासोबत असे काही हेअर मास्क शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांना योग्य प्रमाणात प्रोटिन मिळेल आणि तुमचे केस पुन्हा मजबूत आणि चमकदार होतील. 

केसांसाठी का गरजेचं आहे प्रोटिन

केसांच्या योग्य वाढीसाठी प्रोटिनची गरज असते. प्रोटिनयुक्त घटकांमध्ये अॅमिनो अॅसिड असतात. जर शरीरात अॅमिनो अॅसिड कमी असेल तर केसांमधील फायबर्स कमी होतात. केसांमध्ये फायबर्स कमी झाल्यामुळे ते पातळ होतात आणि तुटू लागतात. समस्या वाढल्यास टक्कल पडण्याची शक्यता वाढते. यासाठीच आहारातून पुरेसं प्रोटिन शरीराला मिळायला हवं. आहारातून प्रोटिन घेण्यासोबतच केसांना प्रोटिनयुक्त हेअर मास्क लावल्याचाही चांगला परिणाम होऊ शकतो. 

अंडी आणि दह्याचा हेअर मास्क

दह्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटिन्स असतात. ज्याचा परिणाम तुमच्या  केसांवर होतो. दह्यातील लॅक्टिक अॅसिडमुळे केसांची मुळे मजबूत होतात. दह्याचा मास्क आठवड्यातून एक ते दोन वेळ लावल्यास केस गळणे कमी होते आणि केस मजबूत होतात. दह्यामुळे तुमचे केस मऊ देखील होतात. केसांना नैसर्गिक चमक आल्यामुळे तुमचे केस सुंदर दिसू लागतात. अंड्यामध्येही भरपूर प्रोटिन्स असल्यामुळे या मास्कमध्ये अंड्याचाही वापर करता येतो. 

हेअर मास्क करण्याची पद्धत

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन अंडी
  • एक कप दही

हेअर मास्क बनवण्यासाठी –

अंड्याचा पांढरा बलक आणि दही एकत्र करून हेअर मास्क तयार करा

हा मास्क हेअर ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळांना स्काल्पवर लावा

ADVERTISEMENT

तीस मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका

अंड्याचा हेअर मास्क

केसांसाठी अंडी खूप फायदेशीर ठरतात. अंड्याच्या पिवळ्या भागात सर्वात जास्त प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मॉईस्चराईझ होतात. शिवाय अंड्यातील पांढऱ्या बलकामुळे केसांची त्वचा मजबूत होते. 

हेअर मास्क करण्याची पद्धत

साहित्य –

ADVERTISEMENT
  • दोन अंडी

हेअर मास्क बनवण्यासाठी –

दोन्ही अंडी फोडून चांगली फेटून घ्या

फेसयुक्त मास्क तयार करून तो केसांच्या मुळांना लावा

तीस मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा

ADVERTISEMENT

केसांना येणारा अंड्याचा वास घालवण्यासाठी पाण्यात लिंबू पिळा

मॅयॉनिज हेअर मास्क

मॅयॉनिजमध्ये अंडे आणि क्रीम दोन्ही असते. ज्यामुळे केसांना योग्य प्रमाणात प्रोटिन मिळू शकते. मात्र यासाठी प्लेन मॅयॉनिज घ्या. फ्लेवर असलेलं मॅयॉनिज वापरू नका. मॅयॉनिजमधील व्हिटॅमिन्समुळे केस मजबूत होतात.

हेअर मास्क करण्याची पद्धत –

साहित्य –

ADVERTISEMENT
  • दोन चमचे मॅयॉनिज 

हेअर मास्क बनवण्यासाठी –

दोन चमचे मॅयॉनिज वाटीत घ्या

ते फेटून केसांच्या मुळांना लावा

तीस मिनिटांनी केस कंडिशनर लावल्याप्रमाणे धुवून टाका. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा –

त्वचेवर येईल ग्लो, वापरा लाल भोपळ्याचा होममेड फेसपॅक

DIY: घरच्या घरी बनवा हे फूट मास्क, पाय होतील मऊ

ADVERTISEMENT

सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT