बऱ्याचदा कुरळ्या केसांच्या गुंत्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. तसंच केसांची काळजी घ्यायला खूप वेळही लागतो. त्यामुळे कुरळ्या केसांची काळजी घेताना होणारा त्रास बऱ्याचदा नकोसा वाटतो. पण पार्लरमध्ये जाऊन सतत केस सरळ करून घेणंही खिशाला परडवण्यासारखे नसते. शिवाय सतत स्ट्रेटनिंग अथवा आयरनचा वापर करणंही केसांसाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला घरगुती पद्धतीने घरच्या घरीही केस सरळ करता येतात. त्याशिवाय तुमचे पैसेही वाचतात. तुमच्या केसांचे उत्तम पोषण होण्यासाठी आणि कोणताही दुष्परिणाम होऊ नये यासाठी तुम्ही घरच्या घरी वेगवेगळे उपाय करून केस सरळ करू शकता. यामुळे कदाचित पटकन बदल होणार नाही पण केसांना अधिक पोषण मिळेल आणि केस अधिक सरळ आणि मऊ, मुलायम होतील हे नक्की आणि तुम्हाला त्रासही होणार नाही. याच्या नक्की कोणत्या पद्धती आहेत आणि कोणत्या गोष्टींचा वापर करता येतो ते या लेखातून पाहू.
केळं आणि पपईचा मास्क (Banana – Papaya mask for hair straigtening)
Shutterstock
- केळं मॅश करून घ्या आणि पपईमध्ये मिक्स करा
- त्यामध्ये एक चमचा मध घाला आणि हे तयार झालेले मिश्रण तुम्ही केसांना लावा
- हे मिश्रण केसांवर काही वेळ तसंच राहू द्या आणि सुकल्यानंतर केस धुवा आणि खालच्या बाजूने केस ब्लो ड्राय करा
शहाळ्याची मलई आणि लिंबाचा मास्क (Coconut and Lemon for hair straightening)
Shutterstock
- शहाळ्याची मलई काढून घ्या आणि त्यात थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा आणि फेटून घ्या
- त्यानंतर हे मिश्रण तुम्ही केसांना लावा आणि सुकू द्या
- सुकल्यानंतर केस माईल्ड शँपूने धुवा, नंतर तुम्हाला केस पहिल्यापेक्षा अधिक सरळ दिसून येतील
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
गरम तेलाने करा केस स्ट्रेट (Hot Oil for Hair Straightening)
Shutterstock
याचा वापर करण्यासाठी तुम्ही एरंडाच्या तेलाचा (Castor Oil) आणि नारळ तेलाचा वापर करा. यासाठी तुम्ही पुढीलप्रमाणे स्टेप्स करा
- दोन्ही तेल एकत्र करून साधारण कोमट करा
- हे कोमट तेल तुम्ही केसांना लावा आणि साधारण 15 मिनिट्स केसांना चांगले मालिश करा
- अर्ध्या तासाने थंड पाण्याने केस धुवा
- आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करू शकता. यामुळे केसांना उत्तम पोषणही मिळते आणि केसही सरळ होतात
लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)
दूध आणि मधाचा मास्क (Milk and Honey for Hair Straightening)
Shutterstock
- अर्धा कप दूध आणि 2 चमचा मध मिक्स करून घ्या
- हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण दोन तास तसंच राहू द्या
- त्यानंतर केस थंड पाण्याने आणि माईल्ड शँपूने धुवा
- आठवड्यातून एकदा तुम्ही हे वापरल्याने केस सरळ होतील आणि मऊ, मुलायम राहतील
केसांना अधिक घनदाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी वापरा मुलतानी माती
कोरफड वापरून करा केस सरळ (Aloe Vera for Hair Straightening)
Shutterstock
- यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करा
- सर्वात पहिले दोन्ही तेल मिक्स करून घ्या आणि हलकेसे गरम करा
- त्यानंतर त्यामध्ये कोरफड जेल मिक्स करा
- हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण पाऊण तास हे तसंच ठेवा
- त्यानंतर केस धुवा आणि हे तुम्ही आठवड्यातून एक दिवस करायला हवे
केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
केळं, दही आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण (Banana, Curd and Olive Oil for Hair Straightening)
Shutterstock
- सर्वात पहिले दोन केळी घेऊन मॅश करा आणि त्यामध्ये अजिबात गुठळी राहू देऊ नका
- यामध्ये दोन चमचे मध, दोन चमचे ऑलिव्ह ऑईल आणि दोन चमचे दही मिक्स करून बॅटर बनवा
- हे मिश्रण केसांना लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या
- त्यानंतर केस धुवा आणि साधारण आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग करा. यामुळे केसांना योग्य पोषण मिळते आणि केस स्ट्रेट होतात
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक