मेष – अशक्तपणा आणि थकवा जाणवेल
आज तुम्हाला शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. अचानक धनलाभ झाल्याने मन आनंदी राहील. राजकारणात व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी वादविवाद करू नका. प्रवासाला जाणे सध्या तरी टाळा.
कुंभ – जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता
आज तुमचा जोडीदारासोबत तणाव वाढू शकतो. व्यवहार करताना सावध राहा. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रखडलेले पैसे परत मिळतील. भागीदारीच्या कामापासून दुर राहा. कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे.
मीन- कौटुंबिक संपत्ती मिळेल
आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या नवीन योजना सफळ होतील. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. दिवस चांगला असेल.
वृषभ – प्रपोज करायला उशीर करू नका
आज जोडीदाराकडून तुम्हाला सरप्राईझ भेटवस्तू मिळेल. एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार पुढे ढकलू नका. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकारी साथ देतील.
मिथुन – नवीन कामाला सुरूवात करणे टाळा
आज तुम्हाला नवीन काम सुरू करणे टाळावे लागेल. विद्यार्थ्यांनार नकारात्मक विचारांचा प्रभाव पडेल. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे कठीण जाईल. जोडीदाराशी नाते सुधारणार आहे.
कर्क – उत्पन्नाचे नवे साधन मिळेल
आज तुमचा पगार वाढणार आहे. उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे. साठवलेल्या पैशांमध्ये वाढ होईल. महत्ताची कामे पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. जोडीदासोबत वेळ चांगला जाईल.
सिंह – दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगली संधी गमवाल
आज तुम्ही दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगली संधी गमावू शकता. कामाच्या ठिकाणी सावध राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष घालण्याची गरज आहे. मित्रांकडून एखादी खुशखबर मिळेल.
कन्या – डोकेदुखी जाणवेल
आज तुम्हाला डोळे अथवा डोकेदुखी जाणवणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
तूळ – नवीन प्रेम प्रस्ताव मिळेल
नवीन प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. भावंडाची साथ मिळेल. व्यवसायाला सुरूवात कराल. लहान मोठी आजारपणांकडे दुर्लक्षपणा करू नका. वाहन चालवताना सावध राहा.
वृश्चिक – विद्यार्थ्यांना यश मिळेल
आज विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. खेळातदेखील प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जुने वाद विसरा. मनासारखे काम मिळाल्याने उत्साह वाढेल.
धनु – खर्चात वाढ होणार आहे
आज तुमच्या खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी जाणवेल. जोडीदाराची साथ आणि सहवास मिळेल. रचनात्मक कार्यात रस वाढणार आहे.
मकर – जोडीदाराचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल
आज तुमच्या जोडीदाराचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल. व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा अथवा इंटरव्यूव्हमध्ये यश मिळेल. आज मन आनंदी असेल.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव
राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती