मेष – मनातील भावना व्यक्त करण्यात यश
आज तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करणार आहात. जोडीदारासोबत आज तुमचा वेळ अगदी आनंदात जाईल. काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल.
कुंभ – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. बोलताना सावध राहावे लागेल. तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे भांडण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. क्रीडा क्षेत्रात रस वाढणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
मीन – पैशांबाबत चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांसाठी खर्च कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. धुर्त लोकांपासून सावध रहा. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.
वृषभ – कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या दुर्लक्षपणामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मेहनत करूनही यश मिळणं कठीण आहे. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्यातील रस वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन – व्यवसायात फायदा होण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होणार आहे. देणी-घेणी सांभाळून करा. आज तुम्हाला कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याचा योग मिळेल. लोकांच्या दबावाखाली न जाता स्वतःचा निर्णय घ्याल. वाहन सुख मिळणार आहे.
कर्क – कामाचा दबाव वाढण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी अचानक दबाव वाढण्याची शक्यता आहे. आजचे तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामावर केंद्रित करणार आहात. देणी-घेणी करताना सावध रहा. विरोधकांनी सावध राहण्याची गरज आहे. रचनात्मक कार्यात आज तुमचा रस वाढणार आहे.
सिंह – थकवा आणि ताण वाढण्याची शक्यता
आज तुमचा दिवसभर ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. द्विधा मनस्थितीमुळे महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येणार आहेत. घरात सुख-शांती असेल.
कन्या – कौटुंबिक साथ मिळेल
आज तुम्हाला तुमची रखडलेली कामे करण्यासाठी कौटुंबिक साथ मिळणार आहे. तुमची अशा व्यक्तीसोबत भेट होईल ज्यामुळे भविष्यात तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. व्यावसायिक कामांसाठी परदेशी जाण्याचा योग आहे.
तूळ – लक्ष्य प्राप्तीत यश मिळेल
आज तुमच्या भाग्योदयातील अडथळे दूर होणार आहेत. योजनेत यश प्राप्त होणार आहे. व्यावसायिक भागिदारीत लाभ मिळेल. राजकारणातील स्थिती मजबूत असेल. जुन्या ओळखीतून लाभ मिळेल.
वृश्चिक – पैशांच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता
आज तुम्हाला पैशांच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो. आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे स्वभावात चिडचिड होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे.
धनु – आरोग्य चांगले राहील
नियमित योगासने केल्यामुळे आरोग्य उत्तम राहील. एखाद्या गोष्टीमुळे उत्साहित राहाल. जुन्या समस्या सुटणार आहेत.उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी खुश होतील.
मकर – व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून व्यवसायात फसवणूक होणार आहे. वैयक्तिक समस्या टाळण्यामुळे त्या अधिकच वाढणार आहेत. वादविवाद करणे टाळा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विद्यार्थ्यांना संगतीबाबत सावध राहण्याची गरज आहे. मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी