ADVERTISEMENT
home / भविष्य
12 एप्रिल 2020 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना मित्रांचे सहकार्य मिळेल

12 एप्रिल 2020 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना मित्रांचे सहकार्य मिळेल

मेष – व्यवसायात चढ उतार येतील

आज तुमच्या व्यवसायात चढ उताराची स्थिती असेल. जोखिम घेणे टाळा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल. मुलांसोबत घरात वेळ घालवा. 

कुंभ –  विद्यार्थ्यांना मेहनतीची गरज आहे

आज विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. पदोन्नती हवी असेल तर आळस करू नका. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

ADVERTISEMENT

मीन-  धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करावी लागेल. गरजेपेक्षा अधिक गोष्टी खरेदी करणे टाळा. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल.

वृषभ – जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या

आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहार आणि इतर गोष्टींबाबत सावध राहा. व्यवहार सावधपणे करा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. 

ADVERTISEMENT

मिथुन – मित्रांचे सहकार्य मिळणार आहे

आज तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळणार आहे. जोडीदारासोबत एखादा रोमॅंटिक चित्रपट पाहण्यात वेळ घालवाल. महत्त्वाची कामे करण्यासाठी आळस करू नका. योगाच्या अभ्यासात लक्ष द्या. 

कर्क – परीक्षेच्या तयारी साठी योग्य काळ

स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल. अधिकाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळेल. चुकीच्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका. मुलं आणि घरातील वृद्धांची काळजी घ्या. 

ADVERTISEMENT

सिंह –  विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे

आज तुमचा विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमी मिळेल. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. 

कन्या –  आरोग्याची काळजी घ्या

जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्य चांगले राहील. मित्रांची  भेट फोनवरच होईल. कुटुंबासोबत वेळ घालवा. आर्थिक स्थिती चांगली असेल. रखडलेली कामे पूर्ण करण्याच यश मिळेल. 

ADVERTISEMENT

तूळ – गरजेच्या वेळी मित्र मदत करणार नाहीत

आज गरज असताना तुम्हाला मित्रांची मदत मिळणार नाही. वैयक्तिक कामांसाठी वेळ द्या. करियरचे निर्णय घेणं सध्या टाळा. राजकारणात लाभ मिळण्याची शक्यता. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 

वृश्चिक –  पैशांमध्ये वाढ होईल

व्यवसायातील कामे वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पैशांमध्ये वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत फोनवर संवाद साधाल. नियम मोडणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

ADVERTISEMENT

धनु – पोटाचा त्रास जाणवेल

आज तुमचे पोट दुखण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. प्रेमिकांच्या भेटीमध्ये अडचणी येतील. भावंडांशी नाते सुधारेल. अध्यात्म आणि योगाचा अभ्यास करा.  

मकर – कौटुंबिक काळ मजेत जाईल

आज तुमचा दिवस अगदी मजेत जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमचे म्हणणे ऐकणार  आहेत. महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरणात आज वेळ चांगला जाईल. व्यवहार करताना सावध राहा. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा –

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

ADVERTISEMENT

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशीच्या व्यक्तींना प्रेमात पाडणे असते फारच कठीण

09 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT