मेष – प्रियकर भेटण्याची शक्यता
आज तुम्हाला तुमचा जुना प्रियकर भेटण्याची शक्यता आहे. भावंडांच्या मदतीने बिझनेसमध्ये प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ – अभ्यासात अडचणी येतील
आज विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक नुकसान होऊ शकते. कोर्टकचेरीचा वाद टाळा. वाहन चालवताना सावध रहा. उत्पन्न आणि खर्चाचा समतोल राखा, जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
मीन – गुडघ्याचा त्रास होऊ शकतो
आज तुमच्या आईला गुडघेदुखीचा त्रास जाणवेल. तुमच्या कामासाठी शिफारस करावी लागेल. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. विरोधक त्रास देतील. राजकारणातील जबाबदारी वाढणार आहे.
वृषभ – करिअरबाबत आनंदवार्ता मिळेल
आज तुम्हाला अचानक एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुम्ही सांगितलेल्या योजनांना महत्त्व दिले जाईल. विद्यार्थ्यांना चांगल्या संधी प्राप्त होतील. आर्थिक प्रगती होणार आहे. देणी घेणी करताना सावध रहा.
मिथुन – बजेट कोलमडण्याची शक्यता
आज व्यावसायासाठी स्वतःची पुंजी वापरावी लागेल. विनाकारण खर्च करू नका कारण त्यामुळे तुमचे बजेट कोलमडणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुमचे काम आज अडकण्याची शक्यता आहे. प्रियकराशी भेट होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
कर्क – आरोग्य सुधारेल
आज तुमचे आरोग्य हळूहळू सुधारणार आहे. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. धर्त लोकांपासून सावध रहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. जोडीदाराशी संबंध चांगले असतील. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे.
सिंह – कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता
आज तुमच्या घरातील कौटुंबिक संपत्तीमुळे घरात वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीचा विरोध होऊ शकतो. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
कन्या – मधुमेहींना त्रास होण्याची शक्यता
आज मधुमेही लोकांची समस्या वाढणार आहे. आहार आणि इतर कामे करताना सावध रहा. जोखिमेची कामे करण्यापासून दूर रहा. प्रेम प्रकरणात यश मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
तूळ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता
आज तुम्हाला शेअर बाजारात आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यापारी लोकांना अनेक चांगल्या संधी मिळतील. रखडलेली कामे अगदी पटकन होऊ शकतात. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. रचनात्मक कार्यात वृद्धी होईल. आत्मविश्वास वाढणार आहे.
वृश्चिक – नात्यातील कटूपणा कमी होईल
आज तुमचा कौटुंबिक वाद मिटून नात्यात समजूतदारपणा येईल. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे. एखाद्या सामाजिक संस्थेकडून सन्मान मिळेल.
धनु – अभ्यासातील दुर्लक्ष महागात पडेल
आज विद्यार्थ्यांना अभ्यासात दुर्लक्ष केल्याचे परिणाम सहन करावे लागतील. कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढेल. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. प्रवासाला जाणे टाळा. देणी घेणी करताना सावध रहा.
मकर – उधारीने दिलेले पैसे मिळतील
आज तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. आरोग्याची काळजी घ्या. आईची तब्येत सांभाळा.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी