मेष – मानसिक असमााधान जाणवेल
आज तुम्हाला मानसिक असमाधान आणि उदास जाणवेल. कोणत्याही अडथळ्याशिवाय महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत सावधान रहा. सामाजिक कार्यक्रमात जुन्या मित्रांशी भेट होईल. पैशांबाबत एखादी आनंदवार्ता मिळेल.
कुंभ – आरोग्य चांगले राहील
आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. नियमित चेकअप करा. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करा. आज एखाद्या योजनेमध्ये चांगले बदल होतील. मित्रांच्या मदतीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
मीन- सासरच्या मंडळींकडून निराशा मिळेल
आज तुम्ही सासरच्या मंडळींमुळे नाराज व्हाल. कुटुंबात तुमच्या स्थानाला महत्त्व न दिल्यामुळे तुमचा तणाव वाढेल. भागिदारीच्या व्यवसायात फायदा कमी मिळेल. सावध रहा. अनावश्यक वाद करणे टाळा. वाहन चालवताना सावध रहा.
वृषभ – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. सुख साधनांमध्ये वाढ होईल. विरोधक त्रास देतील. परदेशी जाण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात यश आणि मान सन्मान मिळेल. देणी घेणी करताना सावध रहा.
मिथुन – जोडीदारासोबत गैरसमज होतील
आज घरातील वृद्ध लोकांच्या मताचा आदर राखा. जोडीदारासोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारी फायदेशीर ठरेल. जुन्या योजना यशस्वी होतील. राजजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.
कर्क – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न निष्फळ ठरतील
व्यवसायात वाढ होण्यासाठी केलेले प्रयत्न वाया जातील. कामाच्या ताणामुळे हैराण व्हाल. कामाच्या ठिकाणी स्पर्धेचे वातावरण असेल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. मुलांच्या भविष्याची चिंता वाढेल.
सिंह – संपत्ती वाढण्याची शक्यता आहे
आज तुमचे भाग्य तुमची चांगली साथ देणार आहे. कुटुंब आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायाला सुरूवात कराल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने चांगले बदल होतील. फार काळापासून रखडलेली योजना पूर्ण होईल.
कन्या – विद्यार्थ्यांना समस्या येतील
विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा निराशाजनक असेल. व्यवसायात मेहनतीप्रमाणे यश मिळणार नाही. नोकरी बदलण्यापूर्वी पुन्हा एकदा नीट विचार करा. तुमच्या मनाविरूद्ध प्रवास करावा लागेल. वाहन चालवताना सावध रहा.
तूळ – आळस आणि थकवा जाणवेल
आज तुम्हाला आळस आणि थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण होणार नाही. घाईत आणि भावनिक होऊन घेतलेला निर्णय बदलावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य मिळेल. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे साधन मिळेल.
वृश्चिक – प्रियकराची कामाच्या ठिकाणी मदत मिळेल
प्रियकराची कामाच्या ठिकाणी मदत मिळेल. बिघडलेली कामे पूर्ण करण्यासाठी घरच्यांची मदत मिळेल. सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देतील. घरात मंगलकार्य होण्याची शक्यता आहे. राजकारणात नवीन ओळखी वाढतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
धनु – विद्यार्थ्यांना यश मिळेल
आज विद्यार्थी मनापासून अभ्यास करणार आहेत . ज्यामुळे त्यांना यश मिळेल. व्यावसायिक योजना ठरवलेल्या वेळात पूर्ण कराल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे.
मकर- व्यवसायात नुकसान होऊ शकते
व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पैशांची मदत लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून तणाव जाणवेल. पैसे परत देताना सावधगिरी बाळगा. आज एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी