मेष : मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायातही कित्येक काम होता-होता रखडतील. यामध्ये एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादातून मुक्तता मिळेल.
कुंभ : कौटुंबिक वाद दूर होतील
कौटुंबिक वाद आज दूर होतील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला असेल. राजकीय सहकार्याचा व्यवसायात फायदा होईल. कार्यालयाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती अधिक बळकट होईल.
मीन : विद्यार्थ्यांना मिळेल यश
विद्यार्थ्यांना शिक्षणात किंवा कोणत्याही स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आखलेल्या कामांमध्ये प्रगती होईल. वाहन चालवताना खबरदारी घ्या. विरोधकांचा पराभव होईल.
वृषभ : रक्तदाब सुधारेल
रक्तदाबासारख्या आजारात सुधारणा होईल.खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. स्वाभिमान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. लोकांवर विश्वास ठेवू नका.
मिथुन : नावडत्या व्यक्तींसोबत भेट
एखाद्या अप्रिय व्यक्तीची आज भेट होऊ शकते. तुम्हाला अनावश्यक त्रास सहन करावा लागेल. नवीन लोकांसह व्यवसाय करण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा. एखादी चांगली बातमी मिळेल.
कर्क : आरोग्यात बिघाड
किरकोळ आजारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खाण्यापिण्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित समस्या सुटतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहिली.
सिंह : भेटवस्तू मिळतील
तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू भेटस्वरुपात मिळण्याची शक्यता आहे. अपत्याकडूनही सुखद बातमी मिळेल. उधार दिलेले धन पुन्हा मिळेल. व्यवसायासंदर्भात नवीन भागीदारासोबत भेट होऊ शकते.
कन्या : एखाद्याबाबत प्रेमभावना होतील निर्माण
एखाद्या व्यक्तीसाठी प्रेमभावना निर्माण होतील. जोडीदाराबरोबर चांगला वेळ व्यतीत कराल. सामाजिक कार्यामुळे प्रसिद्धी आणि भेटवस्तू मिळतील. विरोधकांचा पराभव होईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : करार रद्द होण्याची भीती
व्यवसायात अडचणी सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही करार रद्द होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. निरुपयोगी गुंतागुंत निर्माण होईल. प्रियकराबरोबरचे नाते अधिक दृढ होईल.
वृश्चिक : अचानक धनलाभाची शक्यता
व्यवसायात आज नवीन करार होऊ शकतात. अचानक धनलाभाची शक्यता आहे. सामाजिक आदर यासह धनसंपत्तीही वाढेल. प्रेमाच्या बाबतीत समलोत राखल्यास उत्तम. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
धनु : वाद होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी आळशीपणा आणि निष्काळजीपणा केल्यास वाद होण्याची भीती आहे. यामुळे आत्मविश्वास गमावला जाऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. राजकारणात केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
मकर : हातापायाच्या दुखण्यानं समस्या
हात आणि पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त राहाल. दिवसभर शारीरिक थकवा जाणवेल. भागीदारांशी संबंध दृढ होतील. सामाजिक आदर वाढेल. आखलेल्या कामांमध्ये रस वाढू शकतो.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी