मेष – आज तुम्हाला फ्रेश वाटेल
आज दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता. नवीन व्यवसायाला सुरूवात कराल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे. इतरांमुळे तुम्हाला आज तुमचा वैयक्तिक निर्णय बदलावा लागेल.
कुंभ – नोकरी मिळेल
आज तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यींनी वेळ मौजमजेत खर्च करू नये. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. जोडीदाराची साथ मिळाल्याने घरात धार्मिक कार्य कराल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन- आर्थिक स्थिती बिघडू शकते
कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या लोभापायी आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.पैशांचे नुकसान होऊ शकते. व्यवसायातील खास योजना थांबवावी लागणार आहे. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यात अपयश येण्याची शक्यता आहे.
वृषभ – घरातील वादामुळे नुकसान होण्याची शक्यता
आज महिलांना नोकरी आणि घरातील कामांमध्ये समतोल राखणे कठीण जाईल. इतरांच्या कामात दखल देऊ नका. कौटुंबिक वादामुळे आज तुमचे नुकसान होऊ शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
मिथुन – आरोग्य बिघडू शकते
आज बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वैवाहिक चर्चांना यश मिळेल. वादविवाद सावधपणे सोडवा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात मन रमवा.
कर्क – दिलेले पैसे परत मिळतील
आज तुम्ही इतरांना दिलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. भेटवस्तू आणि मानसन्मानात वाढ होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळेल. आवडीचे काम मिळाल्यामुळे मन उत्साहित राहील. व्यावसायिक वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह – जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे
आज तुमची जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. उत्साह आणि कामाचा वेग वाढल्याने कामात यश मिळेल. सामाजिक संस्थेकडून मानसन्मान मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल.
कन्या – नोकरीत यश मिळेल
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. सहकाऱ्यांपासून सावध रहा. नोकरीतील समस्या वाढू शकतात. जवळच्या लोकांसोबत आज तुमचे मतभेद होतील. मेहनत जास्त आणि लाभ कमी असेल. देणी घेणी सांभाळून करा. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका.
तूळ – प्रॉपर्टी मिळण्याचा योग आहे
आज तुम्हाला प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. कला आणि सिने क्षेत्रातील लोकांना फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरीतील उत्पन्न वाढेल. मुलांकडून एखादी आनंद वार्ता मिळेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
वृश्चिक – नवीन काम शोधावे लागेल
आज तरूणांना नोकरी शोधण्यासाठी दगदग करावी लागेल. योग्य वेळत घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान टळेल. दिखावा करण्याच्या सवयीमुळे कर्ज वाढू शकते. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे साधन वाढेल. जोडीदाराची साथ मिळण्याची शक्यता आहे.
धनु – मानसिक ताणामुळे आरोग्य बिघडेल
मानसिक ताण वाढून आज तुमची तब्येत बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. धुर्त लोकांपासून सावध रहा. एखाद्या छोट्या कामासाठी शिफारस करावी लागेल. पैसे खर्च करताना सावध रहा. जवळच्या लोकांची साथ मिळेल.
मकर- भावंडांची साथ मिळेल
भावंडांची साथ मिळाल्याने व्यवसायात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी सर्वाची साथ मिळेल. अधिकाऱ्यांच्या मदतीने पदोन्नती होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागेल.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी