ADVERTISEMENT
home / भविष्य
17 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा

17 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा

मेष – कामाच्या ठिकाणी तुमची पकड मजबूत होईल

आज तुम्हाला तुमच्या मनासारखे काम करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची पकड मजबूत होणार आहे. व्यवसायासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मुले परदेशी जाण्याची शक्यता आहे. 

कुंभ – मानसिक अशांतता जाणवेल

आज मानसिक अशांतता जाणवणार आहे. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचा योग आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल असेल.   

ADVERTISEMENT

मीन –  नातेसंबंध सुधारतील

आज तुमचे नातेसंबंध सुधारणार आहेत. नवीन व्यवसायासाठी ओळखी वाढवण्यात यश मिळेल. एखाद्यासोबत भागिदारीचा विचार कराल. एखादी दुश्मनी गाढ मैत्रीत बदलण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या साधनात वाढ होण्याची शक्यता आहे. 

वृषभ – पैशांबाबत धोका मिळण्याची शक्यता

आज देणी घेणी करताना सावध रहा. तुम्हाला पैशांबाबत धोका मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. विद्यार्थ्यांना कलात्मक विषयात रस वाढणार आहे. व्यवसायात राजकारणातील लोकांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

मिथुन – उत्साहित वाटेल

आज जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. दिवसभर उत्साही वाटेल. मित्रांसाठी प्रवास योजना आखाल. प्रेमाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. घरासाठी खरेदी कराल. 

कर्क – प्रेमसंधात भावनिक समस्या येतील

आज तुम्हाला भावनिक त्रास सहन करावा लागणार आहे. ऑफिसचे काम घरी आणणे टाळा. घरातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारीत योग्य अंतर ठेवून वागण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या.  

ADVERTISEMENT

सिंह – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला वातावरणातील बदलांमुळे आजारपण येण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने समोर येण्याची शक्यता आहे. 

कन्या – जमीन खरेदीचा विचार कराल

आज तुम्ही जमीन खरेदीचा विचार करण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गोष्टींत यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. देणी घेणी सांभाळून करा.  

ADVERTISEMENT

तूळ – कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल

आज तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण  करणार आहात. सामाजिक जीवनात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिक मिटींग अथवा सेमिनारमध्ये तुमची छाप पडेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट कचेरीत यश मिळेल.

वृश्चिक – व्यावसायिक कामे हातातून निसटण्याची  शक्यता

आज तुमचा दिवस आव्हानात्मक असेल. व्यावसायिक कामे हातातून निसटणार आहेत. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

ADVERTISEMENT

धनु – भेटवस्तू  अथवा पैसे मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला धनसंपत्ती अथवा भेटवस्तू मिळणार आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. प्रवासात समस्या येण्याची  शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. 

मकर – नोकरीत दुर्लंक्षपणा घातक ठरेल

आज तुम्हाला नोकरीतील दुर्लक्षपणा केल्याचे परिणाम भोगावे लागतील. राजकारणातील आव्हाने वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मनाविरूद्ध दबाव सहन करावा लागेल. देणी-घेणी सावध राहण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

Bappa ला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दाखवा हा नेवैद्य

ADVERTISEMENT
16 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT