मेष – मानसिक कष्ट सहन करावे लागतील
आज तुमच्या जोडीदाराच्या वागण्यामुळे तुम्हाला मानसिक कष्ट सहन करावे लागतील. अधिकाऱ्यांसोबत विनाकारण वाद घालू नका. भावनात्मक शोषणचे शिकार व्हाल. मित्रांना दिलेले वचन तुम्ही आज पूर्ण करू शकणार नाही. रखडलेले धन मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आयात-निर्यातीच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरूवात केल्याने पैशांची चणचण जाणवेल. कुटुंबाकडून भावनिक आणि आर्थिक सहाय्य मिळेल. देणी-घेणी सांभाळून करा.
मीन – आरोग्य चांगले असेल
आज आरोग्य चांगले असेल. कोर्ट-कचेरीत तुमचा पक्ष मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी साथ देतील. भविष्यात यशस्वी होतील अशा योजनांमध्ये पैसे गुंतवा. आजचा दिवस चांगला असेल
वृषभ – मन निराश राहील
आज तुमचे आरोग्य आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विनाकारण प्रवास करावा लागेल. व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. वाहन चालताना सावध रहा.
मिथुन – लाभ मिळण्याची शक्यता
आज एखाद्या नवीन व्यवसायाबाबत तुम्हाला आकर्षण वाढणार आहे. लाभाची नवीन संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. परदेशी जाण्याचा योग आहे.
कर्क – बिघडलेले संबंध सुधारतील
आज मित्रांच्या मदतीने तुमच्या बिघडलेल्या संबंधात सुधारणा होईल. प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. जबाबदाऱ्या पूर्ण केल्यामुळे तुमचे आज कौतुक होणार आहे. सामाजिक मानसन्मान वाढेल.
सिंह – मतभेद वाढण्याची शक्यता
विद्यार्थ्यांनी अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. वादविवाद करण्यापासून टाळा. जोखिमेच्या कार्यापासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – संपत्ती खरेदीची योजना आखाल
आज चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. व्यावसायिक महत्त्वपूर्ण योजना आखाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कौटुंबिक मंगल कार्यात सहभागी व्हाल.
तूळ – कामात अडचणी येण्याची शक्यता
आज कामात अडचणी आल्यामुळे तुमचे मन निराश होण्याची शक्यता आहे. विरोधक सक्रीय होतील. सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना मेहनत करण्याची गरज आहे. धार्मिक कार्यात मन रमेल.
वृश्चिक – शारीरिक थकवा आणि नैराश्य जाणवेल
आज तुम्हाला कामात अती व्यस्त असल्यामुळे शारीरिक थकवा आणि नैराश्य जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
धनु – जोडीदाराशी नातेसंबंध मजबूत होतील
आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या तुम्हाला जोडीदाराशी नाते मजबूत होतील. नातेवाईकांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे वाईट वाटून घेऊ नका. राजकारणातील लोकांना लाभ मिळेल. मित्रांच्या मदतीने रखडेलेली कामे पूर्ण होतील. परदेशी जाण्याचा योग आहे.
मकर – नवीन योजना करण्यात यश मिळेल
आज तुम्हाला एखाद्या नव्या योजनेत लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. रचनात्मक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्यात रस वाढणार आहे. बिघडलेली कामे आज पूर्ण होतील. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्ती वाढणार आहे.
अधिक वाचा
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी