मेष – डोकं अथवा डोळ्यांबाबत आरोग्य समस्या जाणवतील
आज तुम्हाला डोकं अथवा डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. आजचा दिवस कंटाळवाणा असेल. गुंतवणूक करण्याचा विचार पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी दिलेलं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मनाविरूद्ध प्रवास करावा लागेल. जुन्या मित्रांच्या गाठी-भेठी होतील.
कुंभ – मित्रांकडून भेटवस्तू मिळेल
नवीन प्रॉपर्टी खरेजी करण्यासाठी लोन मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. प्रवासाला गेल्यामुळे बरे वाटेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मीन- योजना पूर्ण करण्यात अपयश मिळेल
कस्टमर सर्विसच्या कामातील लोकांना कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. जोखिमेची कामे करू नका.एखादी योजना पूर्ण करणे कठीण जाईल. धार्मिक कार्यात श्रद्धा वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ – कौटुंबिक वातावरण आनंदाचं असेल
कौटुंबिक समस्या सहजपणे सुटतील. घरातील वातावरण आनंदाचे असेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील समस्या सुटतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन – युवकांना करिअरसाठी दगदग करावी लागेल
आज तरूणांसाठी दिवस शुभ आहे. करिअरसाठी धावाधाव करावी लागेल. व्यावसायिक कामासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक समस्या हळूहळू कमी होतील. विरोधक नमतील. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे
काही काळापुरते प्रॉपर्टीची निगडीत कामे करू नका. व्यावसायिक गोष्टींबाबत सावध रहा. एखादे काम रद्द होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
सिंह – आरोग्य उत्तम राहील.
आज तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. नियमित व्यायाम केल्यास चांगला फायदा होईल. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. रचनात्मक कामांंमधुन नावलौकिक आणि पैसा मिळेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा.
कन्या – भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक संपत्तीवरून भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांंमुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. चुकीची कामे करू नका. सामाजिक प्रतिष्ठा बिघडण्याची शक्यता आहे. जोखिमेच्या कार्यापासून दूर रहा.
तूळ – अपचन होण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी वातावरण सामान्य असेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. जोडीदाराच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक -प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला प्रॉपर्टी विषयक एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू चांगली राहील. जोडीदारासोबत नाते सुधारेल. प्रवासाचा योग आहे. सामाजिक कार्यक्रमात मित्र भेटण्याची शक्यता आहे.
धनु- इतरांच्या मदतीने यशस्वी व्हाल
इतरांच्या मदतीने तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात राजकारणी लोकांची मदत मिळेल. काम वाढण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. एखादी सुखद बातमी मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल.
मकर- नवीन काम सुरू कराल
आज एखाद्या नव्या कामाला सुरूवात कराल. कामात दुर्लक्ष केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांच्या करिअरची काळजी वाटू शकते. आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. देणी घेणी करताना सावध रहा.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)