मेष – कामात अडथळे येतील
आज तुमची झालेली कामे बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देऊ शकतात. व्यवसायात कामाचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याचे व्यवहार सहज होतील. रचनात्मक कार्यात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – दुर्लक्षपणामुळे संधी गमवाल
आज आळस आणि दुर्लक्ष केल्यामुळे एखादी संधी गमावण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मन निराश राहील. रचनात्मक कार्यात समस्या वाढतील.
मीन- धनलाभ होण्याची शक्यता
आज तुमच्यासाठी धनलाभाचा योग आहे. सासरच्या लोकांकडून एखादे मौल्यवान गिफ्ट मिळेल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. देणी घेणी करताना सावध रहा. विद्यार्थ्यांच्या समस्या वाढू शकतात. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
वृषभ – वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या
आज तुम्हाला कौटुंबिक काळजी घेण्याची गरज आहे. वडिलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभाव चिडचिडा आणि रागीट होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील समस्या वाढू शकतात. पैशांसंबधीत एखादी आनंदवार्ता कानावर येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल.
मिथुन – कौटुंबिक साथ मिळेल
आज एखाद्या कठीण प्रसंगी कुटुंब तुमच्या मदतीला तयार असेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारीत लाभ मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
कर्क – विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढेल
आज विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अभ्यासातील रस वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. विशेष कार्यामुळे यश मिळेल. धनलाभ होऊ शकतो. कोर्ट कचेरीत यश मिळेल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
सिंह – आर्थिक लाभ न होण्याची शक्यता
आज व्यवसायातील मेहनतीप्रमाणे तुम्हाला लाभ मिळणार नाही. एखादी महागडी वस्तू खरेदी करताना सावध रहा. संपत्तीबाबत कौटुंबिक वाद सहन करावे लागतील. हट्टीपणाने स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.
कन्या – आरोग्य सुधारेल
आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मेहनत करून तुमच्या व्यावसायिक योजना पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांची मदत मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची साथ मिळेल.
तूळ – कौटुंबिक समस्या वाढतील
कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. घरातील मदतनीसांकडून ताण वाढू शकतो. बाहेरच्या लोकांवर फार विश्वास ठेऊ नका. व्यावसायिक कामे करण्याचा उत्साह वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
वृश्चिक – आळस, थकवा आणि चिडचिड वाढेल
आज तुम्हाला आळस, थकवा आणि चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. बाहेरचे खाद्ययपदार्थ खाणे टाळा. जोडीदाराची साथ मिळेल. उत्पन्न आणि खर्चात समतोल साधा. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे.
धनु – व्यवसायात लाभ होईल
आज तुम्हाला व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. धनलाभ होऊ शकतो. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्ती वाढेल. राजकारणातील जबाबदारी वाढेल. जोडीदाराची मजबूत साथ मिळेल. परदेशी जाण्याचा योग आहे.
मकर- प्रेमयुगूलांना यश मिळेल
आज एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. प्रेमयुगूलांना यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळेल. व्यवसायातील काही ओळखी फायद्याच्या ठरतील. आत्मविश्वास वाढू शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी