ADVERTISEMENT
home / भविष्य
22 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,मीन राशीच्या व्यक्तींची संपत्ती वाढण्याची शक्यता

22 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,मीन राशीच्या व्यक्तींची संपत्ती वाढण्याची शक्यता

मेष : वरिष्ठांचं सहकार्य लाभेल 
कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहका़र्य मिळेल. नवीन संपर्कांमुळे लाभ मिळतील. अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यांमध्ये आवड निर्माण होईल.  मित्रांसोबत झालेले वाद मिटतील.

कुंभ : अपत्यास खोकला-सर्दीमुळे त्रास होईल
अपत्यास खोकला आणि सर्दीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायाची परिस्थिती समाधानकारक असेल. नोकरीत तुम्हाला यश मिळेल. नवीन संपर्क निर्माण करताना सतर्क राहा.  कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळेल. काही काळासाठी प्रवास करणे टाळा.

मीन : उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील
धनसंपदेसंदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. नवीन संपर्क निर्माण करताना सावधगिरी बाळगा. सामाजिक आदर आणि संपत्तीमध्ये वाढ होईल.

वृषभ : करार रद्द होण्याची शक्यता 
घाईगडबडीत मोठी चूक होण्याची शक्यता आहे. यामुळे करार रद्द होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगा. जोडीदारासोबतचे संबंध चांगले असतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. 

ADVERTISEMENT

मिथुन : महागडी भेटवस्तू किंवा पैशांचा लाभ 
सासरहून महागडी भेटवस्तू किंवा धनलाभ होण्याची  शक्यता आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे. नवीन योजना यशस्वी होतील. सुख-सोयींवर अधिक खर्च होईल. कार्यालयाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क : महत्त्वाच्या कामात अडथळा 
कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आत्मविश्वास कमी होईल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळेल. 

सिंह : पोटाच्या समस्येमुळे त्रास होऊ शकतो 
घराबाहेरील पदार्थ खाता-पिताना सावध राहा. पोटाच्या समस्येमुळे त्रास होऊ शकतो. व्यवसायातही अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये बाह्य हस्तक्षेमुळे ताणतणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता. मित्राची भेट सुखद असेल. 

कन्या : प्रेम संबंधांना मार्ग मिळेल 
प्रेम संबंधांना मार्ग मिळेल. नातेवाईकांच्या छोट्या-मोठ्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका. अडचणीच्या काळात वडिलधाऱ्यांचं मार्गदर्शन उपयोगी ठरेल.  व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखद होईल.

ADVERTISEMENT

तूळ : स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता 
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता. बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. रखडलेलं काम पूर्ण होईल. आत्मविश्वासात वाढ होईल.

वृश्चिक : आर्थिक अडचणी उद्भवू शकतात
आर्थिक प्रकरणामध्ये जोखीम स्वीकारू नका. पैशांसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात. कर्ज घेण्याचा निर्णय टाळा. अपत्याकडून चांगली बातमी मिळू शकते. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.

धनू : आरोग्यात सुधारणा होतील
वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होतील. निष्काळजी वागू नका. एखादी सुखद बातमी ऐकण्यास मिळण्याची शक्यता आहे. नवीन संपर्क निर्माण करताना सतर्क राहा. महत्त्वाच्या बाबी मार्गी लागतील. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. 

मकर : मित्र नाराज होतील  
तुमच्या कटू शब्द प्रयोगांमुळे मित्रांचे मन नाराज होण्याची शक्यता आहे. द्विधा मनस्थितीत निर्णय घेणे कठीण जाईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. जोडीदारासह धार्मिक कार्यात सामील होऊ शकता.

ADVERTISEMENT

वाचा अधिक :

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

ADVERTISEMENT
21 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT