मेष – कर्ज घेणे टाळा
आज आर्थिक समस्येचे वातावरण निर्माण होऊ शकते. कोणतेही कर्ज घेऊ नका. उधार दिलेले पैसे परत मिळणार नाहीत. भावंडासोबत नाते दृढ होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. व्यवसायात चढ उतार जाणवतील. रचनात्मक कार्यात रस वाढेल
वृषभ – एखाद्या जुनाट आजारातून सुटका मिळेल
एखादा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. आहाराबाबत सावध रहा. नवीन वाहन खरेदी कराल. व्यावसायिक योजना सफळ होतील. देणी-घेणी सांभांळून करा. धार्मिक कार्यात मन रमवाल. जोडीदाराशी नातेसंबध दृढ होतील.
मिथुन – कौटुंबिक वाद होण्याची शक्यता
आज तुमच्या घरात कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. भागिदारीच्या व्यवसायापासून दूर रहा. विरोधकांपासून सावध रहा. व्यवसायात मित्रांची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.
कर्क – रक्तदाब अथवा मधुमेहाची समस्या सतावेल
आज तुम्हाला रक्तदाब अथवा मधुमेहाविषयी त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि आहाराची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कामात यश मिळेल. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे.
सिंह – आर्थिक स्थिती सुधारेल
आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक कामात यश मिळेल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. परदेशात जाण्याचा योग आहे. अध्यात्मिक शिबिर अथवा धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
कन्या – कौटुंबिक सहकार्याने व्यवसाय वाढेल
घरातील मंडळी व्यवसायात मदत करतील. आज भाग्याची साथ तुम्हाला चांगली मिळेल. त्यामुळे आज काम करण्याचा उत्साह वाढणार आहे. कौंटुबिक वातावरण आनंदाचे असेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. रखडलेली कामे पूर्ण कराल. कोर्टकचेरीतून सुटका होईल.
तूळ – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकेल
आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल. दुर्लक्षपणा केल्यामुळे काम बिघडू शकते. व्यवयासायात मेहनत घेऊनही फायदा कमी होईल. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल.
वृश्चिक – शेअर बाजारात लाभ मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला शेअर बाजारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे साधन वाढेल. सामाजिक कार्याशी जोडले जाल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. देणी-घेण्याच्या बाबतीत सावध रहा.
धनु – एखाद्या कामात मन रमवा
मनासारखे काम मिळण्यासाठी दगदग करावी लागेल. जोखिमेची कामे करू नका. व्यवसायातील एखादे काम रद्द होण्याची शक्यता. जोडीदाराशी नाते दृढ होईल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे सुधारतील. राजाकारणातील जबाबदारी वाढेल
मकर- घरातील वृद्धांच्या तब्येतीची काळजी घ्या
घरातील वृद्ध लोकांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध रहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबत आज वेळ चांगला जाईल. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – व्यवसायात भागिदारी लाभादायक
विवाहयोग्य लोकांना मनासारखा जोडीदार मिळेल. व्यवसायात भागिदारी केल्याने लाभ होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. कोर्टकचेरीतून सुटका होईल.
मीन- व्यवसायात यश मिळेल
आज कामाच्या ठिकाणी सावध रहा. व्यवसायात यश मिळण्याचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. रचनात्मक कामात प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)