मेष – अपचनाचा त्रास होईल
आज तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. आहाराबाबत सावध रहा. दिवसभर चिडचिड आणि अस्वस्थपणा जाणवेल. कामाच्या ठिकाणी त्रास जाणवेल. व्यावसायिक योजना सफळ होतील. देणी घेणी करताना सावध रहा.
कुंभ – वारसाहक्क मिळेल
आईकडून वारसाहक्क मिळेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नवीन कामे मिळतील. परदेशात व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला काळ आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मीन – कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल
कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत तणाव वाढेल. बोलताना सावध रहा. विरोधक त्रास देतील. महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका. व्यवसायात नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.मुलांकडून आनंदवार्ता समजेल
वृषभ – भावंडांशी नाते सुधारेल
भाग्योदय होण्याची शक्यता आहे. भावंडासोबत असलेले नाते सुधारेल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. व्यवसायात नवीन ओळखींचा फायदा होईल. पैशांची देणी घेणी करताना सावध रहा. बोलताना कठोर शब्द वापरू नका.
मिथुन – विद्यार्थ्यांचा साहित्यामध्ये रस वाढेल
कला आणि चित्रपटसृष्टीतील लोकांना लाभ होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांची साहित्यामध्ये रुची वाढेल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आधुनिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. भावनिक समाधान मिळेल. अध्यात्मातील रुची वाढेल.
कर्क – मेहनतीचे फळ मिळणार नाही
व्यवसायात मेहनतीप्रमाणे फळ मिळणार नाही. एखादी महागडी वस्तू खरेदी करताना सावध रहा. वारसाहक्काबाबत घरात वाद निर्माण होऊ शकतो. रागाने स्वतःचे नुकसान करू नका. कुटुंबातील लोकांच्या सहकार्यांने कठीण कामे पूर्ण होतील.
सिंह – आरोग्य सुधारेल
आरोग्यात सुधारणा होईल. आता तुम्हाला आराम आणि चिंतन करण्याची गरज आहे. आहाराबाबत सावध रहा. फ्रेश वाटण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. कुंटुंबातील सुख-दुःखामुळे मन निराश राहील.
कन्या – कुंटुंबात गैरसमज होऊ शकतात
कुंटुंबात गैरसमज होऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिकबाबतीत केलेला वाद यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता.
तूळ – जोडीदारामुळे तणाव जाणवेल
आज घरातील मुख्य सदस्य अथवा जोडीदारामुळे तणाव वाढेल. घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक – पैशांसंबधी आनंदवार्ता मिळेल
आज तुम्हाला पैशांसंबधी शुभवार्ता मिळेल. व्यवसायातील योजनांमध्ये यश मिळेल. नवीन शिकण्याची संधी मिळेल. मानसन्मान वाढेल. एखादी सकारात्मक बातमी समजेल. परदेशी जाण्याचा योग आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
धनु – नवीन ओळखी वाढतील
आज अचानक नवीन ओळख वाढेल. जोडीदारासोबत नाते सुदृढ होईल. कुंटुबात आनंदी वातावरण निर्माण होण्याची शक्यता.नोकरीत पदोन्नती होईल. व्यावसायिक योजना सफळ होतील. आरोग्याची काळजी घ्या. देणी-घेणी करताना सावध रहा.
मकर – विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही
विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कामे दुर्लक्ष केल्यामुळे कठीण होतील. अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी इतर सहकाऱ्यांना मदत करा. आरोग्याची काळजी घ्या.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)