ADVERTISEMENT
home / भविष्य
28  एप्रिल 2020 चं राशीफळ, कर्क राशीला धनलाभाचा योग

28 एप्रिल 2020 चं राशीफळ, कर्क राशीला धनलाभाचा योग

मेष – आरोग्याची काळजी घ्या

आज मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत फोनवरून संपर्क साधाल. घरातील नातेसंबंध सुधारणार आहेत. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे. 

कुंभ – मूड खराब होण्याची शक्यता

आज घरातील वातावरणामुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. इतरांमुळे तुम्हाला  तुमचे निर्णय बदलावे लागतील. पैशांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळेल. अर्धवट राहिलेले छंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

ADVERTISEMENT

मीन-  जोडीदारासोबत मतभेद दूर होतील

आज तुमचे जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होणार आहेत. मुलांबाबत गोड बातमी मिळू शकते. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. बिघडलेली कामे दुरूस्त होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

वृषभ – वडीलांचे प्रेम मिळणार आहे

आज तुम्हाला वडीलांचे प्रेम आणि भावनिक आधार मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. जोडीदारासोबत एखादा रोमॅंटिक चित्रपट पाहण्यात वेळ जाईल. व्यवसायात जोखिम घेणे टाळा. 

ADVERTISEMENT

मिथुन – महत्त्वाची कामे करण्याचा आळस करू नका

आज एखादे महत्त्वाचे काम करण्याचा केलेला आळस महागात पडू शकतो. आरोग्य चांगले राहील. जोडीदाराच्या वाहण्याचा त्रास होणार आहे. मित्रांकडून आनंदाची बातमी मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. 

कर्क – कौटुंबिक संपत्ती मिळेल

आज तुम्हाला आईकडून वारसा हक्काने पैसे मिळतील. व्यवसाय वाढवण्यासाठी योजना आखणार आहात. प्रेमसंबध रोमॅंटिक असतील. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल. रचनात्मक कामात नवनवीन प्रयोग कराल. 

ADVERTISEMENT

सिंह – नवीन कामे सुरू करू नका

आज नकारात्मक विचारांचा तुमच्यावर प्रभाव असेल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रयोग करणे टाळा. व्यवसायातील काही कामे रद्द होऊ शकतात. जोडीदारासोबत नाते मजबूत होणार आहे. 

कन्या – नकारात्मकता वाढेल

आज तुमच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव असेल. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. मुलांसोबत रचनात्मक कार्यात वेळ जाईल. अध्यात्म आणि योगामधील रस वाढणार आहे. 

ADVERTISEMENT

तूळ – जोडीदारासोबत नात्यात दूरावा येईल

मुलांच्या सुखसमृद्धीत वाढ होईल. जोडीदारासोबत झालेले मतभेद दूर होतील. घरातील लोकांसाठी मंगल योजना आखण्याची शक्यता आहे. बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

वृश्चिक – विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना 

आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी नवीन योजना आखण्यात येईल. व्यवसायातील स्थिती चांगली राहील. रखडलेली कामे पूर्ण  कराल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. घरातील वातावरण चांगले असेल. 

ADVERTISEMENT

धनु – व्यवहारात धोका होण्याची शक्यता 

आज व्यवहारात धोका होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार येतील. धार्मिक कार्यात मन रमेल. प्रवास करणे टाळा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अध्यात्म आणि योगामधील रस वाढणार आहे. 

 

मकर – आईच्या आरोग्यात सुधारणा

ADVERTISEMENT

आज आईची तब्येत सुधारणार आहे. दिनक्रम नियमित ठेवा. सध्या प्रवास करणे टाळा. व्यवसायात भागिदारीचा फायदा होईल. व्यवहार करताना सावध राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान

ADVERTISEMENT

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

26 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT