मेष – चल-अचल संपत्ती खरेदी कराल
आज तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. चल-अचल संपत्ती खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासाला जाताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. देणी-घेणी सांभाळून करा.
कुंभ – विवाहातील अडचणी दूर होतील
आज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तणाव कमी असेल. राजकारणात नवीन जबाबदारी हाती येईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक समारंभात जोडीदारासोबत सभभागी व्हाल.
मीन- कामाच्या ठिकाणी समस्या येतील.
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी त्रास होणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार कराल. प्रॉपर्टीबाबत कोणतेही काम आज करू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. बिघडलेली कामे सुधारल्याने सामाजिक मानसन्मान वाढणार आहे.
वृषभ – रोजच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका
आज तुम्ही तुमच्या रोजच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. अधिकाऱ्यांकडून तणाव वाढू शकतो. वादविवादांपासून दूर रहा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. धार्मिक कार्यांतील रस वाढणार आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
मिथुन – मुलांना ताप येण्याची शक्यता
आज तुमच्या मुलांना ताप येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक समस्यांमधून हळूहळू सुटका मिळेल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.
कर्क – व्यवसायातील भागिदारीत यश मिळेल
आज तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांची दखल घेतली जाईल. सामाजिक कार्यक्रमात जोडीदारासोबत सहभागी होण्याची संधी मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल.
सिंह – कला क्षेत्रातील लोकांना यश मिळेल
आज कला क्षेत्रातील लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजना सफळ होतील. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी मिळेल. पदोन्नतील मिळण्याची संधी आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल.
कन्या – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
आज पैसे ट्रान्सफर करताना सावध रहा. कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करू नका. प्रेमसंबंधात सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल
तूळ – आरोग्य सुधारेल
आज तुमच्या आईची तब्येत सुधारणार आहे. कौटुंबिक साथ मिळाल्याने नाते सुधारेल. कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन कराल. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. परदेशी जाण्याचा योग आहे.
वृश्चिक – मित्रांमुळे दुःखी व्हाल
आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या वागण्याचा त्रास होणार आहे. देणी-घेणी सांभाळून करा. भविष्यात ताण-तणाव जाणवण्याची शक्यता आहे. नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल.
धनु – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा आणि चिडचिड होऊ शकते. उत्पन्नाचे साधन मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आई-वडीलांची चांगली साथ मिळेल.
मकर – प्रॉपर्टी खरेदीची योजना आखाल
आज तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना आखणार आहात. नवीन व्यवसायिकांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांची दखल घेतली जाईल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’