मेष – अज्ञात भिती वाटेल
आज तुम्हाला एखाद्या अज्ञात भिती वाटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्याने तणावदेखील वाढेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धार्मिक कार्यात मन रमवाल.
कुंभ – नवीन संपत्ती खरेदीचा योग आहे
आज तुम्ही एखादी नवीन संपत्ती खरेदी कराल. व्यावसायिक योजना सफळ होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. राजकारणातील महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.
मीन – अधिकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता
आज कामाच्या ठिकाणी अधिकारी वाद घालण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. रचनात्मक कार्चात प्रगती होण्याची शक्यता आहे. जुनी मैत्री नवीन संबंधात बदलेल.
वृषभ – एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल
आज तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात यश मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध राहा.
मिथुन – उच्च शिक्षणातील अडचणी दूर होतील
आज तुम्हाला नव्या नोकरीचा शोध करावा लागेल. उच्च शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील. अधिकाऱ्यांच्या मदतीने नोकरीत प्रगती होईल. व्यवहार कौशल्यामुळे लाभ मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करणे शक्यत होईल.
कर्क – दिलेले पैसे परत मिळणे कठीण होईल
आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. दिलेले पैसे परत मिळणे कठी आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी जाणवेल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
सिंह – आरोग्य उत्तम असेल
आज तुमच्या जीवनशैलीमुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. भेटवस्तू अथवा मानसन्मानात वाढ मिळेल. कौटुंबिक नातेसंबंधात गोडवा येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत असेल. रचनात्मक कार्यातून मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
कन्या – भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता आहे
आज तुमचे तुमच्या भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. मन निराश होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल.
तूळ – तणाव वाढण्याची शक्यता आहे
आज तुमचा ताणतणाव विनाकारण वाढू शकतो. धार्मिक कार्यात मन रमवा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. प्रिय व्यक्तीशी झालेली भेट सुखकारक असेल.
वृश्चिक – हरवलेली वस्तू मिळेल
आज तुम्हाला अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. मुलांबाबत आनंदवार्ता मिळेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. देणी घेणी सांभाळून करा.
धनु – कौटुंबिक समस्यांपासून सुटका होईल
आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांमधून सुटका मिळेल. राजकीय पक्षाची महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. विरोधकांना तुमचे मत ऐकावेच लागेल.
मकर – व्यवसायात चढ- उतार येण्याची शक्यता
आज युवकांना करिअरची चिंता सतावेल. व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे करण्याचा कंटाळा करू नका. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का