मेष – कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील
आज विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधकांचा त्रास होण्याची शक्यता आहे. बेसावधपणामुळे महत्त्वाची कामे विसरण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कुंभ – आरोग्याची काळजी घ्या
आज तुम्हाला पोटाचा त्रास होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात मंगल कार्याची योजना आखाल.
मीन- कौटुंबिक साथीने व्यवसायात लाभ
आज तुमचे भाग्य तुमची साथ देणार आहे. कौटुंबिक सहकार्याने व्यवसायात प्रगती होईल. एखादे काम करण्याचा उत्साह वाटेल. घरात मौजमस्तीचे वातावरण असेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
वृषभ – धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे
आज धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परिक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळेल. व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे.
मिथुन – दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल
आज दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
कर्क – आईवडीलांचे आरोग्य चांगले राहील
आज तुमच्या आईवडीलांची तब्येत सुधारणार आहे. मन अशांत राहील. जुन्या मित्रांची भेट होणार आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. खर्च वाढल्यामुळे निराश व्हाल. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा.
सिंह – व्यावसायिक भागीदारीचा फायदा होईल
अविवाहितांसाठी लग्नाचा योग आहे. व्यावसायिकांना भागीदारीचा चांगला फायदा होईल. जोडीदाराशी नाते सुधारणार आहे. अध्यात्मिक शिबीरात भाग घ्याल.
कन्या – व्यवसायात यश मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला व्यवसायात यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळेल. वाढत्या खर्चामुळे एखादे जास्तीचे नवे काम करावे लागेल. मेहनतीचे चांगले फळ नक्कीच मिळेल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.
तूळ – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
आज तुम्हाला फसवणूक झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च वाढणार आहेत. व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल.
वृश्चिक – आजारपणावर नियंत्रण राहील
आज तुम्ही मधुमेह आणि इतर आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवणार आहात. व्यावसायिक योजना सफळ होतील. प्रेमसंबंध चांगले होणार आहेत. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण करा.
धनु – तणाव वाढणार आहे
आज तुमच्या कौटुंबिक समस्या आणि ताणतणाव वाढणार आहे. कामातील कौशल्यामुळे तुम्हाला पदोन्नतीची संधी मिळेल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे.
मकर – आर्थिक स्थिती मजबूत असेल
आज तुम्हाला उत्पन्नांचे नवे साधन मिळणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. व्यावसायिकांना यश मिळेल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे.