मेष : व्यवसायात नुकसान होण्याची भीती
व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक आदर वाढेल. राजकारणातील जबाबदारी वाढतील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : प्रेम संबंध होतील दृढ
आज प्रेम संबंध सुधारतील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. गैरसमज होण्यापासून वाचा. सन्मान वाढेल. व्यवसायात चढ-उतार असतील.
मीन : राजकारणात यश मिळेल
आज समाधान आणि शांतीचा दिवस असेल. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन व्यावसायिक कराराद्वारे स्थान, प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल.
वृषभ : आरोग्य सुधारेल
तुमचे आरोग्य सुधारेल. ताजेतवाने असाल. आत्मविश्वास वाढेल. गुंतागुंतीचे प्रकरण मार्गी लागतील. व्यवसायातील भागीदारीत फायदा होईल. नवीन संपर्कांमध्ये सावधगिरी बाळगा. वादापासून दूर राहा.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
मिथुन : प्रेमसंबंधात तणावाची शक्यता
प्रेम संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. वाईट वृत्तामुळे अचानक प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. नियमित दिनक्रमामुळे आरोग्य ठीक राहील. कामाच्या ठिकाणी आपली कार्यक्षमता टिकवून ठेवा.
कर्क : मानसिक त्रास आणि औदासिन्य असेल
आज मानसिक अशांतता आणि औदासिन्य राहील. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न अपयशी होण्याची शक्यता आहे. पालकांचे सहकार्य मिळेल. विरोधकांचा पराभव होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल.
सिंह : नफा व प्रगती होण्याची शक्यता
आज चहुबाजूंनी प्रगती व नफा होण्याची शक्यता आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन प्रेम प्रकरणात चांगली संधी आहे. तब्येत ठीक होईल. प्रवासाचा योग आहे.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
कन्या : कौटुंबिक समस्या दूर होतील
उत्पन्न वाढल्यानं कौटुंबिक नात्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. पालकांचं प्रेम आणि आपुलकी मिळेल. एखाद्या सामाजिक समारंभास उपस्थित राहण्याची संधी मिळेल. तब्येत ठीक होईल.
तूळ : ध्येयासाठी कठोर परिश्रम करावे लागतील
ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. रचनात्मक कामात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरणात मौजमजा असेल. जोडीदाराबरोबर प्रेमपूर्ण संबंध कायम राहतील.
वृश्चिक : धन लाभाचा योग
अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना असू शकते. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. जोडीदारासह लाँग ड्राईव्हवर जाऊ शकता. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा.
(वाचा : वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘ह्या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान)
धनु : विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरीत परिवर्तनची शक्यता आहे. अनावश्यक धावपळ होईल. नवीन प्रेमसंबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे.
मकर : डोकेदुखीमुळे समस्या
डोळ्यांची जळजळ आणि डोकेदुखीमुळे त्रास होऊ शकते. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या टीकेमुळे घाबरू नये. गमावलेला विश्वास पुन्हा मिळेल. कुटुंबात शांतता व आनंद राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.