चेहऱ्यावर जमा होणारी धुळ, माती, प्रदूषण आणि डेड स्कीन काढण्यासाठी त्वचा नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. ज्यामुळे फक्त त्वचा स्वच्छच होत नाही तर नवीन त्वचापेशींची निर्मितीदेखील योग्य प्रकारे होते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे क्लिंझर्स, फेसवॉश मिळतात. त्याचप्रमाणे काही घरगुती पदार्थांचा वापर करूनही तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करू शकता. चेहरा क्लिन करण्यासाठी नेमकं कोणतं क्लिंझर वापरावं आणि दिवसभरात किती वेळा चेहरा क्लिन करावा हे जाणून घेण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा.
क्लिंझर्सचा वापर करणं का आहे गरजेचे –
क्लिंझर्स हे असं सौंदर्यप्रसाधन असतं ज्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. शरीरावर त्वचेचे अनेक थर असतात. शारीरिक क्रियेमुळे त्वचेवरील वरच्या थरावरील त्वचापेशी मृत होतात आणि नवीन त्वचापेशी त्यांची जागा घेतात. मात्र त्वचेवर जमा होणारी धुळ, माती, प्रदूषण आणि डेड स्किन वेळेवर स्वच्छ न केल्यास त्वचेच्या कार्यात अडचण येते आणि जमा झालेल्या मृत त्वचा पेशीमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. याचा परिणाम त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा कमी होतो आणि त्वचा राठ आणि निस्तेज दिसू लागते. मात्र क्लिंझर्समुळे त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण आणि डेडस्किन निघून जाते. ज्यामुळे त्वचेचं रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला योग्य ऑक्सिजनचा पूरवठा होतो. त्वचा तजेलदार राहण्यासाठी त्वचेला पुरेशा ऑक्सिजनची गरज असते.
Shutterstock
क्लिंझर्सचा वापर कसा करावा –
कोणतेही क्लिंझर वापरण्यापूर्वी आधी हाताचे तळवे स्वच्छ धुवावेत. चेहऱ्यावर मेकअप लावलेला असेल तर मेकअप रिमूव्हरने तो काढून टाकावा. त्यानंतर कोमट पाण्याने चहरा स्वच्छ धुवून घ्यावा. तळहातावर काही थेंब क्लिंझर घ्यावे त्यात थोडं पाणी मिसळून ते डायल्युट करावे आणि मग चेहऱ्यावर त्याने मसाज करावा. चेहरा स्वच्छ केल्यावर तो कोमट पाण्याने धुवावा आणि पुसून त्वचेवर मॉईस्चराईझर लावावे.
दिवसभरात कितीवेळा चेहरा स्वच्छ करणं आहे गरजेचे –
दिवसभरात चेहरा कितीवेळा स्वच्छ करावा हे प्रत्येकावर अवलंबून आहे. कारण तुमच्या त्वचेवर किती वेळ मेकअप असतो, तुमचा प्रदूषणाशी किती काळ संबध येतो, तुम्ही कितीवेळ घराबाहेर असता यावर तुम्ही कितीवेळा चेहरा क्लिन करावा हे ठरवावे लागते. मात्र सामान्यपणे दिवसभरात कमीत कमी दोनवेळा चेहरा क्लिन करणं सर्वांसाठी गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचा व्यवस्थित क्लिन केल्यास त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. शिवाय नेहमी हे स्किन केअर रूटिन फॉलो केल्यास तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.
Shutterstock
चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोणते नैसर्गिक घटक वापरावे –
बाजारातील विकत मिळणाऱ्या क्लिंझरप्रमाणेच घरात दूध, दही, बेसन, मध,ओट्स, नारळाचे तेल, बदामाचे तेल या गोष्टी तुम्ही तुमची त्वचा नियमित स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. मात्र या गोष्टींचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत असायला हवा. कारण त्यानुसार या गोष्टींचा वापर केल्यामुळे त्वचेवर चांगला परिणाम होऊ शकतो.
आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
फेशिअल आणि क्लिन अपमध्ये नेमका काय आहे फरक
क्लिनझर की फेसवॉस, जाणून घ्या दोघांमधील फरक (Cleanser Vs Face Wash In Marathi)