मेकअप करणं सर्वांनाच आवडतं. मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाची असते लिपस्टिक. कारण लिपस्टिकमुळे चेहरा नक्कीच आकर्षक आणि उठावदार दिसतो. मात्र प्रत्येकाला लिपस्टिक लावणं आवडतं असं नाही. काही जणी लिपस्टिकपेक्षा लिप ग्लॉस लावणं जास्त पसंत करतात. मात्र लिपग्लॉस लावताना जर नीट काळजी घेतली नाही तर ती पसरण्याची शक्यता जास्त असते. लिपस्टिक हायलाईट करण्यासाठी तुम्ही लिपस्टिकवर लिप ग्लॉस लावू शकता. ज्यामुळे तुमचे ओठ बोल्ड आणि चमकदार दिसतात. जर तुम्हाला परफेक्ट लुक हवा असेल लिप ग्लॉस लावताना या टिप्स फॉलो करा.
10 बेस्ट लिपग्लॉस ज्यामुळे तुमचे ओठ दिसतील अधिक सुंदर (Best Lip Gloss In Marathi)
लिप ग्लॉस लावताना या टिप्स फॉलो करा
तुम्ही लिप ग्लॉस कसा लावता यावर तुमचा लुक ठरतो. शिवाय लिप ग्लॉस जास्त काळ टिकण्यासाठी या टिप्स महत्त्वाच्या आहेत.
ओठांना फाऊंडेशन लावा
लिप ग्लॉस जास्त काळ टिकवायचा असेल तर तुम्ही लिप ग्लॉस लावण्याआधी ओठांना फाऊंडेशन लावायला हवं. ज्यामुळे लिप ग्लॉस सेट होतं आणि पसरत नाही. चेहऱ्यावर फाऊंडेशन लावतानाच ते थोडं ओठांनाही लावा. तु्म्ही ओठांवर बोटांच्या मदतीने फाऊंडेशन लावू शकता. तसंच पूर्ण मेकअप झाल्यावर ओठांना लिप ग्लॉस लावा.
हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी करा हे घरगुती उपाय Lip Care Tips For Winter In Marathi
ओठांना पावडर लावा
जर तुम्ही चेहऱ्यावर फाऊंडेशन लावणार नसाल तर तुम्ही नो मेकअप लुकसाठी तुम्ही ही लिप ग्लॉस लावताना काळजी घेऊ शकता. जर लिप ग्लॉस लावण्याआधी तुम्ही ओठांवर पावडर लावली तर तुमचा लिप ग्लॉस नक्कीच पसरणार नाही.मात्र लक्षात ठेवा पावडर जास्त लावू नका नाहीतर लिप ग्लॉसचा रंग बदलेल.
लिप लायनर लावा
लिप ग्लॉस लावताना परफेक्ट लुक हवा असेल तर ग्लॉस लावण्याआधी लिप लायनर लावा. कारण जर तुमचे ओठ पातळ आणि छोटे असतील तर लिप लायनर लावल्यामुळे लिप ग्लॉस जास्त उठावदार दिसेल. लिप लायनर लावल्यानंतर डबल कोट ग्लॉस लावा.
कोरड्या आणि फुटलेल्या ओठांवर करा रामबाण आणि सोपे उपाय
लिप ग्लॉस लावण्याची योग्य पद्धत
लिप ग्लॉस जर जास्त काळ टिकवायचा असेल तर सर्वात आधी सेम शेडची लिपस्टिक लावा आणि मग त्यावर लिप ग्लॉस लावा. ज्यामुळे तुमचे ओठ जास्त शाईन करतील. लक्षात ठेवा लिपस्टिक अगदी हलकी लावा जास्त कोट लावू नका. शिवाय लिप ग्लॉस सेट होऊ द्या. यासाठी टीश्यू पेपरने सेट करा. तसंच लिप ग्लॉसचे अती कोट देऊ नका.