ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
hairbrush

आपला कंगवा किंवा हेअरब्रश स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

केस उत्तम व सुंदर दिसण्यासाठी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. केस निरोगी व सुंदर ठेवण्यासाठी आपण आपले केस नियमितपणे धुतो व विंचरतो व काही खास प्रसंगी ते स्टाईलही करतो. तुमचे केस स्वच्छ ठेवण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही केसांसाठी वापरत असलेले प्रत्येक साधन म्हणजेच तुमचा हेअरब्रश किंवा कंगवा देखील वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. नियमितपणे स्वच्छ न केल्यास हेअरब्रश किंवा कंगवा लवकर घाण होऊ शकतो. त्यावर धूळ, घाण, लिंट, तेल आणि आपलेच गळलेले केस अडकून बसतात. आपल्या रोजच्या घाईत हेअरब्रश किंवा कंगवा साफ करणे हे वेळखाऊ काम वाटू शकते, परंतु तो स्वच्छ करायला खरं तर जास्त वेळ घालवावा लागत नाही. काही छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कंगवा स्वच्छ ठेवू शकता  जेणे करून तुमची टाळूची निगा राखणे आणि केस निरोगी राहण्यास मदत होईल.

हेअरब्रश किंवा कंगवा का स्वच्छ करावा?

हेअरब्रशच्या कुशनवर किंवा कंगव्याच्या दातांवर लिंट जमा होणे अगदी सामान्य आहे. पण हेअरब्रशवर याव्यतिरिक्त तेल, त्वचेच्या मृतपेशी आणि आपण वापरतो ती केसांची उत्पादने साचतात. जेव्हा तुमचा हेअरब्रश घाण असतो तेव्हा स्वच्छ, चमकदार केस आणि टाळू निरोगी ठेवणे कठीण असते कारण या घाणीबरोबरच कंगव्यावर यीस्ट व जिवाणू देखील असतात आणि घाण कंगव्यावर त्यांची चांगलीच वाढ होते. 

कंगवा कसा स्वच्छ करावा । How To Clean Hairbrush
कंगवा कसा स्वच्छ करावा ?

जेव्हा तुम्हाला हेअरब्रशच्या कुशनवर घाण साचलेली दिसेल तेव्हा तुमचा हेअरब्रश स्वच्छ करण्याची वेळ आली आहे असे समजून जावे व कंगवा किंवा हेअरब्रश स्वच्छ करावा. तसेच आपल्या केसांचा गुंता कधीही कंगव्यात तसाच ठेवू नये. कंगव्यात अडकलेले केस रोजचे रोजच काढून कचरापेटीत टाकावे म्हणजे कंगवा साफ करणे तुम्हाला जड जाणार नाही.  

हेअरब्रश स्वच्छ करण्याच्या टिप्स

कंगवा कसा स्वच्छ करावा । How To Clean Hairbrush
कंगवा कसा स्वच्छ करावा
  • तुमचा हेअरब्रश किंवा कंगवा तुम्ही विविध प्रकारे स्वच्छ करू शकता. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा कंगवा किंवा हेअरब्रश आहे ते बघून मग तो स्वच्छ करण्याची योग्य पद्धत निवडा. उदाहरणार्थ लाकडी किंवा रबराचे हँडल असलेले हेअरब्रश आपण पाण्यात भिजवून ठेवू शकत नाही. त्यांना स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला दुसरी पद्धत वापरावी लागेल. 
  • कंगवा व हेअरब्रश स्वच्छ करताना सर्वप्रथम त्यात अडकून राहिलेले केस पूर्णपणे काढून टाका. कंगव्यातून केस काढणे सोपे जाईल पण हेअरब्रश मध्ये अडकलेला गुंता काढायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. एकदा तुमच्या कंगव्यातून तुम्ही केसांचा गुंता पूर्णपणे काढून टाकला की मग तुम्ही तो सहजपणे स्वच्छ करू शकता. 
  • एका बादलीत किंवा मगमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा तुम्ही केसांसाठी वापरता तोच शॅम्पू घाला. पाण्यात शॅम्पू पूर्णपणे विरघळून घ्या. यानंतर त्यात तुमचा कंगवा व हेअरब्रश अर्धा तास बुडवून ठेवा.यामुळे कंगव्यावर साचलेले तेल व इतर घाण निघून जाण्यास मदत होईल. अर्ध्या तासानंतर एखाद्या जुन्या टूथब्रशने कंगवा व हेअरब्रशचे कुशन घासा. एकदा घाण पूर्ण निघाली की मग कोमट पाण्याने कंगवा स्वच्छ धुवा आणि हवेत कोरडा करा.  
  • रबर किंवा लाकडाचा कंगवा /हेअरब्रश स्वच्छ करण्यासाठी बादलीत पाणी घ्या आणि त्यात एक चमचाभर शॅम्पू घालून मिसळून घ्या. एखादा जुना टूथब्रश घ्या, तो या पाण्यात बुडवा आणि त्याने तुमचा हेअरब्रश व कंगवा हलक्या हाताने घासून घ्या. नंतर कंगवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि हवेत कोरडा करा. 
  • तुमचा कंगवा मजबूत असल्यास तुम्ही तो वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशरमध्येही धुवू शकता. 

या प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने कंगवा व हेअरब्रश स्वच्छ करू शकता. 

ADVERTISEMENT

Photo Credit – dreamstime, unsplash

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

04 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT