ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to clean marble mandir

घरातील संगमरवरी देव्हारा काळपट पडला असेल तर असा चमकवता येईल 

घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो. घरात झुरळं, जळमटं होऊ नयेत म्हणून, डाग पडू नयेत म्हणून आपण अनेक पद्धती वापरतो. आपल्या घरात देवघराचे सगळ्यात खास स्थान असते. त्यामुळे देवघराची व खास करून देव्हाऱ्याची स्वच्छता हे एक महत्वाचे काम असते. घरातल्या देव्हाऱ्याची वेळोवेळी स्वच्छता करणे खूप आवश्यक आहे. देवघर ही अशी पवित्र जागा असते जिथे देवतांचा वास असतो तसेच सकारात्मक ऊर्जा देखील वास करते. त्यामुळे या जागेची चांगली स्वच्छता केल्यास घरात सुख-समृद्धी येते व टिकून राहते. जर देवघरच अस्वच्छ असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा कायम राहते. 

हल्ली अनेक लोक सुंदर पांढऱ्या संगमरवराचा देव्हारा बनवून घेतात पण त्याची स्वच्छता करताना तो सहजासहजी साफ होत नाही आणि साफसफाई करूनही त्याचा पिवळसरपणा दूर होत नाही. देव्हाऱ्यात पूजा करताना कापूर, धूप, उदबत्ती आणि दिवे लावले जातात, त्यामुळे धुरामुळे संगमरवरी देव्हाऱ्यात काळे डाग दिसू लागतात आणि अनेक वेळा साफसफाई करूनही ते पूर्ण निघून जात नाहीत. संगमरवरी देव्हारा पांढराशुभ्र असतो त्यामुळे तो लवकर मळतो. तुमच्या घरीही संगमरवरी देव्हारा असेल तर त्याची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेल्या सोप्या टिप्स वापरून पाहू शकता आणि घरातील देव्हारा कायमस्वरूपी चमकदार ठेवू शकता. 

कॉर्नफ्लोअरने करा स्वच्छता 

देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ पूजेसाठी दिवा लावला जातो. दिवा लावल्यामुळे तेलाचे डाग पडतात आणि संगमरवरी देव्हाऱ्यात पडलेले तेलाचे डाग काढणे फार कठीण आहे. हे खूप हट्टी डाग आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी त्या जागेवर थोडे कॉर्नफ्लोअर टाका व पाच मिनिटे थांबा. पाच मिनिटांनंतर डाग कापडाने पुसून टाका. यामुळे तेलाचे डाग निघून जातील. 

How To Clean Marble Mandir
How To Clean Marble Mandir : Pinterest

लोखंडी तारांचा ब्रश वापरून बघा 

संगमरवरी देव्हारा स्वच्छ करण्यासाठी, आपण लोखंडी तारांचा ब्रश वापरू शकतो. डागांवर व्हिनेगर, लिंबू आणि बेकिंग सोडा घालून ब्रशने हलके घासल्यास काळपटपणा दूर होतो.

ADVERTISEMENT

हायड्रोजन पेरोक्साइडने स्वच्छ करा

हायड्रोजन पेरोक्साईड वापरून हट्टी डाग व घाण साफ करता येते. यासाठी एका जुन्या फडक्यावर  हायड्रोजन  पेरॉक्साईड सोल्यूशन घ्या आणि त्या कापडाने डाग घासा. डागांवर हायड्रोजन पेरॉक्साईड काही वेळ तसेच राहू द्या. व नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

How To Clean Marble Mandir
How To Clean Marble Mandir : istockphoto

बेकिंग सोडा आणि लिंबाने होईल देव्हारा स्वच्छ 

संगमरवरी देव्हारा स्वच्छ करण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे बेकिंग सोडा आणि लिंबू वापरणे होय. 1/2 चमचे बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस अर्धा लिटर पाण्यात मिसळा आणि त्यात 3 ते 4 थेंब डिशवॉशिंग लिक्विड टाका व मिश्रण एकत्र करा. या द्रावणात मऊ स्पंज किंवा कापड बुडवा आणि संपूर्ण देव्हारा पुसून घ्या. तुमच्या देव्हाऱ्याला नाजूक जाळ्या असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी जुना पण स्वच्छ टूथब्रश वापरा. हे द्रावण टूथब्रशने जाळ्यांवर लावा आणि चांगले घासून घ्या. जिथे जिथे डाग असतील तिथे हे द्रावण लावून घासून काढा. व 5 मिनिटे ठेवा. 5 मिनिटांनंतर, ओल्या कापडाने देव्हारा चांगला स्वच्छ पुसून घ्या.  

हे ठेवा लक्षात 

संगमरवरी देव्हारा पाण्याने किंवा स्वच्छता करण्याच्या द्रावणाने ओला करण्यापूर्वी, कोरडी धूळ कापडाने पूर्णपणे पुसून टाका. धूळ ओली झाल्यावर मंदिराला चिकटून राहते आणि लवकर स्वच्छ होत नाही. आपला संगमरवरी देव्हारा तुलनेने नाजूक असतो, म्हणून नेहमी मऊ कापडाने किंवा स्पंजनेच तो स्वच्छ करा नाहीतर त्यावर ओरखडे येऊ शकतात. देव्हारा स्वच्छ करण्यासाठी कधीही कठोर रसायने वापरू नका. देव्हाऱ्याच्या स्वच्छतेसाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. यामुळे धूळ व डाग लवकर आणि सहजपणे निघेल. 

या पद्धतीने तुम्ही संगमरवरी देव्हारा स्वच्छ करू शकता. 

ADVERTISEMENT

Feature Photo Credit – indiamart,

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

07 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT