ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how-to-clean-nose-rings-at-home-in-marathi

चमकी काळी पडत असेल तर तुम्ही करा हे सोपे उपाय

महिलांना नटायला खूपच आवडतं. त्यामुळे नेहमी सोळा श्रृंगाराने नटणारी नारी असं म्हटलं जातं. यामधील एक महत्त्वाचा श्रृंगार म्हणजे नाकातली चमकी. लग्नात नथ घातली जाते. नथीचा वेगळा साज असतो. पण नेहमी घालण्यासाठी अनेक मुली आणि महिला चमकी वापरतात. यामध्ये वेगवेगळे डिझाईन्सही बाजारामध्ये अथवा ज्वेलर्सकडे दिसून येते. चमकी तुमच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम करते. पण घाम आल्याने आणि धूळ, मातीमुळे अनेकदा चमकी खराब होते आणि काळी पडते. अधिकतम महिला सोन्याची चमकी घालतात पण आता ट्रेंडमध्ये ऑक्सिडाईज्ड चमकीदेखील आली आहे. पण ही नियमित वापरू शकत नाही. नियमित वापरासाठी सोन्याची वा हिऱ्याची चमकी घातली जाते. पण अनेकदा ही चमकी काळी पडते मग त्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. ज्यामुळे तुमची चमकी नेहमी चमकताना दिसेल. 

सर्वात आधी करा हे काम 

चमकी कशी करावी स्वच्छ

आपली चमकी स्वच्छ करण्याआधी तुम्हाला तपासून घ्यावे लागेल की तुमची चमकी अधिक नाजूक तर नाही. कारण जर तुमची चमकी नाजूक असेल तर तुम्हाला ही चमकी खूप व्यवस्थित स्वच्छ करावी लागेल. जर एकदम साधी चमकी असेल तर अगदी सहजपणाने चमकी साफ करता येते. 

बेकिंग सोड्याचा करा वापरा

बेकिंग सोड्याचा वापर तुम्ही तुमची चमकी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. कारण असं म्हटलं जातं की, चमकीची स्वच्छता बेकिंग सोड्याच्या वापराने अधिक चांगली होते. याचा वापर करण्यासाठी तुम्ही एका वाटीत बेकिंग सोडा घ्या आणि त्यात एक कप गरम पाणी मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. काही मिनिट्स तुम्ही तुमची चमकी या मिश्रणामध्ये ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने ही चमकी पुसा. तुमची चमकी पुन्हा एकदा चमकताना तुम्हाला दिसून येईल. 

लिक्विड डिटर्जंटचा करा वापर 

आपली चमकी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिक्विड डिटर्जंटचा वापर करू शकता. यासाठी सर्वात पहिले तुम्ही एक बाऊल घ्या. त्यामध्ये 1-2 चमचे लिक्विड डिटर्जंट घाला. काही वेळ हे मिश्रण तसंच ठेवा. त्यानंतर तुम्ही चमकी मऊ टूथब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करून घ्या. जेव्हा तुमची चमकी पूर्ण स्वच्छ झाली आहे असे तुम्हाला वाटेल तेव्हा पाण्याने स्वच्छ धुवा आणि सुकल्यावर पुन्हा नाकात घाला. 

ADVERTISEMENT

ज्वेलरी क्लिनरचा करा वापर 

तुम्हाला घरगुती वस्तूंचा वापर करून जर चमकीची स्वच्छता करायची नसेल तर तुम्ही बाजारातून ज्वेलरी क्लिनर (Jewellery Cleaner) आणून त्याचा वापर करू शकता. कोणत्याही स्थानिक दुकानातून तुम्हाला हे ज्वेलरी क्लिनर मिळू शकते. पण याचा वापर करण्यापूर्वी त्याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला हवे अथवा त्यात दिलेल्या सूचनांनुसारच तुम्ही त्याचा वापर करून चमकी स्वच्छ करा. 

या गोष्टींची घ्या काळजी 

  • तुमची चमकी विशेषतः तेल आणि धूळ – मातीच्या संपर्कात येत असते. त्यामुळे चमकीच्या बारीक डिझाईन्सना नुकसान पोहचते 
  • चमकीतील घाण आणि त्यातील काळेपणा हटविण्यासाठी योग्य असेल की, तुम्ही चमकी रोज आंघोळीच्या आधी अथवा नंतर काढून स्वच्छ करा. जेणेकरून चमकीमध्ये घाण साठणार नाही 
  • ही चमकदार बनविण्यासाठी तुम्ही नेहमी मुलायम कपड्याचाच वापर करावा 
  • आपली चमकी घासताना ब्रशचा जोराने वापर करू नका. चमकीवर ब्रश रगडू नका. यामुळे चमकीचे डिझाईन खराब होऊ शकते

या टिप्सच्या सहाय्याने चमकी काळी पडत असेल तर तुम्ही स्वच्छ करा. तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हीही वेळीच चमकी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या टिप्सचा वापर करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT