ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
उंच दिसायचं असेल तर असे काढा फोटो, सोप्या टिप्स

उंच दिसायचं असेल तर असे काढा फोटो, सोप्या टिप्स

फोटो काढून सोशल मीडियावर टाकायला सगळ्यांनाच आवडतं. या फोटोंमध्ये कसे दिसायला हवे या काही गोष्टीही आपल्या डोक्यात एकदम फिक्स असतात. फोटोमध्ये उंच दिसायला सगळ्यांना आवडतं.उंची कमी असली तरी देखील फोटोमध्ये सुंदर आणि उंच दिसण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स कामी येतात. यासाठी कपडे किंवा ठराविक पद्धतीची हेअरस्टाईल असा काही हट्ट नसतो. तर आहे त्या कपड्यांमध्ये आणि तुमच्या आहे त्या स्टाईलमध्ये तुम्हाला तुमचे उंच असे फोटो काढता येतात. तुम्हालाही तुमच्या फोटोमध्ये दिसायचे असेल उंच तर या पोझमध्ये काढा फोटो

प्री वेडिंग शूटसाठी असे निवडा कपडे आणि काढा सुंदर फोटो

लो अँगल (Low Angle)

कोणताही फोटो लो अँगलने काढला की, तुमचे पाय हे लांबसडक दिसतात. पाय लांब दिसले की, अर्थात तुम्ही अशा फोटोंमध्ये साहजिकच उंच दिसता. लो अँगलचे फोटो तुम्हाला अगदी बिकिनीपासून ते तुमच्या लेहंग्यापर्यंत कोणत्याही कपड्यात काढता येतात. 

ADVERTISEMENT

उदा. हा लो अँगलने काढलेला फोटो तुम्हाला दिसताना पायांकडील भाग हा जास्त उंच आणि लांब दाखवत आहे. इतकेच नाही. तर तुम्ही या फोटोमध्ये साहजिकच बारीकसुद्धा दिसता. त्यामुळे लो अँगलने एखादा फोटो काढायला काहीच हरकत नाही .

क्रॉस लेग सीटिंग

आता जर तुम्हाला बसून फोटो काढायचा असेल पण तुमच्या शरीराचा गोळा दिसू नये असे तुम्हाला बसतानाही अगदी ताठ आणि चांगल्या पोझमध्ये बसता यायला हवे. क्रॉस लेग सीटिंग ही बसण्याची अशी आदर्श पद्धत आहे त्यामुळे तुम्ही उंच दिसता. असे करताना तुमचा खालचा पाय हा थोडा उंचावर ठेवा आणि वरचा पाय थोडा हवेवर ठेवा. त्यामुळे तुमचे पाय उंच दिसतात किंवा तुम्ही दोन हात थोडे बाजूला ठेवून पुढे रेलून पायावर पाय ठेवताना ते दोन्ही पुढच्या दिशेला येतील असे बघा. म्हणजे तुम्ही अशा पोझमध्ये नक्कीच उंच दिसाल.

मुंबईत इथे करा प्री-वेडिंग फोटोशूट (Best Pre-Wedding Shoot Locations In Mumbai In Marathi)

ADVERTISEMENT

पायामंध्ये ठेवा आदर्श गॅप

सरळ फोटो काढताना ही उंच दिसायचे असेल तर पाय अगदी स्तब्ध किंवा सावधान ठेवून चालत नाही. असे फोटो काढताना पायामध्ये ग्रेस असणे फारच गरजेचे असते. पायांमध्ये अशा प्रकारे गॅप ठेवताना तुम्ही थोडेसे अंतर ठेवा एक पाय असा ठेवा की, त्यामुळे तुम्ही उंच दिसायला हवे. पायांमध्ये थोडे अंतर ठेवले की, तुमचे फोटो छान खुलून येतात. 

कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा

चांगले फोटो येण्यासाठी हे ठेवा लक्षात

  • चांगले फोटो येण्यासाठी चेहऱ्यावर हसू असणेही फार गरजेचे असते. पोझ कोणतीही असो चेहऱ्यावर छान हसू ठेवा. 
  • जबरदस्तीच्या पोझ देण्याचा मुळीच प्रयत्न करु नका. कारण त्यामुळे फोटो जास्त अवघडल्यासारखे येतात.
  •  जे आवडते ते घाला कारण अशाच कपड्यांमध्ये हसताना आणि पोझ देताना तुम्ही रिलॅक्स असाल. 

आता फोटो काढताना या गोष्टी लक्षात ठेवा.

ADVERTISEMENT
25 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT